कथाशंभरी - २ - डेड एंड - कविन

Submitted by कविन on 8 September, 2022 - 02:11

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तिथले दृष्य बघून मात्र मनात काहीतरी हलले.

फक्त एक घटना, एक चूक आणि अख्खं घर त्यात सोलवटून निघालं, हे ही आणि ते ही. समाधान, स्नेह, जिवंतपणा सगळं भस्म झालं.

जिवनेच्छाच संपली होती जणू, त्या घराची आणि त्याचीही. चमत्कारावर त्याचा विश्वासच नव्हता. 'डेड-एंड' म्हणतात तो हाच म्हणत 'कायमचा निरोप' घ्यायलाच आज तो इथे आला होता.
सवयीने 'तिकडे' लक्ष गेले तेव्हा, उजाड घराच्या त्या भिंतीतून कोवळी पालवी डोकावताना दिसली. तब्बल सहा महिन्यांनी डोळ्यात ओल जाणवली.

साध्याश्याच या दृष्याने काहीतरी चमत्कार केला होता. 'डेड-एंड'च्या जागी बहुतेक नवा विचार रुजत होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकारात्मक ...
छान लिहिलीयं कथा..

धन्यवाद मंडळी

सामी तुला स्पेशल धन्यवाद. तू इतक्या जोरात ढकललस कि चाकाने गती घेऊन तीन ठेशनं पार केली एकदम Proud

छान!!