कथाशंभरी -पूल (aside) - Emerald

Submitted by -शर्वरी- on 7 September, 2022 - 17:43

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

दुचाकीस्वार जोरात निघाला होता. एकमेकींकडे बघुन दोघीही अर्थपुर्ण हसल्या. अंधारात कुणाला दिसणार नाही असं त्या कितीतरी वेळ थांबल्या होत्या.आज अख्खा दिवस सावज मिळालं नव्हतं. रात्रीचे नऊ वाजायला पाच मिनिटं शिल्लक होती अजुन. याने तर हेल्मेट पण घातले नव्हतं. डबल फाऊल. डबल दंड. शि्ट्या वाजवत त्या दोघींनी त्याला थांबवलं. काय साहेब, ईकडे कुटं पुलावर? टु व्हिलर अलाऊड नाहीत साहेब ईथे. चला लायसन काढा. त्यांनी फर्मावले. मामा…आपलं… मामींना द्यायला त्याने लायसन्स काढलं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
BTW पुण्यात संभाजी पुलावरून आता दुचाकी नेऊन चालतात, पण सवय नसल्याने दिवसाढवळ्या तिथून दुचाकीवरून जाताना चुकल्यासारखं वाटत राहतं. Happy

सहीच एकदम..
मला वाटले की vampires आहेत काय?

आता संभाजी पुलावर दुचाकी घेऊन जाता येते ना?>>हो.
पण नेहमी पुण्यात रहात नसल्यामुळे अजून मला सवय झाली नाही. म्हणून दिवसा तिथून गेलं तर चुकल्यासारखं वाटतं Happy

वावे Proud
सस्मित, धनवन्ति Happy