कथा शंभरी २ - घर - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 7 September, 2022 - 13:43

घर

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ...
त्याने गालात हसून , खुशीत डोळे मिचकावले . त्या घरावर त्याचा डोळा होता . अगदी आधीपासून . एवढं मोठं, चांगलं घर. घरात रहायला राधाबाई एकटीच . तिला रघूची नियत माहिती होती .
तिचा पोरगा शहरात होता . तिला गाव सोडायचं नव्हतं .
ती आजारी पडल्यावर पोरगा तिला शहरात घेऊन गेला ... अन आज ती गचकल्याचीच बातमी आली होती .
त्याच्यासाठी पुढचं काम सोपं होतं . त्याला तिचं घर पाहिजे होतं. काही करून .
तो घराकडे पहात उभा होता . अचानक त्याच्या छातीत कळ आली . तो जागेवरच पडला . खेळ खलास !
तो राधाबाईच्या घरात राहणार होता ... नियतीचा हिसाब ! .... तिचं घर आता स्वर्गात होतं .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह

मस्त!