कथाशंभरी १ - मनगटं- 'मी अश्विनी'

Submitted by मी अश्विनी on 7 September, 2022 - 00:49

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. 'अरे हे काय, हाताला बँडेज कसले? 'सैंयाने मरोडी बैंया? आँ'

चल चावट!.. ऑक्युपेशनल हॅझार्ड बाई.. कार्पल टनल सिंड्रोम. आजीची मनगटं जात्यावर मोडली, आईची पोळपाटावर. आता माझ्या नशिबात ह्या मनगट्या.. कीबोर्ड बडवून.
एs आपण एकाच बॅचच्या ईंजिनियर! मग वीस वर्षे प्रोग्रामिंग करत मनगटातली रग गमावून मी झाले काकूबाई टीम-मॅनेजर, आणि तू? सॉफ्टवेअर कंपनीची फॅशनेबल सीटीओ... तरीही तुझी मनगटं शाबूत?

जानेमन, कॉर्पोरेट लॅडर चढायला बाईच्या मनगटात रग नव्हे नजाकत हवी. ती नाजूक जागी फिरली की भली-भली मनगटं पिरगाळता येतात. क्या समझी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

चांगली आहे.

नानबा - मलाही पहिल्यांदा वाचताना तसे वाटले होते. पण नंतर असेही वाटले की If men can use masculine attributes to get ahead, what's wrong in women using feminine attributes to do that? इथे मी फ्लर्टिंग वगैरे बद्दल म्हणत नाही. लोकांना persuade करण्याच्या, नेतृत्व करण्याच्या काही ठराविक पद्धती सध्या प्रचलित आहेत. जितक्या जास्त स्त्रिया अधिकारपदावर येतील तितक्या त्या बदलतील. तेव्हा "रग" जर चुकीची नसेल तर "नजाकत" ही नसेल.

आवडली मला.
आणि जरी चुकीचं असेल तरी मोराल पुलिसिंग कशाला? कारण ती कथा आहे, बोधकथा नाही. इ.इ.

मोराल पुलिसिंग>> वाचक म्हणून ती न आवडण्याचा आणि त्याचे कारण देण्याचा अधिकार मलाही आहेच की!

इथे मी फ्लर्टिंग वगैरे बद्दल म्हणत नाही. >> लेखिकेला नक्की काय अभिप्रेत आहे , असा प्रश्न पडला. ते वाक्य पुन्हा वाचा..
पण तुझ्या प्रतिसादाने एका जेंड र चेंज करून बाई झालेल्या आणि आधी सक्सेसफुल, व्हाईट मेल लीडर असलेल्या पुरुषाचा ज जेंडर बदलल्यावरचा अनुभव (Ted talk) आठवला :).. सो विचार करतेय.

पटली नाही.
नानबा+1. मनगटात काहीच नको. डोकं लागतं बस.

मला नीटसं कळलं नाही नानबाचं म्हणणं.

अमितला अनुमोदन - कथा आहे, त्यातल्या एका पात्राचं एक मत आहे - ते वाचकांनाच काय, लेखिकेलाही पटेल असं नाही.

कथा न आवडल्याचं कारण त्यात काही त्रुटी आहे, लॉजिकली पटली नाही, मांडणी आवडली नाही, पात्र नीट उभी रहात नाहीत इ. इ. असेल तर ठीकच आहे. पण कथा नायिका अनएथिकली वागते (त्यातही त्या अनएथिकल वागण्याचं समर्थन केलेलं असेल तर आवडली नाही हे ही एकवेळ समजू शकतो) पण फक्त अन एथिकल, किंवा आपल्या मोराल कंपासच्या बाहेरचं कथेतही काही असूच नये हे अनाकलनीय आहे.
>>ते वाचकांनाच काय, लेखिकेलाही पटेल असं नाही >> +१

If men can use masculine attributes to get ahead, what's wrong in women using feminine attributes to do that? >> दोन्ही चुकीचेच आहे. पण इथे अमितचा मुद्दा पटला. फक्त कथा म्हणून बघूया (बोधकथा म्हणून नको), आणि ती चांगली लिहिली आहे.

एरिन ब्रोकोविच मध्ये अशाच अर्थाचे काही आहे. नानबाचा आक्षेप समजू शकते. यशस्वी स्त्री स्वतः आपले बहुआयामी यश असे एका वाक्यात आक्रसून टाकते. का? कदाचित ऐकणारी इतर लढे समजूनच घेऊ शकत नसेल म्हणून? शशकपेक्षा कथा म्हणूनच अजून मोठी लिहायला हवी होती.

छान कथा.

बोधकथा नाही कशी म्हणता. घेईल की कुणाला बोध घ्यायचा असेल ती. Lol

आपल्याला आपल्या तत्वाबाहेराची गोष्ट आवडली नाही असे झाले तर ते मांडायचा अधिकार आपल्याला असावा. मी समीक्षक नाहीये, वाचक आहे.

कथा ठीकठाक आहे.
कथाविषय शंभर शब्दात मांडायचा म्हणजे अवघड गोष्ट.
पण म्हणूनच एकेक शब्द नीट विचारपुर्वक योजायला हवा असे वाटते.
'ती नाजूक जागी फिरली' या वाक्यातील ती म्हणजे ? नजाकत का? नजाकत फिरणे असा शब्द प्रयोग विचित्र वाटतो आहे.

नानबा ने न आवडल्याचे कारणासकट लिहिले आहे ते ही ठीक आहे.
मोराल पुलिसिंग नक्कीच नाही वाटले.

प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद.
वर अनेकांनी म्हंटल्याप्रमाणे ही दोन पात्रांची कथा आहे. कथेतल्या पात्रांचे आपापले सहीगलत ड्रुष्टीकोन असू शकतात. त्यांना नितीमत्तेची फुटपटी लाऊन मोजायचे म्हंटले तर फक्त रामकथाच लिहिता येतील.
जसे 'रघूने खून केला' हे अनेक कथांमध्ये सहज वाचून आपण पुढे गेलो तसे ह्या कथेत का शक्य झाले नसावे?
बहुधा 'कॉर्पोरेट लाईफ' हे अनेकांच्या रोजच्या जीवनाचे प्रॅक्टिकल अंग आहे. त्यामानाने खून वगैरे प्रकार जरा एलियन, गॉसिपी, सनसनाटी असा आऊट्लायर पण ओवर एक्स्पोज्ड ईवेंट झाल्याने त्याचे कथेत असणे तितके मॉरली अस्वस्थ करणारे राहिले नसावे. हा झाला एक भाग.

कथेचा आधी योजलेला शेवट असा होता. पण तो फार क्रिप्टिक होईल ह्या शंकेमुळे बदलला.

जानेमन, माझी आजी तमासगीर होती आणि आई पोलिस कॉन्स्टेबल. त्यांच्या नाजूक मनगटांनी त्यांनी भली-भली मनगटं नाचवली आहेत. क्या समझी!

थोडक्यात तमाशा काय, पोलिसी डोमेन काय किंवा कॉर्पोरेट काय मस्क्युलाईन पावरशी दोन हात करायला जात्यावर किंवा पोळपाटावर झिजलेल्या मनगटांचा वारसा पुढे कीबोर्डवर चालवून मिडिओकर यशच पदरात पडण्याची शक्यता जास्त.
ऊंच महत्वाकांक्षा ठेऊन कॉर्पोरेट लॅडर चढायच्या असतील तर साम, दाम, दंड, भेद सगळे स्त्रियांना करता आले पाहिजे. नाजूक मनगटे ही काही सरधोपट मार्गानेच जात कष्ट करत रहावे ह्याचे प्रीरिक्विझिट नाही असे कथेतल्या पात्राचे विचार आहेत.

efforts, skills, brain, ethics ह्या गोष्टी अ‍ॅबस्ट्रॅक्ट आहेत पण ह्या मार्गाने जाणारी ९०% जनता असते. ह्या अ‍ॅट्रिब्यूट्सचे आपण कितीही प्रदर्शन केले तरी त्यांचा रिवार्ड मिळणे हे आपल्या हातात नाही. लॅडरमधले वरचे लोक हा रिवार्ड ठरवणार आणि तो आपल्या दृष्टीने बहुतांश वेळा अनफेअर असतो. रिवॉर्ड मिळण्यामध्ये पॉलिटिक्स, फेवरिझम, नेपोटिझम, रिलिजन-कास्ट-जेंडर बायसेस असे अनेक अडथळे असू शकतात.

ऊरलेले १०% लोक आपल्याला हवे ते मिळण्यासाठी दुसर्‍यांनी आपले efforts, skills, brain, ethics रिकगनाईझ करून रिवार्ड मिळण्याची वाट बघत बसत नाहीत. ते त्यांना ऊपलब्ध असलेल्या हरेक रिसोर्स चा वापर करून संधी निर्माण करत शिड्या चढतात. पुन्हा चढलेली शिडी टिकून ठेवण्यासाठी सुद्धा efforts, skills, brain, ethics अ‍ॅट्रिब्यूट्स पुरेसे असतीलच असे नाही. त्यांच्यासाठी हे मॉरल- ते ईमॉरल अशी द्विधा नसू शकते ..ह्या १० टक्क्यात मेल, फीमेल दोन्हीही आलेच.

माफ करा प्रतिसाद खूपच मोठा झाला.