Submitted by हरचंद पालव on 6 September, 2022 - 20:41
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि पुन्हा काहीतरी आवाज येतो आहे असे वाटून तो चपापला. खात्री करण्याकरिता दारापाशी गेला आणि कुठल्यातरी भितीने आल्यापावली स्वगृही परतला. त्या बंद घराच्या आतून ती सगळा प्रकार सीसीटीव्हीवर बघत होती. पण तिकडे लक्ष देण्यापेक्षा आत्ता व्हिडिओ कॉलवर मैत्रिणीशी बोलणे गरजेचे होते. बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! सीसीटिव्हीवर रघू पुन्हा घराबाहेर पडलेला दिसला. अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भन्नाट कल्पना
भन्नाट कल्पना
लिहायला जास्त त्रास नाही पडला
लिहायला जास्त त्रास नाही पडला।।।। मस्त एकात एक गुंफली कथा तुम्ही।
हा हा. हो अजनबी, ४१ शब्द
हा हा. हो अजनबी, ४१ शब्द संयोजकांचे आहेत दोन्ही मिळून. मला कमी कष्ट पडले
सर्वांचे पुन्हा आभार.
पल्लवी, ग्राऊंडहाॅग डे बघितला नाहीये अजून, त्यामुळे प्रतिसाद कळायला गूगल काकूंना विचारावे लागले. पण श्टोरी रोचक वाटते आहे, बघणार आता नक्की.
जबराट!
जबराट!
हाहा, चक्रम चक्र :-ड
हाहा, चक्रम चक्र
भारीच !
भारीच !
फारच भारी
फारच भारी
rmd , वंदना, कुंतल आणि लंपन,
rmd , वंदना, कुंतल आणि लंपन, तुमचेही आभार!
भारीच कल्पना हपा!
भारीच कल्पना हपा!
रघुला आणि दोघींना वेगळे काहीही न बनवता, वेगळे काहीही करायला न लावता लिहिलेल्या कथे बद्दल रघु आणि दोघी तुमचे किती ऋणी असतील नाही!
हाहा. धन्यवाद मानव.
हाहा. धन्यवाद मानव.
काल ग्राउंडहॉग डे पिक्चर
काल ग्राउंडहॉग डे पिक्चर बघितला. चाळताना समोर आला होता. इथे उल्लेख वाचला नसता तर मी कदाचित तो बघायला गेलो नसतो. नितांत सुंदर चित्रपट आहे. सुचवल्याबद्दल धन्यवाद, पल्लवी.
Pages