कथाशंभरी - आठवण - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 6 September, 2022 - 12:12

आठवण
--------
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता . नाही म्हणलं तरी काही वर्षं लोटली होती. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. अचानक एकीचं लक्ष तिकडे गेलं. अरे, हे काय ? ...
नदीच्या विस्तीर्ण पात्रात काही बोटी डौलाने फिरत होत्या .
एक बोटीत तो होता . भडक फॅशनचे कपडे घातलेला . त्याने एक पेडल बोट घेतली होती . टू सीटर . त्याच्याबरोबर एक तरुणी होती . तीही भिरभिरीच ! दोघेही एकमेकांशी हसून , स्पर्शून बोलत होते .
" हाच गं तो ! ज्याने माझ्या उपयोगाने आधीच्या पोरीला मारलं होतं . गळा आवळून ! आणि मग पाण्यात ... ", पुलाच्या भिंतीवरची एक वेल दुसरीला म्हणाली .
दुसरीनेही त्याला ओळखून दुजोरा दिला . तेव्हा पहिली वेल पुन्हा त्या रात्रीच्या आठवणीने , भीतीने शहारून गेली .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह...

आभार

खूप मंडळी चांगलं लिहीत आहेत . कौतुक !