अनलिमिटेड टाॅक टाइम लिमिटेड जिव्हाळा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 5 September, 2022 - 10:06

माझ्याकडं अनलिमिटेड टॉकटाइम आहे आणि वेळही
मी तुला कधीही फोन करु का? आपण कितीही बोलू?

कशाला कटकट
यापरीस whatsapp कर
(मी न वाचता लाईक देईल आणि बोनस मिम्सही देईल
मलाही वेळ आहे टाॅकटाईम अनलिमिटेड आहे पण…
नकोच मीच का?
आपलं टिचक्या मारणंच बरं
मुठभर घुग-या रातभर मचमच
उगा का तोंडाची वाफ दवडा तोंड फाटेल ते वेगळचं)

अरे पण जग आता पिपंळपानावर मावलंय
ए जा रे अशी कधीही कोणाची वैयक्तिक स्पेस डिस्टर्ब करु नये
ठिक तू आणि मी नोकरीत असताना घरी असतो त्यापेक्षा जास्त काळ एकत्र असायचो
पण तू साला इमोशनल फूल
आता आपण पेंशनर्स पण मी इमोशनल फूल तेव्हाही नव्हतो आताही नाही
मी तेव्हा आणि आताही तूला फूल करत होतो
तू खूलं आभाळ होता पण मी बंद दारच होतो तूला कळलं नाही

अरे एवढा कठोर होऊ नको
का तुला माहित नाही कुणी कुणाचं नसतं जो तो फक्त स्वतःचा असतो
हो रे आज कळतयं जग पिंपळपानावर मावलं पण तरलं नाही whatsapp, Facebook, ,smart gazzetes असूनही माणसं कधी नव्हे एवढी दूर गेली
माणूस आता एकटा आतून पोखरलेला, भयभीत आहे
हस-या मिम्स एवढाच नकली…
अनलिमिटेड टॉकटाईम असूंही मिम्समधूनच व्यक्त होणे, online दिसल्याबरोबर गायब होणं
अनलिमिटेड टॉकटाईम पण लिमिटेड जिव्हाळा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान!

@
कुमार १
उपाशी बोका
वावे
AMIT
चैत्रगंधा
मंजूताई
प्राचीन
तुम्हा सर्वांचे खूप आभार....