माझ्या वडिलांचे एक पितृतुल्य ज्येष्ठ चुलतभाऊ संस्कृतचे प्रकांड पंडित होते. लहानपणी कधीतरी त्यांच्याकडे काही कार्याच्या निमित्ताने राहिले असताना त्यांच्या मेजावर गणपतीचं काहीसं अपरिचित शैलीतलं चित्र असलेला एक जाडजूड आणि जीर्ण ग्रंथ दिसला होता. पुस्तक दिसलं की चाळल्याशिवाय तेव्हाही चैन पडत नसे. काका जरा तापट होते, त्यामुळे घाबरत घाबरतच त्यात डोकावले होते.
आता काही केल्या त्या ग्रंथाचं नावगाव आठवत नाही, पण गणपती ही मूलतः अनार्यांची देवता असून त्याला असलेली लाल रंगाची आवड ही त्याच्यापुढे दिल्या जाणार्या (नर?)बळींच्या रक्ताशी निगडीत आहे अशी माहिती त्यात दिसल्याचं आठवतं.
इतकं ज्ञान पदरात पडतंय तोवर कोणाचीतरी चाहूल लागल्याने घाईघाईत पुस्तक मिटून ठेवून तिथून पोबारा केला होता.
या 'माहिती'चं गांभीर्य कळण्याइतकं वय नव्हतं ते, पण ही नोंद डोक्यात राहिली खरी.
तोवर गणपतीच्या कथा इतर देवदेवतांच्या कथांप्रमाणेच मिथककथा म्हणून वाचल्या होत्या. त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो हे कळत होतं, तरीही इतकी अचाट बिनशेंड्याबुडख्याची उगमकथा इतर कुठल्याच देवाची वाचल्याचं आठवत नाही. पार्वतीने अंगरागापासून (अगदी मळ नको म्हणूया, पण सीरियसली, किती दिवसांची अंघोळ राहिली होती तिची म्हणते मी!) हे मूल घडवणं काय, शंकराने बायकोच्या न्हाणीघरात जाऊ दिलं नाही म्हणून एवढ्याश्या मुलाचा शिरच्छेद करणं काय (टॉक अबाउट अॅन्गर इश्यूज!), मग हे इतके पावरफुल दैवी आईवडील असून त्याला हत्तीचं शिर चिकटवणं काय, कशाचा कशाला काही पत्ताच नाही! आय मीन अख्खा मुलगा ज्या पार्वतीने घडवला, तिला एक शिर रीक्रिएट करणं शक्य नव्हतं? शंकराला तेच शिर रीसायकल करायचं सुचलं नाही? आणि मग ओव्हरकॉम्पेन्सेशन म्हणून त्याला गणांचा अधिपती केलं म्हणे! हे नेपोटिझम नाही तर काय!
मग म्हणायचं चार हात चौपट कार्य करायला (याच्या भावाला सहा डोकी, आणि आईच्या एका व्हर्जनला आठ हात! त्यामानाने हा बराच नॉर्मल म्हणायचा!), मोठं पोट चुका अॅक्सेप्ट करायला, काय नि काय! इसापच्या बोधकथांमधले प्राणीसुद्धा यापेक्षा लॉजिकल वागतात! शिवाय या कथेतून नेमका बोधतरी काय घ्यायचा?!
गणपतीचं रूप माझ्य डोळ्यांना अत्यंत साजिरं दिसतं, आणि त्याचा घरगुती आणि सार्वजनिक सणसोहळा हा माझ्या सांस्कृतिक जडणघडणीतला एक अविभाज्य भाग आहे. ते अर्थातच कन्डिशनिंग. पण मुखाने 'एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमही' (एकदंताला मी/आम्ही बुद्धीने समजून घेतो, वक्रतुंडाचे ध्यान करतो) म्हणायचं, त्यातल्या 'विद्महे'चं काय?
नंतर कधीतरी निसर्गपूजक पेगन लोकांचे देव/सणवार ख्रिश्चॅनिटीने कसे आणि का 'आपलेसे' करून / बळकावून घेतले याबद्दलची चर्चा वाचनात आली आणि या आता शेंदूर, गुलाल, रक्तांबर, गंधाक्षता, लाडूमोदकअन्ने इत्यादींखाली दड(व)लेल्या अनार्य देवतेच्या आठवणीला उजाळा मिळाला. नेटवर शोधाशोध केली तेव्हा खाली दिलेले दुवे व यांसारखे अन्य लेख सापडले. ते मुळातूनच वाचावेत असं सुचवेन. तसंच कोणाला यांविषयीची अधिक माहिती, संदर्भग्रंथ इत्यादी ठाऊक असतील तर कृपया शेअर करा, मला वाचायला आवडेल.
पुराणातली वानगी पुराणातच राहू द्यायची असते म्हणतात, पण सोयीनुसार आपण नाही नाही त्या वानग्या आणि त्यांवरून वादविवाद उकरून काढतोच! मग निखळ ज्ञानसंपादनासाठी आता बुद्धीची देवता म्हणून स्वीकारलेल्या दैवताचा हा शोध का घेऊ नये?
संदर्भ :
http://insearchofganpati.blogspot.com/2016/10/blog-post.html
https://maharashtratimes.com/editorial/samwad/ganesh-utsav/articleshow/4...
गुड.
Good.
कविन
लेख वाचला. संदर्भ वाचले नाहीत
लेख वाचला. संदर्भ वाचले नाहीत.
म्हणजे बुद्धीच्या मुळाशी जो अग्नि आहे त्याला 'गणपती' हे नाव दिले आहे, त्याच्या उलट नाही.
आपल्या सगळ्या पुराणकथा मिथकांच्या रूपांत लिहिल्या/सांगितल्या गेल्या आहेत त्यामुळे त्या टिकल्या पण मूळ अर्थ गमावून बसल्यात. असे प्रश्नं पडणं साहजिकच आहे. खूप विचारांती 'आधी मिथकांत रमलो , आता विश्लेषणात तुला हरवले' असं होऊ नये म्हणून मी स्वतःपुरती व्याख्या केली आहे. God is a conscious fluctuating energy, we are an unconscious fluctuating energy. इथे God म्हणजे देव , निर्गुण, निराकार परमसत्य नाही. गणपती accessible source of energy for brain cells असावा पण असं सांगणं किती रुक्ष होईल म्हणून 'एकदंतकथां'चा प्रपंच.
असं आपलं मला वाटतं
लेख वाचला. संदर्भ वाचले नाहीत
लेख वाचला. संदर्भ वाचले नाहीत.
म्हणजे बुद्धीच्या मुळाशी जो अग्नि आहे त्याला 'गणपती' हे नाव दिले आहे, त्याच्या उलट नाही.
आपल्या सगळ्या पुराणकथा मिथकांच्या रूपांत लिहिल्या/सांगितल्या गेल्या आहेत त्यामुळे त्या टिकल्या पण मूळ अर्थ गमावून बसल्यात. असे प्रश्नं पडणं साहजिकच आहे. खूप विचारांती 'आधी मिथकांत रमलो , आता विश्लेषणात तुला हरवले' असं होऊ नये म्हणून मी स्वतःपुरती व्याख्या केली आहे. God is a conscious fluctuating energy, we are an unconscious fluctuating energy. इथे God म्हणजे देव . निर्गुण, निराकार परमसत्य नाही. गणपती accessible source of energy for brain cells असावा पण असं सांगणं किती रुक्ष होईल म्हणून 'एकदंतकथां'चा प्रपंच.
असं आपलं मला वाटतं
अस्मिता.
अस्मिता.
पण या लेखात/चर्चेत आला आहे तो 'देवाचा' शोध नाहीच.
मी म्हणते आहे तो शोध ही प्रतीकं, मिथकं कशी घडत आणि बदलत जातात हाच आहे.
(तू निर्गुण / निराकार देवाबद्दल बोलत नाहीयेस असं लिहिल्याचं लक्षात आल्यामुळे तो भाग संपादित करत आहे.)
खरंय
खरंय
बुद्धीच्या मुळाशी जो अग्नि
बुद्धीच्या मुळाशी जो अग्नि आहे त्याला 'गणपती' हे नाव दिले आहे, त्याच्या उलट नाही.>> हे इंटरप्रिटेशन आवडलं!
Pages