कथाशंभरी - २ - गोष्ट-शंभर शब्दांची, अगणित अर्थाची

Submitted by संयोजक on 4 September, 2022 - 08:41

'शशक' उपक्रमास मिळणारा प्रतिसाद पहाता, संयोजकांनी अजुन एक, शशक सुरुवात करुन देण्याचे योजलेले आहे. तेव्हा रसिक आणि चोखंदळ मायबोलीकर उदंड प्रतिसाद देतीलच अशी आशा करतो आहोत. ही सुरुवात पुढे खुलवून आणि शेवट करून तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि कथेला साजेसे असे शीर्षक द्यायचे आहे. एक आयडी कितीही प्रकारे कथा पूर्ण करू शकतो.
धाग्याचे शीर्षक कथाशंभरी - २ - कथेचे शीर्षक - मायबोली आयडीचे नाव असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी.
कथेची सुरुवात -

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....

(यापुढे हि शशक तुम्हाला पूर्ण करायची आहे. वरील सुरुवात धरुन, १०० शब्दात.)

नियम :
१) हा मायबोलीकरांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) मायबोली गणेशोत्सव २०२२ या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात तुमची कथा लिहा. धाग्याचे शीर्षक : कथाशंभरी - २ - कथेचे नाव - तुमचा मायबोली आयडी असे द्या.
३) कथा गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
४) एक आयडी कितीही प्रवेशिका पाठवू शकतो.
५) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगणात येउन रघूने सवयीने गेले सहा महीने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे पाहीले आणि ..... >>>

हे वाक्य शुद्धलेखनाचे नियम पाळून द्यावे, ही विनंती.

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ..... असे देता येईल.