कथाशंभरी - वसूली - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 4 September, 2022 - 05:38

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय...

लांबून एक मिशीवाला आडदांड तरूण आणि सोबत एक बारीक उंच मनुष्य इकडेच येताना दिसत होते. त्या चांडाळाने वसूलीला पाठवलेली माणसं तर नाहीत ना ही? तिच्या जाड चष्म्याआड डोळ्यातली ही भिती दुसरीने क्षणार्धात टिपली आणि लगबगीने धुणं वाळत घालायची काठी शोधायला ती धावली.

पण काही शोधाशोध करायच्या आतच ती दोघं अगदी घरात येऊन पोहोचली आणि तो मिशीवाला तरूण म्हणाला, 'नमस्कार, मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायचीये असं कळलं म्हणून आलो'.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Biggrin

कोई माने या ना माने
जो कलतक थे अंजाने
वो आज हमारे रुम के
भाडेकरू हो गये

coffeescreen.gif

छान.

Lol

या कथेची फुल व्हर्जन माबो गणेशोत्सवानंतर लौकरच रिलीज करण्यात यावी अशी मागणी करत आहे. "धनंजय माने इथेच राहतात का" या सीन पर्यंत Happy खास लोकाग्रहास्तव म्हणतात तो लोकाग्रह हाच समजावा.

Lol rofl

लोल. मस्त आहे हे.
स्पिन द यार्न बोअर होतं फार. एकतर कुठून कुठे जातं आणि लांबलचक कोण वाचत बसेल. थोडक्यात गोडी बेस्ट आहे.

धन्यवाद लोकहो.

फारएण्डा, अरे तो धनंजय माने इथेच राहतात का सीन लिहायला वरच्या श्टोरीचा प्रिक्वल लिहायला लागेल. 'द फेलोशिप ऑफ मानेज' असा काहीतरी. Happy

वाचून "वसुली भाई"ची आठवण झाली. >> केकू Lol

या कथेची फुल व्हर्जन माबो गणेशोत्सवानंतर लौकरच रिलीज करण्यात यावी अशी मागणी करत आहे. "धनंजय माने इथेच राहतात का" या सीन पर्यंत Happy खास लोकाग्रहास्तव म्हणतात तो लोकाग्रह हाच समजावा.> +११११

Lol Lol