Submitted by अजय चव्हाण on 2 September, 2022 - 16:18
रूक्मिणी....
त्या स्पर्शाने हरखून गेल्या राती...
दिपकळी नवी, नवी ही चांदणी..
प्रीत प्राजक्त, अंगी ह्या फुलला..
सुंगधी देहा तुझिया, जीव हा भुलला..
सुवास मिठीचा, गोड आठवणीत बदलता..
कंपने भरती मज, तुला आठवता..
श्यामरंगी मिता, तुलाच मी अर्पिता..
सोहळे सुखाचे हे तुलाच सर्मपिता..
मोरपिसे हे शोभे, तुझ्याच भाळी..
सौभाग्य हे माझे, कुंकू तुझे कपाळी..
सूर बासरी, क्षणिक सुखद मधाळी..
अलगद पडझडे, स्तब्ध मी सायंकाळी..
उभी मूर्तीत तुझिया, राधा नवनीता..
मज कोण पुसे, तुझी रे मी परिणीता..
भजनी-अभंगी सदा, मीरा किशोरी..
बोलू कैसे मी, अभागी ही द्वारकेश्वरी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वरचित रचना - https://www
स्वरचित रचना - https://www.maayboli.com/node/82129 या धाग्याचा विषय आहे उपक्रम अर्थात, स्वरचित रचना हा उपक्रम सदरामध्ये मोडणारा धागा आहे.
माफ करा या धाग्यात अधिक क्लॅरिटी हवी होती. बदल करतो आहोत जेणेकरुन हा धागा 'उपक्रम' विभागात आहे हे अधोरेखित होइल..