एकतर्फी - २

Submitted by खुशालराव on 2 September, 2022 - 04:46

"काय केल मी हे... माझ्या स्वतःच्या बहीणी सोबत... खुप
मोठी चुक झाली माझ्याकडून... माझि अनु...
असे कसे करू शकते मी तिच्या सोबत... तिचा तर काही दोष नव्हता यात.." ऋतुला तिच्याच कृत्याचा राग येत होता आपण अस कस करू शकतो आपल्या बहीणी सोबत, कस काय तिच्या जिवावर ऊठु शकतो? पण आता हा सगळा विचार करण्यात काही अर्थ नव्हता जे व्हायचे ते झाले होते... ऋतुला माहिती होत तिच्याकडून घडलेल्या अपराध तिला स्वस्थपणे जगु देणार नव्हता... अपराध बोधात जगण्यापेक्षा तिला स्वतःला संपवण जास्त सोपे होत.. आणि तिनेही तेच केल... कपाटात असलेल्या बाबांच्या झोपेच्या गोळ्यांची डबी रिकामि केली..

*****

"तुमची मुलगी ससून हास्पिटल मध्ये आहे... तुम्ही लवकर ईथे पुलगेट पोलीस ठाण्यात हजर व्हा..." नुकत्याच स्वत:च्या मोठ्या मुलिचा अंतिम संस्कार करून आलेल्या विनायक रावांना पोलिसांचा फोन आल्यामुळे ते तडक पोलीस स्टेशनला निघाले... 

"तुमची मुलगी अनुजा... अजुनही शुद्धीवर आलेली नाहीये.. नशीबाने वाचलीये ती... पुलगेट जवळच्या कॅनाल मध्ये वाहुन चालली होती एका माणसाने तिला बाहेर काढले व आम्हाला खबर दिली.. आम्हाला संशय आहे की तुमच्या मोठ्या मुलीच्या आत्महत्येचा आणि तुमची दुसरी मुलगी अशी सापडणे यात नक्की काही ना काही संबंध आहे... आम्ही तिची साक्ष घेतल्या शिवाय कोणालाही तिला भेटता येणार नाही.. आम्हीही माणूस आहोत तुमच्या मनाची अवस्था समजू शकतो पण आमचाही नाईलाज आहे... मी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो... " इंस्पेक्टर वाघमारेंने विनायक रावांना सांगितले.

आठ वर्षांपूर्वी ऱ्हदय विकारांच्या झटक्याने सुशिला म्हणजे गेल्यानंतर या दोघिच त्यांच्या जगण्याचे कारण बनल्या होत्या आणि आता तर विनायक रावांची उमेदच हरवली होती... आपल्या मोठ्या पोरीने आत्महत्या का केली एकीकडे हा प्रश्न आणि आपल्या दुसऱ्या मुली सोबत नक्की काय घडले हा प्रश्न... विनायक राव पुर्ण खचुन गेले होते...

"आभ्यासाच टेंशन आल्यामुळे मन मोकळं करण्यासाठी ती कॅनाल किनारी एकटी फीरत असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली अशी तुमच्या मुलीने साक्ष दिली आहे... तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर?" वाघमारेंने विनायक रावांना विचारले.
"मला नाही माहित पण हो ती टेंशन वगैरे मध्ये असली की ती कॅनॉल जवळपास फिरायला जायची." विनायक रावांनी सांगितले.
" ह्म्म.... तुमच म्हणण लक्षात घेतल तर तीची साक्ष खरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. " वाघमारे.

****
सहा महिन्यापूर्वी
" पण तीचे माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कळनार कस?" राकेश.

" मला माहीती आहे रे तु ताईवर लहानपणापासून प्रेम करतोस. पण तुला माहीतच आहे की तिला काय वाटत
एखाद्याबद्दल हे ती स्वतः व्यक्त करत नाही, त्यामूळे तु प्रत्यक्ष तिलाच का विचारत नाही?" अनुजा.

"ईच्छा तर माझि पण आहे ग अनु पण भीती वाटते... जर तीने नकार दिला तर? किंवा आमची मैत्री... " राकेश. "अस काही होणार नाही... "अनु. "असे कशावरून म्हणु शकतेस तू, यार मला नकार दिला तर कदाचित मी तिची लाईफ तिचा निर्णय आहे अस समजवेन स्वतःला पण जर माझ्या प्रपोजल मुळे आमच्या मैत्रीला धक्का लागला तर हे सहन नाही करू शकणार मी.. " राकेश. "मी काही अंदाज बांधता येतोय का बघु का ताईशी बोलुन?" अनु.  "प्लीज ग जर अंदाज आला तर बर होईल..." राकेश.

"ताई, ऐक ना.." अनु. "ह्म्म, बोल.." ऋतु. "ओरडायचे नाही हा.." अनु. "ह्म्म.. म्हणजे परत काहीतरी केलं वाटत तू... बर सांग, ओरडायचं का नाही ते मी ऐकुन ठरवेल..." ऋतुजा.

" तुला काय वाटतं?" अनुजा काहीशी लाजत लाजत बोलली.
"कशाबद्दल? आणि अस लाजायला काय आहे?" ऋतु.
"अग म्हणजे ते... अस..." अनू.
"हे बघ, विचारायच आहे तर विचार नाही तर गप्प बस. उगाच मला त्रास देऊ नकोस, असाईनमेन्ट पुर्ण करायची आहे मला" ऋतुजा चिडतच म्हणाली.
"बर मी डायरेक्ट विचारते, पण रागवायचे नाही आणि खर खर सांगायच बर.." अनुजा.
"तू विचारणार आहेस का आता?" ऋतु.
"तुला कोणी पोरगा आवडतो का ग?" हे विचारल्यावर आता ताई काय म्हणेल याची भीती आणि उत्सुकता दोन्ही अनुजाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.
"ह्म्म, हे विचारायच होत म्हणुन एवढी घाबरत होतीस का! नाही ग असा विचारच केला नाही मी कोणाबद्दल.... आणि तसही काय उपयोग त्याचा... मला नाही आवडत, कोणी सिरीयस होत नाही फक्त नावालाच मी काहीही करू शकतो तुझ्यासाठी, आय लव्ह यू वगैरे.. उगाच फालतूपणा करण्यात कोण वेळ घालवणार..." ऋतुजा.
"हा ते पण खरच आहे म्हणा... पण जर समजा तुला कळाले की कोणी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो तर, तर काय करशील?" अनु.
"तस जर खरेच कोणी असेल आणि मला खरेपणाची खात्री असेल तर नक्कीच विचार करेन मी." ऋतुजा.
"अच्छा.. म्हणजे कोणी नाहीए पण असु शकतो फक्त प्रामाणिक पाहिजे असच ना?" अनु..
"हो, पण काय झालं अचानक हे असळ खुळ कुठुन आले तुझ्या डोक्यात? का विचारल मला?" ऋतुजा.
"काही नाही ग सहज विचारल ती निशा नाहीका, ती तिच्या बी एफ बद्दल सांगत होती दुपारी म्हणुन सुचल..." अनुजा. "पक्का?"ऋतुजा.
"हो ग... "अनुजा.

"मी काल विचारल ताईला.."अनू
"मग काय म्हणाली ती, आवडतो का मी तिला?" ऋतुजा.
"ए बाबा, अस काही नाही विचारल मी... काय येडा आहे का?" ऋतुजा.
"मग, काय विचारल तू?" राकेशने काहीशा उदास सुरात विचारले.
"हे बघ, मी काही तीला डायरेक्ट नाही विचारू शकत पण हा एक पक्क आहे की तिच्या मनात कोणी नाहीये, पण एक चांगल आहे की ती प्रेम वगैरेच्या विरोधात नाहीये फक्त तिला कोणी तिच्या मनासारखा भेटला नाही ईतकच.. " अनू.
"ह्म्म.. कठीण आहे.. " राकेशने सुस्कारा सोडला.
****

मागच्या सहा महिन्यात अनुच्या सतत डिवचत राहण्यामुळे आणि राकेशच्या प्रामाणिक पण प्रेमळ वागण्याने कुठेतरी ऋतुजा च्या मनात राकेशसाठी प्रेम फुलायला लागले होते....
"मी प्रपोज करू का राकेश ला?.. नको नको.. जर तो फक्त जवळची मैत्रीण म्हणून माझ्याशी चांगला वागत असेल तर काय वाटेल माझ्या प्रपोजलचे... अनुला सांगु का त्याच्या मनात काय आहे हे काढून घ्यायला? नको नाहीतर तसही ते दोघेसुध्दा चांगले मित्र आहेत उगाच मनातल काढून घ्यायच्या नादात तिने राकेशला सांगितले तर!" ऋतुजा स्वतः सोबतच प्रश्नोत्तराच्या खेळात गुंगली होती...
*****

"हा ऋतू काय झालं अचानक आम्हाला आपल्या अड्ड्यावर बोलवण्या ऐवजी का ईथे का बोलवलं" अजय आणि विनोदाला ऋतूने जंगली महाराज रस्त्यावरील बाबू कॅफेत बोलवल होत...
"आधी प्रॉमीस करा दोघांनी की आपल्यात जे काही बोलने होईल ते तुम्ही कोणालाच सांगणार नाही... " ऋतू
"ए यार ऋतू... आधी काय सांगायचय ते तर सांग तसही आपल्या चोघांमधले सिक्रेट आपण कोणाला शेअर करतो का? नाही ना... मग... " विनोद
"डफर... कोणाला नाही म्हणजे कोणालाच नाही... अगदी राकेशला सुध्दा नाही.. " ऋतुजा
"पण का.... राकेशला सुध्दा का नाही... " अजयने विचारले.
"नाही.... त्याला सुध्दा नाही... जर सांगायचेच असते तर मी त्यालाही बोलावले नसते का! तुम्ही प्रॉमीस करणार असाल तर सांगते... नाहीतर नाही.... करताय ना प्रॉमीस?" ऋतुजा
अजय आणि विनोदने एकमेकांना डोळ्यांनीच मूकसंमती दिली आणि ऋतुजाला प्रॉमीस केल्यावर ऋतुजाने तिच्या मनात राकेश बद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या आणि त्याच्या मनात काय आहे या बद्द्ल जाणून घ्यायला मदत करण्यासाठी विचारले.
"पण ऋतू जर त्याच्या मनात काही नसले तुझ्या बद्दल तर?" अजयने विचारले..
"तर काय... तसही काय करू शकते मी.. " ऋतुजा
"आणि जर त्याच्या मनात असलि तू तर? तर आम्हाला पार्टी पाहिजे हा... " अजयच्या प्रश्नामुळे ऋतूचा पडलेला चेहरा पाहून मूड हलका करण्यासाठी विनोद बोलला.. यावर ऋतू मनोमन खुश झालि....
****
एक आठवड्यानंतर

"ए विन्या हा आपला राकेश म्हणतोय, मला वाटतं मला प्रेम झालय.. " अजय विनोदला राकेशची उडवत सांगत होता... गेल्या दोन अडीच वर्षात अजय, राकेश, विनोद आणि ऋतू अगदी जिव्हाळ्याचे मित्र झाले होते..
"मी सिरीयस आहे यार.... खरच कोणीतरी आहे माझ्या मनात जिच्यावर मी खुप प्रेम करतो पण... " राकेश बोलता बोलता थांबला.
"मला माहीत आहे रे.... आणि मला हे सुद्धा माहित आहे की ती मुलगी कोण आहे... " अजय गंभीरतेने राकेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला...
"काय रे ए मला सोडून तुम्ही आपल्या अड्ड्यावर काय करताय? आणि साहेबांना काय झाल? ए राख्या काय झाल रे तोंड का पाडलयस?" ऋतुजाने विचारले.
"अग काही नाही मी म्हणल की नेक्स्ट विक मध्ये सलग दोन दिवस सुट्टी आहे तर कुठेतरी नाईट आऊटला जाऊ तर..." विनोदने विषय बदलुन सांगितला...
" माकडा तुला माहित नाही का त्याचा बारका भाऊ एकटा असतो त्यामुळे तो ईच्छा असुन... डोन्ट वरी बाॅस अपन तेरे लिए वन डे ट्रीप निकालेंगे... अब तो खुश..?" ऋतुजाने मुड हलका करण्यासाठी टपोरी स्टाईल मध्ये समजूत काढली...
"जर तु पाणी पुरी चारत असली आज तर खुश.. " ऋतुजाकडे बघुन राकेश नाटकी हसत बोलला...

"बस क्या दोस्तों को खुश देखने के लिए इतना तो करेगी ही हमारी ऋतु... आंडू पांडु समझा क्या!" अजय राकेश आणि विनोद ला टाळी देत सुरात सूर मिसळत म्हणाला.
"ए चला मी निघतै मला क्लासला जायला उशीर होईल नाहीतर" ऋतुजा पाणीपुरी वाल्याला पे करून काढता पाय घेत म्हणाली..

"एक विचारू राकेश म्हणजे तु अजयला बोलला असेल पण मला वाटत तीच आहे? हो ना? " विनोद ऋतुजा गेल्यावर परत मुळ मुद्यावर येत म्हणाला...
"मी अजयला सुध्दा बोललो नाहीये यावर आणि तसही मला वाटतय की तुमचा गैरसमज हैतोय" राकेश म्हणाला..
"काय गैरसमज होतोय आमचा? घाबरू नकोस रे प्रपोज करून टाक तु ऋतू ला.. तसही तिला तु आवडतोस.. नकार नाही देणार ती तुला" अजय म्हणाला.
" हा भाई मला असच वाटत.... त्यातल्या त्यात आपल शेवटच वर्ष आहे... मला पण असच वाटत की तु प्रपोज कर तिला... तस तर मी वेळ मारून नेण्यासाठी बोललो ट्रिप बद्द्ल पण अस वाटतय खरच वन डे ट्रिप प्लान करावी लागणार... एक काम करू सोमवारची प्लान करू." विनोदने अजयच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
"पण मी ऋतू बद्दल बोलत नाहीये. " राकेश च्या या वाक्यावर दोघेही त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते.
"ऋतुजावर प्रेम नाहि करत तु? मग कोणावर प्रेम करतोस तु? " अजयने विचारले.
"अनुजा... मी अनुजावर प्रेम करतो, ऋतू ची लहान बहीण... ऋतू माझि फक्त मैत्रीण आहे... आणि तसही अनुने मला एकदा प्रपोज सुध्दा केल होत पण मी त्याकडे दुर्लक्ष केले होते.... " राकेशने दोघांची फिरकी घ्यायच्या उद्देशाने बोलला पण त्याला माहीत नव्हते की ऋतुजा बाजूच्या टपरीआड लपून त्यांचे बोलणे ऐकत होती...

राकेश परत अजय आणि विनोदाच्या चेहर्‍यावरचे भाव बघुन हसायला लागलेला आणि हो रे ऋतुजा वरच प्रेम आहे पण तिला प्रपोज करायची भिती वाटते हे बोलला पण त्या आधीच ऋतुजा रडत रडत दुसर्‍या बाजूने निघून गेली होती.

****

राकेश माझा मित्र आहे आणि जर त्याच अनुजावर प्रेम आहे तर मग माझ्यासोबत ईतका जवळीक करून का वागतो? माझ्यासमोर अनुजा आणि राकेश दोघेही फक्त मित्र असल्यासारखे वागतात.. तो माझ्यासोबत तिच्यापेक्षा चांगला आणि क्लोज राहतो मग अस का? अनुजा राकेशच मी अनुजावर प्रेम करतो, ऋतू ची लहान बहीण... ऋतू माझि फक्त मैत्रीण आहे... हे ऐकल्यावर तर जनू तिच्यावर आभाळ कोसळले होते... तिला राकेश आणि अनुजाच्या च्या वागण्याचा राग येत होता.... मेलीने त्याला प्रपोज केलं होत तर मग मला त्यांच्याबद्दल विचार करायला का लावायची... का मला त्याच्या नावाने डिवचायची? तिच्या मनात दोघांबद्दल राग, तिरस्कार निर्माण झाला होता... हीला तर जाब विचारलाच पाहिजे असा निर्धार करून ऋतूने अनूजाला फोन केला.... "अनू... मला तुझ्याशी महत्वाच बोलायचय आत्ताच्या आत्ता मला कॅनालपाशी भेट... " "अग ताई पण.. " अनु काही बोलनार त्याच्याआधीची ऋतुजाने फोन कट केला... नक्कीच काहीतरी घडलय त्याशिवाय अस नाही करणार ताई असा विचार करून अनुजा कॅनालकडे निघालि....

****
अनुजाने कॅनालपाशी ऋतुजा कुठे आहे हे शोधत होती... ऋतुजा कॅनालपाशी आल्यावर जिथे बसायची आज त्यापेक्षा थोडी जास्तच पलिकडे स्वतःशीच काहीतरी बडबडत अगदीच काठावर बसली होती..... ऋतुजाच्या पाठिशी जाऊन अनुजाने तिच्या रागाने थरथरणार्‍या खांद्यावर हात ठेवला "काय झाल ताई अशी थरथरत का आहेस?" अनुजाचा आवाज ऐकुन ऋतुचा पारा आणखीनच चढला... तिच डोक अगदीच जड झालं मनावर दडपण आले... ऋतू उठली अनुजाला चार शिव्या देत तिच्याआंगावर धाऊन गेली आणि... आणि रागाच्या भरात अनुजाला धक्का दिला... सगळ ईतक्या क्षणार्धात झाल होत की अनुजाला कळनार त्याच्याआधीच ऋतुने तिला कॅनालमध्ये ढकलून दिले होते... अनुजाला कॅनालमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी धडपडताना का काय माहित पण ऋतुजाला थोड बर वाटल ती तशीच घराकडे निघाली.... ऋतुजा रागारागाने पण आसुरी आनंदात घराकडे निघाली खरी पण घरी पोहचेपर्यंत हळूहळू तिचा राग शांत झाला आणि आपल्या हातुन काय घडलय याच्या अपराधबोध तिला झाला..... पण आता तिच्या हातात काही राहिल नव्हत जे घडायचे ते घडले होते... ती घरी गेली आणि दार आतून बंद करून धायमोकलुन रडायला लागली....
"काय केल मी हे... माझ्या स्वतःच्या बहीणी सोबत... खुप
मोठी चुक झाली माझ्याकडून... माझि अनु... मी
असे कसे करू शकते मी तिच्या सोबत... तिचा तर काही दोष नव्हता यात.." ऋतुला तिच्याच कृत्याचा राग येत होता आपण अस कस करू शकतो आपल्या बहीणी सोबत कस काय तिच्या जिवावर ऊठु शकतो? पण आता हा सगळा विचार करण्यात काही अर्थ नव्हता जे व्हायचे ते झाले होते... ऋतुला माहिती होत तिच्याकडून घडलेल्या अपराध तिला स्वस्थपणे जगु देणार नव्हता... अपराध बोधात जगण्यापेक्षा तिला स्वतःला संपवण जास्त सोपे होत.. आणि तिनेही तेच केल... कपाटात असलेल्या बाबांच्या झोपेच्या गोळ्यांची डबी रिकामि केली...
***
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults