तमिळनाडूचा इतिहास भाग-३

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 1 September, 2022 - 11:40

चित्रः ते पुस्तक ज्यात “द्रविड” शब्दाचा प्रथमतः ऊल्लेख केला गेला.

ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती.

कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत. त्यांनी ही भाषा युरोपीय लोकांशी संवादासाठी शिकली किंवा त्यांना मिशनर्यांनी शिकवली.
जेव्हा ब्रिटीश मद्रास वसवत होते तेव्हा त्यांना तिथे एक चर्च आढळलं. हे पाहून ते भांबावले.

“ईथे हे चर्च कोणी बनवलं? आमच्या आधीही ईथे कुणी आलं होतं का?”

“मी काही कोळ्यांना विचारले, काही मुसलमान याची देखभाल करायचे ते याला बोथूमा म्हणायचे”

“पण हे तर चर्च आहे.”

“ह्याची गोष्ट प्रभू येशूच्या काळाची आहे.”

“म्हणजे?”

“ईथे येशूच्या बारा प्रचारकांमधील एक संत थाॅमसची कबर आहे.”

“काय फालतू बडबड लावलीय? ते भारतात केव्हा आले? बरं आले तर त्यांनी बनवलेले ख्रिस्ती कुठं आहेत?”

“असं म्हणतात की त्यांना ईथल्या तमीळ हिंदूंनी मारून टाकले.”

“ह्याचा काही पुरावा?”

“काहीच पुरावा नाही. एक किस्सा तर मार्को पोलो ने लिहीलाय.”

“तो पण सांगूनच टाक”

“मार्को पोलो जेव्हा ईथे आले होते तेव्हा त्यांनी ह्या जागेला भेट दिली. त्यांनी एकलेली कथा लिहीलीय की संत थाॅमस ईथेच काही मोरपक्ष्यांसोबत बसले होते. तेव्हा एका शिकारी जातीच्या हिंदूचा बाण चुकून त्यांना लागला, ते ईथेच मेले.”

“ठिकाय, त्यांनी हे चर्च पाहीलं होतं?”

“नाही, त्यावेळी तर ही एक गढी होती, नंतर पोर्तूगिजांनी ह्याला किल्ला बनवले.”

“संत थाॅमसचं जे काम अपुर्ण राहीलं ते काम आमचे मिशनरी पुर्ण करतील”

“एकदा आपण ईथे स्थिरावलो तर ते कामही पुर्ण होईल.”

एकोनीसाव्या शतकाच्या सुरूवातीला मद्रास प्रेसीडेंसीत एकूण ११८५ मिशनरी शाळांत जवळपास ३८००० विद्यार्थी शिकत होते. तेव्हा बंगाल आणी मुंबई प्रेसीडेंसीत मिशनर्यांच्या ४७२ शाळा नी १८००० विद्यार्थी होते.

ह्या गणीताला काय अर्थ? ईंग्रजी शाळा सुरू झाल्या ही गोष्ट मद्रास साठी चांगली ठरली. ह्याचं तमीळनाडूच्या राजकिय भवितव्याशी काय घेणं देणं?

१८५६ मध्ये एक ख्रिस्ती मिशनरी राॅबर्ट काल्डवेल ने एक जाड संशोधनात्मक पुस्तक लिहीले, त्याच्या पहिल्याच पानावर ऊल्लेख होता-

“मनु ने सांगीतलंय - क्षत्रियांचे काही वंश ब्राम्हणांशी संपर्क तोडून आपला पवित्र धर्म विसरून “वृषाल(outcast)” बनलेत. - पौन्ड्रक, औद्र, यवन, कम्बोज, चीन, खासा….. आणी द्रविड!”

ह्या आधी जर “द्रविड” शब्द कुणी वापरला जरी असेल तरी त्याचा नेमका अर्थ काय असावा? पण काल्डवेल द्वारा “नव- अविष्कृत” ह्या शब्दाने एका चिंगारीचे काम केले, ज्याने दक्षीण भारताला ऊत्तर भारताहून वेगळा “वंश” बनवलं. कायमचं!
(क्रमशः)
मूळ लेखक- प्रविण झा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults