तमिळनाडूचा इतिहास भाग- २

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 1 September, 2022 - 08:40

पहिल्या भागाची लिंक

https://www.maayboli.com/node/82174

ओस्लोच्या एका दुकानातील “पन्नास टक्के सवलतीत” विभागात मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाच्या आवरनावर एक विशाल हत्ती होता, त्याच्या डोक्यावर जाळीदार कवच आणी पाठीवर मशाली बांधल्या होत्या. ही वयोवृध्द थ्रिलर लेखक विल्बर स्मिथ ह्यांची “घोस्ट फायर” कादंबरी होती. त्यातील गोष्ट त्या काळखंडापासून आणी त्या जागेवरून सुरू होते जिथून मी ही ईतिहासकथा सुरू करतोय.

आॅगस्ट १६३९ च्या एका दुपारी दोन ईंग्रज अधिकारी पुलीकट च्या दक्षीणेला समुद्राकाठच्या एका ओसाड जमीनीचे निरीक्षण करत होते.
“काय वाटतं?” आपल्या कारखान्याला हा जागा ठीक राहील?” फ्रांसील डे बोलला.

“आता विचारतोय? मी वेंकटाद्रीशी बोलणं फायनल करून आलोय” ऐंड्र्यू बोलला.

“बर्याचदा आपण आपल्या निर्णयावर तेव्हाच शंका घेतो जेव्हा निर्णय घेतला गेलेला असतो.”

“तू चंद्रगीरीच्या महाराज वेंकटराय चं वैभव पाहीलं आहेस का? काय अलिशान महाल! हत्ती, घोडे, नर्तक्या…”

“आपल्याला त्याच्याशी काय? मी तर ही जागा स्वस्त कपडे बनवण्याकरता निवडलीय, २० टक्क्यांपर्यंत नफा होईल”

“तुला काय वाटतंय महाराज ही जागा अशीच देताहेत?”

“तो महाराज आता संपत चाललाय, त्याला आपल्या सैन्याची नी शस्त्रांची गरज आहे.”

“त्याची चिंता सोड, पुलीकटात डचांनी शिरकाव केलाय, कंपनीला सांगावं लागेल की ह्या हरामींना पाय पसरू देऊ नका, त्यांच्या बाजूचीच जमीन घेऊन तू योग्य निर्णय घेतला आहेस.”

“हो आपण ईथेच आपला भव्य
किल्ला बनवू, महाराज आणी डचांच्या किल्ल्यापेक्षाही मोठा आणी आधूनीक. ईथे नदी किनारी आणी समूद्राकिनारी प्लाॅट कापून युरोपीय वस्ती वसवू.”

“हा विचार चांगलाय, हे काळे लोक शहरापासून दूरच हवेत, फारच असंस्कृत लोक आहेत.”

“ते वेंकटाद्री पाहील, मी कळवलंय त्याला कोळ्यांचं गाव रिकामं करायला.”

“ते ठिकाय. पण त्या कोळ्यांत तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का?”

“काय?”

“ते दिसायला दुबळे असले तरी त्यांच्यात ताकद आफ्रीकी लोकांसारखी आहे”

“तूला काय म्हणायचंय? ह्यांना पकडून विकायचं?”

“मी तर फक्त विचार करतोय, पैसे मिळाले तर काय वाईट? तसंही कंपनी देतेच किती? थोडं फार आपणही कमवायला नको का?”

“हो हो! हे पण बरोबर आहे, कमवायला ईथे भरपूर आहे आणी कंपनीला कळनारही नाही. म्हणून तर ईतक्या ऊष्ण वातावरणात ह्या काळ्या लोकांत घाम गाळतोय. पण नाव काय ठेवायचं शहराचं?”

“तू सांगत होतास ना कुठलंतरी गाव आहे कोळ्यांचं?”

“मदर…”

“हो, हे काय लिहीलंय ना कागदात.
मद्रासा..पट्टनमा..”

“एखादं सोपं नाव? मैड्रास ठीक राहील.”
लिही - M..A..D..R..A..S
(क्रमशः)

मूळ लेखक :- प्रविण झा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रविण झा यांचं पुस्तक कधीचं आहे आणि प्रताधिकारमुक्त झालंय का? किंवा आताचे उतारे कोणत्या पुस्तकातले? >>>
तूम्ही आंबे खा हो फक्त. बाकीचं माबो प्रशासनावर सोडा.

अमरेंद्र बाहुबली >> प्रश्न बरोबर आहे. गुलमोहर या विभागात फक्त स्वतः लिहिलेलं साहित्य अपेक्षीत आहे. तुम्ही मूळ लेखकाची परवानगी घेतलि आहे का?

प्रश्न बरोबर आहे. गुलमोहर या विभागात फक्त स्वतः लिहिलेलं साहित्य अपेक्षीत आहे. तुम्ही मूळ लेखकाची परवानगी घेतलि आहे का? >>>
व्यनि पहा.

आंबे खाऊ हो.पण लेखाच्या शेवटी मूळ लेखक :- प्रविण झा. असं लिहिल्याने विचारलं. आधारित आहे काय? किंवा मग पुस्तकाची समीक्षा लिहावी.

आधारित आहे काय? किंवा मग पुस्तकाची समीक्षा लिहावी. >>>
नको. चाललंय तेच चालूदेत.

पुस्तक वाचनीय दिसतंय. पण srd यांचा प्रश्न योग्यच आहे. भाषांतर करण्यासाठी परवानगी घेतली असेल तर प्रश्न नाही, किंवा मूळ लेखन भाषांतरित करायला प्रताधिकाराचा अडथळा येत नसेल तरी ठीक आहे. परंतु त्याची खात्री करून घ्यावी ही विनंती. माबो प्रशासन योग्य काय ते ठरवीलच. पण वाचकांना (ज्यात काही लेखकही आहेत) ती पार्श्वभूमी कळणे महत्त्वाचे वाटते.

पण वाचकांना (ज्यात काही लेखकही आहेत) ती पार्श्वभूमी कळणे महत्त्वाचे वाटते. >>>>
नको. त्यांना सांगा आहे त्यात समाधान माना.