मायबोली गणेशोत्सव २०२२ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 20:53

2022 hgu murti-2-final-V2.jpg

योग आणि तंत्र मार्गानुसार, प्रत्येक मनुष्याच्या मेरुदंडाच्या शेवटी, अचित, असीम शक्तीशाली, रहस्यमय शक्ती, सुप्तावस्थेमधे निद्रिस्त असते, जिला कुंडलिनी असे नाव आहे. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. ही शक्ती मेरुदंडातून वरवर चढत जाउन जेव्हा ७ चक्रांचे शुद्धीकरण करुन, सहस्रार चक्रात पोचते तेव्हा, शिव-शक्ती मीलन सोहळ्याचा अनुभव जीवास येतो. ज्ञानेश्वरीमधे चक्र शुद्धीकरणाच्या आणि कुंडलिनी जागृत होण्याच्या टप्प्यांचे अत्यंत रसाळ वर्णन येते. सुप्तावस्थेतिल कुंडलिनीचे वर्णन करताना, ज्ञानेश्वर म्हणतात -

नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।अधोमुख सर्पिणी ।निजैली असे ॥

तर ही कुंडलिनी कशी आहे? जणू कुंकवात न्हायलेले, नागाचे पिलू, औट म्हणजे साडेतीन वळणांचे, वेटोळे घालून निजलेले असते तशी, ही कुंडलिनी, निद्रिस्त आहे. सुप्तावस्थेतील कुंडलिनीचा वास कुठे आहे, तर मूलाधार चक्रात. मूलाधार चक्राचा रंग कोणता असतो तर लाल, कुंकवासारखा. योगमार्गानुसार, या मूलाधार चक्राची देवता आहे श्रीगणेश. अर्थात या चक्रावर अधिराज्य आहे गणपतीचे. जोपर्यंत गणपती प्रसन्न होत नाही तोपर्यंत ना कुंडलिनी जागृत होणार, ना शिव-शक्तीचे मीलन होणार. आता आठवा जगदंबेच्या म्हणजे पार्वतीच्या, विनंतीनुसार, गणपतीने दारावर दिलेला पहारा. साक्षात शंकरसुद्धा, गणपतीस ओलांडून जाउ शकले नाहीत. म्हणजे शिव-शक्तीचे मीलन हे गणेशाच्या रुकाराशिवाय होउच शकत नाही हा त्याचा मथितार्थ.
तर मंडळी अशा विघ्नहर्त्या गणेशाचे, बुद्धीच्या देवतेचे, आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करुया.

||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वरचं रोचक आहे. आपण एरवी विघ्नहर्ता म्हणून गणपतीची पूजा करतो. पण शुक्ल वस्त्रे ल्यालेल्या विष्णूचंही सर्वविघ्नोपशांतये ध्यान केलं जातं. शेवटी सगळे देव हे एकच आहेत हाच संदेश आपण यातून घेऊ शकतो.

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ
निर्वीघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया

मोरया मोरया, मी बाळ तान्हे |
तुझीच सेवा करु काय जाणें |
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा, तू घाल पोटी ||

मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा

मयूरेश हा पूर्ण लावण्यराशी| न लीला कळे लेश पद्मावराशी
सदा सेवकाला तो साह्य व्हावा | मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा
.
महादोष जाती जयाच्या सुनामे| घडे सद्गती पूर्ण होताती कामे|
तशी सर्व सिद्धी मिळे मोक्ष मेवा| मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा|
.
गणेशान उच्चारीता नाही कष्ट| नव्हे ते मुळी गातीता अर्थ शिष्ट|
महापाप संसार सिंधू तरावा|| मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा|
.
बहु साधनी एक हे साध्य सार| गणेशान हे नाम पाहे विचार
मना तू नको संशया देऊ थारा| मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा|
.
मना होइना योग ना भोग काही|घडे कर्म ना धर्म ना शर्म काही
तया पुण्यनामी भरवसा धरावा|मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा|

मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा|

* काही शब्द चुकलेले असावेत. कारण स्तोत्रात नीट ऐकू आले नाहीत व गद्य जालावर सापडत नाही.

नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदुर पाझरे, वरि बरे दुर्वांकुरांचे तुरे ।
माझे चित्त विरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे ।
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥

गजाननं भूतगणाधि सेवितमं कपित्थजम्बु फलसारभक्षितम् |
उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||

तुझे ठायी ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती,
धरणीधरा ऐसे द्यावे सर्वाभूती लीन व्हावे
तुज शरण, आलो पतित मी जाण,
तुझा अपराधी मी खरा आहे हे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना,

>>>>इक्षुचापधरा - हा शब्द कधी नीट ऐकला नव्हता मी. छान आहे. उसाच्या दांड्याचे धनुष्य ज्याने धरले आहे तो.
_/\_ होय किती सुंदर शब्द/वर्णन आहे.

ॐ गं गणपतये नमः |

परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकम् ||

सुरासुरेन्द्रै: सिद्धेंद्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||

इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ||

प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा |
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे, आराध्य मोरेश्वरा |
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा, गणनायका, गजमुखा, भक्ता बहू तोषवी ||

गजवदना श्रीलंबोदरा । सिद्धिविनायका भालचंद्रा ।
हेरंबा शिवपुत्रा । विघ्नेश्र्वरा अनाथबंधु ॥ ८ ॥
भक्तपालका करीं करुणा । वरदमूर्ति गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा । विघ्ननाशना मंगलमूर्ति ॥ ९ ॥
विश्र्ववदना विघ्नेश्र्वरा । मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्र्वरा । दीनबंधु नाम तुझें ॥ १० ॥
नमन माझें श्रीगणनाथा । नमन माझें विघ्नहर्ता ।
नमन माझे एकदंता । दीनबंधु नमन माझें ॥ ११ ॥
नमन माझें शंभुतनया । नमन माझें करुणालया ।
नमन माझें गणराया । तुज स्वामिया नमन माझें ॥ १२ ॥
नमन माझें देवराया । नमन माझें गौरीतनया ।
भालचंद्रा मोरया । तुझे चरणीं नमन माझें ॥ १३ ॥

गणपती, तुझे नाव चांगले । आवडे बहू चित्त रंगले ।
प्रार्थना तुझी गौरिनंदना । हे दयानिधे श्रीगजानना ॥

आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् | मंगलं परमं रुपं श्री गणेशं नमाम्यहम् ||

स जयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् |
वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ||

तू सुखकर्ता, तू दु:खहरमोर, विघ्नविनाशक मोरया |
संकट रक्षी, शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ||

ही कविता/गाणे कोणाला पूर्ण माहित आहे का ?

Pages