प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा

Submitted by संयोजक on 27 August, 2022 - 06:01

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा

पाणी हे जीवन आहे. भर उन्हात डोंगरदर्यातून फिरताना एखादा झरा, ओढा वाटेत लागला की त्याचं पाणी किती गोड लागतं हे फिरणाऱ्याला चांगलंच जाणवतं.
तर आजचा विषय आहे जलाशय. विहिर,नदी, शेततळे,तलाव, ओढा, झरा, धरण, समुद्र, कुंड अशा प्रकारची कोणतीही जलाशय असलेली प्रकाशचित्रे झब्बू म्हणून द्यायची आहेत.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.

Screenshot_20220907-090841_WhatsApp.jpg

हे कोल्हापूर जवळील रामलिंग या ठिकाणी असलेलं कुंड आहे. इथे डोंगरावरून बाराही महिने पाणी झिरपत असतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा बाळ कसलं खुश झालंय, मस्त फोटो.
स्वरूप फोटोतला फोटो सुंदर.
अवल पटकन पाहैल तर फेसाळती लाट वाटतेय ती.

हा नागावच्या बदामी बीचवरचा सूर्यास्त
Screenshot_20220907-191524__01.jpg

water.jpg

'गोठू' हा कुठला फोटो आहे?
इतका स्वच्छ (स्नो विरहित) किनारा आणि गोठलेलं पाणी कधी बघितलंच नाहीये. कायम बदाबदा स्नो पडतो आधी. या फोटोत फक्त तापामानामुळे गोठलेलं आहे पाणी.

अमितव पारखी नजर Happy
2019 च्या ख्रिसमसला न्युयॉर्क टू पिटर्सबर्ग प्रवासात लेकाने जरा वाकडी वाट धरून Beer mountain state park मधून नेलं. तो रस्ता फार आवडलेला त्याला. तिथे अनेक तळी आहेत त्यातलं हे एक तळं. या पुढे एक भलं मोठं तळं होतं, ते तर 80% फ्रोजन होतं. गंमत म्हणजे लाटाही फ्रोजन झालेल्या. काही पाणी वाहतं होतं तर तिथे वाऱ्यामुळे अजून लाटा उठत होत्या. व्हिडिओ काढलाय त्याचा.

मेघना मस्त
पुणेकर चित्रच जणु
स्वरुप कोकण आहा

इथे फोटो बघून गेलेले, प्रतिसाद द्यायचा राहिला.

एकापेक्षा एक फोटो येताहेत बाहेर सगळे >>> अगदी अगदी. अप्रतिम सर्वच.

पाणी म्हणजे जीवन. पाणी शब्द असलेली सर्व गाणी एकापाठोपाठ एक आठवतायेत.

एका पायावर ध्यानमग्न तपस्या!
bako.jpg

Pages