
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येती सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे" - बालकवी
मायबोलीकरांनो, उन्हाळा मध्यावर येऊन ठेपलेला असल्यापासून आपल्याला पावसाळ्याचे वेध लागलेले असतात. चातक, शेतकरी, वन्यजीव आणि इतर सर्वही पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद तर सगळ्यांनीच अनुभवला असेल. अशा पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी, धबधबे , तलाव अशा ठिकाणी वर्षासहलींना सुद्धा नक्क्की गेला असाल. तिथे नेत्रसुख देणारा हिरवागार निसर्ग, नद्या डोंगर यांचे फोटो आपल्या कॅमेरात कैद केलेले असतील आणि हृदयावर सुद्धा कोरलेले असतील. हेच कोरलेले पावसाळ्यातील कोणतेही दृश्य आपल्याला कागदावर काढायचे आहे.
नियम-
१) ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी मायबोलीचे सदस्य असणे गरजेचे आहे.
२) प्रवेशिकेला चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य." - मायबोली आयडी -खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशास्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे शीर्षक द्यावे.
३) चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
४) चित्रं गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
५) कितीही प्रवेशिका देऊ शकतो. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी
चला मंडळीनो , लवकरात लवकर पाठवा तुम्ही काढलेली छान छान चित्र.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!