प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ६ - भांडीकुंडी

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:43

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ६ - भांडीकुंडी

भांडीयेsss भांडीयेsss भांडी घ्या भांडी अशी आरोळी ठोकत एखादी बोहारीण आजही काही भागात फिरते. हरतऱ्हेची भांडी घरात असली तरी जुन्या कपड्याची गाठोडी तिच्यापुढे उलगडत घरची गृहिणी एक तरी कुंडा ,सट तिच्या बुट्टीतून उचलतेच. पूर्वी पानं, टोपली, दगडाचा खोलगट भाग अशा वस्तूंचा भांडी म्हणून वापर व्हायचा. आता मात्र भांड्यांची जंत्री काय सांगावी! गडू, किसणी, चाळणी, खवणी, रोवळी, बुधली, अडणी , तामली पासून काहील, काथवट, तसराळं, घमेलं, मुदाळं.... नुसतं देवघरात डोकावलं तरी तांब्या- पळी, तबक, करंडा, कोयरी, परडी... किती सांगू? कुठला समारंभ असला की अत्तरदाणी , गुलाबदाणी बाहेर काढली जातेच.
यातही पुन्हा लाकडी, मातीची, तांब्या- पितळेची, लोखंडी पासून कोरल, बीड, मेलामाईन, काच, सिरॅमिक अशी विविधता आहे.

या प्रकाश चित्रांच्या खेळातून अशाच विस्मृतीत गेलेल्या भांड्यांपासून आधुनिक भांड्यांची झलक बघूया.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, काय सुंदर आहे सट!

झब्बू म्हणून मायबोलीकर रूनी पॉटरने केलेलं भांडं :
(कुठे गायबली आहे ती? तिला म्हणावं ‘परत ये, तुला कोणी काही बोलणार नाही!’ Happy )

A8BC43FF-F975-491C-A91F-683391ACFE91.jpeg

Pages