हस्तकला उपक्रम २ - छोटा गट - छोटे कुंभार

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 17:51

clay animals2.JPG

बालगोपाळांनो , मडकी बनवणारा कुंभार तर तुम्ही बघितलाच असेल, प्रत्यक्षात बघितला नसेल तरीही फोटोत, चित्रपटात नक्कीच बघितला असेल. एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन तो मडकी , वेगवेगळी भांडी आणि प्रतिकृती बनवत असतो. त्याच्यातील हीच कलात्मकता तुमच्यात जोपासली जावी म्हणून आम्ही यावेळेला घेऊन येत आहोत हस्तकला उपक्रम "छोटे कुंभार" .
यात तुम्हाला माती, खेळण्यातील क्ले किंवा पिठापासून कोणतीही कलाकृती बनवायची आहे. एखादा प्राणी, पक्षी, वस्तू काहीही चालेल. तर लवकरच बनवा तुमची आवडती एखादी प्रतिकृती आणि त्याचे फोटो पाठवा.

साहित्य :
१) माती किंवा खेळण्यातील क्ले किंवा पीठ.
२) रंग, ब्रश
३) शोभेसाठी आणि प्रेझेन्ट करायला काही प्रमाणात शोभेच्या वस्तू वापरू शकता.

नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) प्रतिकृतीचे दोन ते तीन वेगवेगळ्या कोनातून घेतलेले फोटो द्यायचे आहेत.
३) प्रवेशिकेला "हस्तकला उपक्रम - २ :* छोटे कुंभार ." - मायबोली आयडी - छोट्या दोस्तांचे नाव. अशा प्रकारे शीर्षक द्यावे.
४) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
५) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
६) हस्तकला प्रतिकृतीचे फोटो गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
७) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users