लेखन उपक्रम-१ - गणपती: एक चिंतन

Submitted by संयोजक on 24 August, 2022 - 17:34

Ganapati-ek chintan- Final_0.jpg

हिंदू धर्मात ३३ कोटी देवीदेवता आहेत. यांपैकी किती देवतांनी, आपल्या बाप्पासारखं मनावर गारुड टाकलं आहे. फार थोड्या. किंबहुना, बाप्पाने जी काही भुरळ जनमानसाच्या सामूहिक मानसावरती घातलेली आहे तशी कोणत्याच अन्य देवतेने घातलेली नाही. अगदी गणपतीचे मानवीकरणही लोकगीतांमध्ये, काही स्तोत्रांमध्ये येते. शंकरपार्वतीचे बालकौतुक यासारखे अनेक विषय यात आहेत.

असा, सदा बालरुपी गणेश, आपल्याशी कोणत्या नात्याने बद्ध आहे? सुजाण रसिक, माबोकरांनी, त्यांच्या स्वतःच्या, गणपतीबरोबर असलेल्या नात्याचे कंगोरे चाचपून आम्हालाही सांगावेत म्हणुन आम्ही २०२२ गणेशोत्सवानिमित्त, आवाहन करत आहोत - तर येउ द्या गणेशासंबंधी चिंतनात्मक लेख. यात कोणी वैचारीक भूमिका मांडतील तर कोणी भावनिक. कोणाला बाप्पाचे बालरुप मनस्वी आवडत असेल तर कोणाला बुद्धीची देवता. उठा मंडळी , सरसवा आपापली लेखणी आणि करा गणेश चिंतनाचा श्रीगणेशा.

१) हा मायबोलीकरांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) प्रवेशिकेला "गणपती: एक चिंतन." - मायबोली आयडी अशा प्रकारे शीर्षक द्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हा देखील विषय.
गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाबद्दल जितके लिहावे तितके कमी आहे.
एक स्पर्धा दोन उपक्रम.. यावेळी लिखाणाची सोय भरपूर आहे.
नेमके वर्कलोड वाढलेय. तरी शक्य झाल्यास.तिन्ही विषयांवर लिहायला आवडेल Happy