लेखन उपक्रम २- मर्मबंधातील एखादे नाते

Submitted by संयोजक on 24 August, 2022 - 17:09

marmabandhatil nate-Final.jpg

दिवसातून किती वेळा , आपण आरसा पहातो. का? तर आरशामध्ये आपले प्रतिबिंब कसे आहे ते आपल्या लक्षात येते. आपण आपल्याला स्वतःला नीटनेटके ठेउ शकतो. पण आपल्या मनाचे प्रतिबिंब कोठे पहायचे? मनाला देखील तर नीटनेटके करण्याची गरज असते नाही का! तर मनाचा आरसा असतात नातेसंबंध. विविध नात्यांतून मनाचे रुपडे आपण न्याहाळू शकतो.

तर मंडळी, आज आपण लिहीणार आहोत काही हळव्या, काही पूरक तर काही मनस्वी नातेसंबंधांबद्दल. मग ते गुरु-शिष्य, पती-पत्नी, मैत्र अथवा अगदी अनाम, नातेसुद्धा असू शकते. होय! सर्वच नाती, नावाच्या परीघात बांधता येत नाहीत. सर्वच नात्यांना नावाच्या चौकटीत बांधण्याचा अर्थहीन प्रयत्न/अट्टाहास करता येत नाही. सर्वच नात्यांना नावाच्या पिंजर्‍यात,कोंडता येत नाही. अशा नात्यांबद्दल वाचायलादेखील आपल्याला सर्वांना आवडेल नाही का.

तर घ्या पाहू, पेन, आणि मांडा तुमची अनवट नाती, तुमच्या शब्दात. काही गोड असतील, काही तुरट. कशीही का असेना, पण ती तुमची, आपलीशी असतील.

१) हा मायबोलीकरांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) प्रवेशिकेला "मर्मबंधातील एखादे नाते." - मायबोली आयडी अशा प्रकारे शीर्षक द्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय आहे
वेळ निळेल तसे लिहिता येईल ईथेही.