"हर घर तिरंगा" - स्वातंत्र्याची ७५ वर्षे

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2022 - 17:22

सर्व मायबोलीकर मित्रमैत्रीणींना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy

यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आले आहे. त्यानुसार १३ ऑगस्टच्या सुर्योदयापासून १५ ऑगस्टच्या सुर्यास्तापर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं होते. यात कुठलीही सक्ती नव्हती पण ज्यांची यात सहभाग नोंदवायची ईच्छा होती त्यांना झेंडे सरकारतर्फे मोफत मिळत होते. आमच्याईथे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घ्यायचे होते. पण आमच्या सोसायटीने एक काम छान केले. सर्वांसाठी म्हणून एकत्रच घेतले आणि घराघरात वाटप केले.

पण मी ठरलो आळशी. लावतो लावतो म्हणून वैयक्तिक कामात बिजी राहिलो आणि १३ तारखेला झेंडा लावायचे राहिले. संध्याकाळी फिरायला बाहेर गेलो असताना बिल्डींगकडे एक नजर टाकली तर ऊर अभिमानाने भरून आला. खरेच बिल्डींगच्या प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकत होता. छान वाटले बघायला. एक आपल्याच घरावर तिरंगा फडकत नाहीये हे बघून चुकचुकल्यासारखे वाटले.

घरी आल्यावर सुर्यास्तानंतर झेंडा फडकवायचा नाही म्हणून मग १४ तारखेला लवकर ऊठून आंघोळ करून पहिले काम तेच करायचे ठरवले. पण त्याआधीच माझी वाट बघून बायकोचे झेंडा लाऊन झाले होते. अर्थात पहाटे वॉचमन सुद्धा आठवण करून द्यायला आला होता. सक्ती म्हणून नाही. त्याला कदाचित पुढाकार घेतलेल्या सोसायटी मेंबरनीच असे करायला सांगितले असावे. सोसायटी एकजूट दाखवून काही करत असेल तर ते चांगलेच आहे.

पण त्या खिडकीवरील झेंडा फडकताना कबूतर जाळीवर अडकत होता. एकदा लावलेला झेंडा आता तिथून काढून पुन्हा दुसर्‍या जागी लावणे योग्य का अयोग्य वा कसे हे माहीत नव्हते. पण तरी झेंडा फाटणे हे नक्कीच अयोग्य होईल म्हणून मग मी झेंड्याची जागा बदलली. आता तो आणखी दिमाखात फडकू लागला.

त्याआधी जी मुले नाचो नाचो गाणे गात नाचत होती ती अचानक वंदे मातरम गाणे गाऊ लागली. झेंडा नवीन जागी लावतानाही मदत करायला पुढे होती. अचानक घराचे वातावरण बदलून गेले. जसे धार्मिक सणांना घरात एक मांगल्याचे वातावरण असते तसेच काहीसे वातावरण या राष्ट्रीय सणाला दिसू लागले. मुले कपडे बदलून झेंड्यासोबत फोटो काढायच्याही तयारीत होते. पण मीच त्यांना आवरले. उद्या सोसायटीचे ध्वजारोहण होईल तेव्हाच हा सण साजरा करूया म्हटले.

तरी कौतुकाने फडकणार्‍या झेंड्यांचे दोन चार फोटो आणि विडिओ काढले. त्या विडिओत "८३" चित्रपटातील देशभक्तीपर गीत जोडून व्हॉटसप स्टेटसला लावले आणि सोसायटीच्या ग्रूपवरही टाकले. तसे तासाभरात आणखी सहा सात जणांच्या स्टेटसला तो विडिओ दिसू लागला. लोकांनी आपल्या सोसायटीतीलच झेंडा आहे म्हणत कौतुकाने तो आपल्या स्टेटसला ठेवला होता. तर मलाही आपण फडकवलेल्या झेंड्याचा विडिओ सोसायटी मेंबर आवडीने शेअर करत आहेत याचा एक आनंद झाला. ही जी आपलेपणाची भावना आहे, एकात्मतेचा विचार आहे, एकजुटीने सहज घडणारी कृती आहे, हेच तर सारे आजचा दिवस घेऊन येते Happy

पुन्हा एकदा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

IMG_20220815_022956.jpg

.

आमच्या झेंड्याचा विडिओ ईथे बघू शकता - लहरा दो Happy
https://youtube.com/shorts/65XprJ_IeMM?feature=share

ज्या मायबोलीकरांनी या अभियानात सहभाग नोंदवला त्यांनी आपल्या घरी फडकवलेल्या झेंड्यांचे फोटो, विडिओ बघायला आणि त्यांचे याबद्दलचे अनुभव वाचायला आवडतील. तसेच १५ ऑगस्टच्या दिवशी तुमच्या सोसायटीमध्ये जे ध्वजारोहण होईल ते ही बघायला आवडेल Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशप्रेम आणि देशभक्ती ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
आपल्या पूर्वजांनी झाडे लावली हे देशप्रेम.
त्या झाडाची फळे चाखून, त्याला कापून त्याच्या दांड्यात झेंडा फडकवणारे आम्ही, ही देशभक्ती.

मुंबई महापालिकेने दिला सल्ला

हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गंत देण्यात आलेले राष्ट्रध्वज हे अभियान संपल्यानंतर नागरिक त्यांच्या घरी जतन करुन ठेवू शकतात. या मोहिमेची एक आठवण म्हणून नागरिक तिरंगा घरीच जपून ठेवू शकतात. व पुढील वर्षी हाच तिरंगा पुन्हा वापरु शकतात, असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने दिला आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/store-tricolour-saf...

या लेखावरील मा. हेमंत ३३ यांचे विचार ऐकुन माझा मानस मीच पालटवुन घेतला आहे.
यापुढे हेमंत ३३ हे सर नं २ (दोन्सर- सर २) म्हणुन माझ्याकडुन नावाजले जातील याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ( नाऊ वी अनाउन्स दॅट वी आर द "एअर फोर्स वन" च्या चालीवर वाचावे).
श्री. नरेंद्र मोदींनी हा हिरा जिथे असेल तिथुन उचलुन भारताच्या शिरेपेचात मानाने खोवुन द्यावा. (हेचि फळ यांचे तपाला)

राजे महाराज च्या काळात ज्याच्या कडे ध्वज
ची जबाबदारी असे तो .
तो ध्वज खाली पडून देत नसे किंवा झुकून पण देत नसे .
रण भूमीवर.
आपल्या ऋनमेष साहेबांनी जो फोटो धाग्यावर टाकला आहे त्या मध्ये सरळ दिसत आहे ध्वज सरळ उभा नसून तो झुकलेला आहे.
तिरका आहे.

हेमंत, हो मान्य आहे. झेंडा सोयीनुसार लावला आणि फडकताना ग्रिलवर आपटू नये म्हणून तिरपा केला. तेव्हा माझ्या मनातही हा विचार आलेला की याबाबत प्रोटोकॉल काय म्हणतो.. पण असे बरेच प्रश्न बरेच लोकांना पडले असणार आणि ते त्यांनी आपल्या मनाने सोडवले असणार. तरी याऊपर जे घडूच नये, वा अमुकतमुक प्रकारेच घडावे ईतके महत्वाचे जे असेल त्याची सरकारतर्फेच एक नियमावली जाहीर करणे योग्य राहील.

आज व्हॉटसपवर एक विडिओ पाहिला. त्यात झेंडा उतरवल्यावर तो कसा घडी करून ठेवायचा याची पद्धत सांगितली होती. माझ्यापर्यंत तो पोहोचला मी ते आता फॉलो करेन. पण अश्या अनेक गोष्टी असतील.

काही वाद नाही.
७५ वा स्वतंत्र दिवस आहे.
७६ व काही नाही.
७५ वर्ष १ महिना . आणि पुढे सिरियल wise.
हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.
अगदी सिंपल आहे
१ नंतर सरळ दोन वाजत नाहीत

१ वाजून १० मिनिट.
दीड असे वाजतात .
अगदी सिंपल आहे.
असल्या ७५/७६ मध्ये भारतीय शिक्षित पण कन्फ्युज होत असतील तर देश खूप च आज पणं मागास आहे.
कोणी तरी उनाड व्यक्ती नी समाज माध्यमावर हवा केली.
७५ व स्वतंत्र दीन आणि ७६ व अमृत महोत्सव.

आणि मूर्ख जनता मूर्ख बनली.
शिक्षित जास्त मूर्ख बनले.
ह्या प्रसंगातून सिद्ध होत आहे भारतीय लोकांना कोणी ही मूर्ख बनवू शकते.
शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे

अरे हो, हेमंत. विडिओमध्ये आधी झेंडा ऊभा लावलेला ते ही आहे. पहिल्या सहा-सात सेकंदात दिसेल. पण त्या अवस्थेत वार्‍याने जरा हाल होत होते असे वाटले म्हणून बदलला. जर तसाच काही प्रोटोकॉल माहीत असता तर ईतर सोय न बघता आधी तो जरूर फॉलो केला गेला असता.

७५ व स्वतंत्र दीन आणि ७६ व अमृत महोत्सव.
......
Submitted by Hemant 33 on 16 August, 2022 >>>>

हे बरोब्बर उलट असावे ना.
७६ वा स्वातंत्र्यदिन व ७५ वर्षे पूर्ण म्हणून अमृत महोत्सव

सर आणी दोन्सर यांच्या लठ्ठालठ्ठीत मी एक गोष्ट नम्रपणे लक्षात आणुन देवु इच्छीतो की मा. केजरीवालांना सुद्धा झेंडा पेलवला जात नव्हता म्हणुन ते सामुहिक कार्यक्रमात झेंडा कमरेच्या थोडा वर आणी आडवा फडकवत होते.

जेम्स सत्य मांडा.
राजकिय,धार्मिक मत चा प्रभाव nakara.
देवा नी sorry निसर्गाने मेंदू दिला आहे त्याच पण ऐका.
इथे फक्त लहरी राजा चा संबंध आहे आणि आंधळ्या प्रजेचा.
केजरीवाल ह्यांचा काही संबंध नाही

इथे अमेरीकेत वर्षाचे ३६५ दिवस घराबाहेर झेंडा फडकवणारी जनता आहे आणि झेंड्याच्या प्रिंटवाल्या चपला, चड्ड्या घालणारीही आहे.. पण दोन्हींमधे देशप्रेम ठसठसून भरलंय

अमेरिका आणि भारताची तुलना होवूच
शकत नाही.

दोन्ही देशात खूप फरक आहे
आणि अमेरिकन लोक आणि भारतीय लोक ह्यांची तुलना तर अशक्य च आहे.
आता पण होत नाही आणि पुढे पण होणे शक्य नाही...अमेरिकन भारतीय लोकांसारखे आंधळे नक्कीच नाहीत

७५ वा का ७६ वा स्वातंत्र्यदिन हा वादाचा किंवा मताचा मुद्दा नाहीये. ती फॅक्ट आहे. भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट्सवरही तसंच नमूद केलंय. पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ रोजी होता. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली. (75th anniversary of Indian independence).

पण मला एक शंका आहे....
७५ वा वाढ्दिवस म्हणजे हिरक महोत्सव असतो ना?
जसे २५ वा रजत महोत्सव, ५०वा सुवर्ण महोत्सव, ७५वा हिरक महोतसव, आणि १०० वा अम्रुत महोत्सव असायला पहिजे...
??????

आणि अमेरिकन लोक आणि भारतीय लोक ह्यांची तुलना तर अशक्य च आहे.
आता पण होत नाही आणि पुढे पण होणे शक्य नाही...अमेरिकन भारतीय लोकांसारखे आंधळे नक्कीच नाहीत>> सर दिवाळीच्या आधीच फटाके वाजवताहेत.

१५ /८/१९४७ देश स्वतंत्र.
(जन्म झाला भारताचा(
१५/८/१९४८ पहिला स्वतंत्र दीन.
काही कन्फ्युज होण्यासारखे नाही.

@ फेरफटका, हेमंत आणि ईतर

अ) ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
ब) ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

यातले काय बरोबर तेवढेच सांगा. वाढदिवस, वर्धापनदिन, ॲनिवर्सरी असे नवनवीन शब्द वापरून कन्फ्यूज करू नका Happy

७५ व स्वतंत्र दिवस आणि ७५ वेच अमृत महोत्सवी वर्ष हेच बरोबर आहे आणि सरकार नी हेच शब्द प्रयोग वापरले आहेत ते योग्य च आहेत.

स्वातंत्र्यदिन एकच असतो आणि तो 1947 साली होऊन गेला.
त्यानंतरचा कुठलाही स्वातंत्र्यदिन हा स्वातंत्र्यवर्धापनदिन याच अर्थाने
आपण म्हणत असतो हे understood आहे.
त्यामुळे अ बरोबर आहे.

७६ मोजणे काही कठिण आहे का? १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तो पहिला स्वतंत्रता दिन. यात ओपिनिअन कसा काय असू शकतो?

Pages