शांततेने घेरले

Submitted by निशिकांत on 28 July, 2022 - 02:27

आज वेगळ्या धाटणीची छोटी गझल पेश करतोय. २० जुलै हा कारगिल दिन म्हणून पाळला जातो. एका वाहिनीवर या निमित्त प्रसारीत झालेला कार्यक्रम पाहिला आणि जुन्या दु:खद आठवणी ताज्या होऊन जाग्या भळभळाया लागल्या.. हे घडले तेंव्हा या बाबत बातम्या रोज येत होत्या. ही गझल म्हणजे माझ्या भावनांचा उद्रेक आहे. ही गझल कदाचित सदोषही असेल. भावना समजून घ्याव्यात.

वादळाला शांततेने घेरले
मानवाला जे हवे ते जाहले

काफिरांना ओळखा हिरव्यातल्या
संपवा! धर्मास ज्यांनी बाटले

भेकडांनी काढताना पळ, इथे
आपल्या मृत सैनिकांना सोडले

पाक म्हणजे देश जो नापाक अन्
धर्मकट्टर लोक त्यांनी पोसले

अस्तिनीतिल साप असुनी देश तो
वार त्याचे आजवर का झेलले?

वेळ आली पाकला ठोकायची
लाज नाही कैकदा लाथाडले

निशिकांत देशपांडे.
वृत्त--मेनका
लगावली--गालगागा X २ = गालगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users