उत्क्रुष्ट चित्रिकरण असणारी गाणी ( नुसती एकायलाच नाहि तर पहायलाहि गोड)

Submitted by बिचुकले on 21 July, 2022 - 23:26

मनाला न भावलेली गाणी या धाग्यावरुन प्रेरणा घेउन हा धागा काढला आहे. काहि गाणी एकायला तर गोडच असतात पण एकतानाच पाहिल्याशिवाय समाधान न होणारी असतात.
उदा.
रिम्झिम गिरे सावन - लताच्या आवाजातले - जुन्या मुबैचे चित्रीकरण आहे पावसातले, अमिताभ आणी मौसमी चे सहज अभिनय ह्यामुळे हे गाणे नुसते एकण्यातच नाहि तर पहाण्यातहि मजा येते
अजुन अशिच आठवणारी गाणी म्हणजे -
आवाज दे के हमे तुम बुलाओ
रात के हमसफर

तुम्हालाहि अशी काहि गाणी वाटत अस्तील तर पोस्ट करा !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बघायला आणि ऐकायला छान - नीले गगन के तले, धरती का प्यार पले.. - दोन्ही अ‍ॅक्टर्स गाण्याच्या अभिनयाच्या (विम्मी एकंदरीतच) बाबतीत ढ असल्यामुळे, चोप्राने गाणं नयनरम्य बनवलंय.

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी

इस मोडसे जाते है,
कुछ सुस्त कदम रस्ते,
कुछ तेज कदम राहे.

पत्ता पत्ता, बुटा बुटा
हाल हमारा जाने है

तुझे देखा तो ये जाना सनम,
प्यार होता है दिवाना सनम.

हम दिल दे चुके सनम

ऐकायला, बघायला आवडतात बरीच गाणी. त्यातली ही पटकन आठवली.

कश्मीर किंवा हिमाचल मध्ये चित्रित झालेली बरीच गाणी ऐकण्यासाठी प्लस नजरसुख या गटात येतील.

कश्मीर किंवा हिमाचल मध्ये चित्रित झालेली बरीच गाणी ऐकण्यासाठी प्लस नजरसुख या गटात येतील. >> + १

ये हसी वादिया ये खुला आसमा - रोजा

बोल ना हलके हलके - झूम बराबर झूम मधलं
छन छन - मुन्नाभाई MBBS
तेरे बिन- सिंबा
दिल कह रहा है- क्यूं कि
नज्म नज्म - बरेली की बर्फी
कान्हा सो जा जरा - बाहुबली

https://www.youtube.com/watch?v=rJiohcg-gKo - हे गाणे निर्विवाद छान आहेच. पण मला खास आवडते ते बैकग्राऊंडला जी बाग, बेन्चेस, दिव्याचे खांब, अन धुके धुके दाखवले आहे त्यासाठी.
https://www.youtube.com/watch?v=YpjxmxOCcH8- ओ पंछी प्यारे, (बंदिनी )
https://www.youtube.com/watch?v=OvtU5FYxK-c वो चांद खिला... नुतन राजकपुर
https://www.youtube.com/watch?v=Jui2PUifnD4 - तेरे नैनो के मै दिप जलाउन्गा मौसमी, विनोद मेहरा
https://www.youtube.com/watch?v=VueN49P7JyU- ये चांदसा रोशन चेहरा
https://www.youtube.com/watch?v=Wl0zG3XxmeI- आजा आइ बहार, दिल है बेकरार
https://www.youtube.com/watch?v=FF3cEPji3Jo - परदेसिया, ये सच है पिया

सनी देवल चा जिद्दी नावाचा एक मुव्ही आहे, पिक्चर फास्ट आहे आणी खुप हिंसा आहे , त्याच्या भावाचा, बहिणीचा खुन वगैरे, आणी मध्येच हरिहरनचे गाणे येते - हम तुमसे ना कुछ कह पाये - एकदम सुदिंग !

https://www.youtube.com/watch?v=Y7ZHkpRcshQ - वगई-सूदा-व-सरा
खूपच मस्त!!

https://www.youtube.com/watch?v=FWvZdFOv95Y - पुवुक्कुल
https://www.youtube.com/watch?v=gbssrIapnuQ - एनक्के एनक्का
https://www.youtube.com/watch?v=7ZHC2jgEc1M&list=PLo4u5b2-l-fDwOCXZGKqiX... - दशावतारम ( तेलुगु)
https://www.youtube.com/watch?v=E8aZn74OOXQ&list=PLo4u5b2-l-fDwOCXZGKqiX... - रामनामावली

मंथन मधलं मेरो गाम गाणे,

गुजराती ग्रामीण भाग, बिलोणे घेऊन ताक घुसळत बसलेली श्यामसुंदरी स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, एक स्लो लाईफ, अमूल सारख्या जायंटची जेनेसिस स्टोरी, अन त्याचे ते चित्रण !

Pachai nirme... सुंदर रंगसंगती, त्याहून सुंदर निसर्ग, आणि माधवन...>>>>>>@ मनिम्याऊ, लिंक मस्तच. धन्यवाद
साथीयामधील आवडत गाणं. हे मूळ तमिळ गाणं खूप आधी ऐकलंय.
पण त्याचा इतका सुंदर अर्थ आजच कमेंट मध्ये वाचला
अर्थात हे ही नेत्रसुखद व कर्णमधुर

ही माझी काही आवडती गाणी Happy
दिल का भंवर >>
हे गाणे चक्क १०८०p मधे मिळाले. आत्तापर्यंत जास्तीत जास्त ७२०p मधे पाहिले होते.

'रूपास भाळलो मी' हे अवघाची संसार सिनेमातलं गाणं आणि Devil Wears Prada मधलं 'Suddenly I see' हे गाणं. दोन्हीची चाल, त्यातला कलाकारांचा अभिनय, वातावरण निर्मीती सगळंच आवडलं.
अजूनही आहेत अशी गाणी पण आत्ता ही दोन पटकन आठवली.

यश चोप्रांनी दिग्दर्शित केलेल्या दाग, कभी कभी, सिलसिला, चांदनी, लम्हे, डर व दिल तो पागल हैं चित्रपटातील अनेक श्रवणीय, सुमधुर व उत्कृष्ट चित्रीकरण असलेली गाणी; याउलट त्यांच्याच काही चित्रपटांतील गाणी यश चोप्रांच्या दिग्दर्शनावर संशय येईल इतकी वाईट चित्रित झाली आहेत.

चढ गया पापी बिछुवा- मधुमती.. वैजयंती माला फार गोड दिसतेय..आणी मागचा ठेका धरून नाच करणारे पण एका लयीत नाचतात.

वो है जरा खफा खफा. सायरा बानू चा गोड चेहरा, तिची अबोली साडी, संध्याकाळच्या आकाशा चा रंग, गाण्याची चाल. सर्वच मस्त.

पेहला नशा - जो जीता वोही सिकंदर>>+११११
ह्या पहा काही कमेंट्स
This song makes you fall in love with someone who doesn't even exist
Its not just a song. Its a time machine taking us back to 1990s.
Majrooh Sultanpuri wrote this song at the age of 85
फरा खानने कोरिओग्राफी केलेले पहिले गाणे!
संगीताशी कोओर्डीनेट केलेल्या स्लो जंप्स.
कुठल्या जगातून आले हे लोक?

Pages