मोदीजी है तो मुमकिन है।

Submitted by ashokkabade67@g... on 21 July, 2022 - 04:18

आमच्या गावातला गन्या म्हंजी ईपीत्तर च हाय पर करनार काय लंगोटीयार हाय आमचा त्यो ,सक्काळी सकाळी म्या चायच पित व्हतो तवर घरी आला म्या अर्धी कप त्याले देतच व्हतो तवर त्यो म्हनला नग तू आवर घाल कपडे आपल्याले जील्ह्याले जायच हाय ,माले जरा नवलच वाटल काम ना धाम ना येळ ना काळ नी ह्यो म्हंनतोय जील्ह्याले जायच बर पाऊसभी मनमन तसा झोडपतोय पर म्हनल आसल कुनीतरी आजारी बिजारी म्हनून त्याले ईचारल गन्या बाची तब्येत बरी हाय ना का बैलबिल घेतोय तसा तुहा एक बैल थकलायच म्हना ,नाय रे भावड्या म्हातार धडधाकड हाय नी बैलभी धकलच या सालाले आता काय नांगरनी ,पेरनीभी झालीच की वखरनीले चाललच की पाहु पुढल्या हंगामात त्यो म्हनला मंग एवढ काय तातडीच काम आडल तुह पाऊस मनमन तसा पडतोय तवा जाऊ दे जाऊ की पुढल्या बाजाराले खतभी आनायचच हाय तवा जाऊ म्या म्हनल नाय रे चाल आताच एस्टीभी ईल आता गन्या म्हनला सदरा घालत घालतम्या ईचारल पर काम त सांगशिल का नाय ।आर भावड्या तुले कवा आक्कल ईल त्ये देवालेच ठाव आर आपल्या मोदीजींनी नी नी फायनान्स मिनिष्टर निरमलाताईन हिऱ्यावरलि जीएसटी लयच कमी केलाय फक्त दिड टक्का केला तवा हिराघ्यायचाय म्हनतो म्या गन्या म्हनला पर काल पारावर तर तू म्हनत व्हतास की अनाज संपलय म्हनून मंग मधिच ह्यो हिरा कुठन आला बेम्याजरा रागातच ईचारल आर येड्या देव आक्कल वाटत व्हता तवा तू काय चाळणी नेली व्हती की काय आर धान्य दाळी मठमुगचवळी हरबरा येव्हढच नाय त दह्यावरभी मोदी सरकारन पाच टक्के जीएसटी लावलाय तवा म्हनल हिरा ईकत घ्यावा तेव्हढच पैक कमी लागतील ।म्या गन्याले हात जोडत मनातल्या मनात म्हनल लोक म्हनत्यात त्ये खरच हाय मोदी हाय त मुमकिन हाय ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ब्लँककँट ,अच्छे दिन तिस रुफये पेट्रोल, शेतकऱ्यांना हमीभाव काळा पेसा तीन लाख हे काय होत अहो येथे प्रत्येक भारतीय टँक्स पेड आहे आयकरदाते प्रत्यक्ष कर भरतात आणि बाकीचे अप्रत्यक्ष कर भरतात आणि खासदार आमदार हरामाची पेन्शन खातात रेवडी तर मोदीजी देतात ।