वेगळा भाग - १८

Submitted by निशा राकेश on 18 July, 2022 - 08:37

भाग -१८

डॉक्टरांनी बाबुला आईला घेऊन घरी जायला सांगितलं , बाबू सतत आईच्या उश्याची बसून राही , आई रात्र रात्र झोपत नसे , कधी कधी तर तो तीच डोक आपल्या मांडीवर ठेऊन लहान मुला प्रमाणे तिला थोपटत राही , आईला सत आपल्या मुळे बाबुला होणारा त्रास , तिच्या लेकरांचे होणारे हाल ,आणि दादांना वाटून राहिलेली तिची काळजी ह्यामुळे तिला वाईट आणि अपराधी वाटे ,
बाबू तिला समजवे सर्व काही ठीक होईल हे पण दिवस जातील तू ह्यातून नक्की बरी होशील , तो आईला आधार देई , तिच्या जगण्यासाठी नवी उमेद देई , आईला सतत काहीतरी चांगल विनोदी सांगून तिला हसवे, घरातलं वातावरण इतक तणावाच असून देखील तो त्याच्या प्रयत्नांनी ते हलक फुलक ठेवी , आणि कधी कधी त्याच त्यालाच सर्व असह्य झाल कि तो संध्याकाळचा टेकडीवर जाई,
आणि मावळत्या सूर्याकडे पाहत त्याला त्याच दुख देखील असच कुठेतरी मावळल तर किती बर होईल अस वाटे.

डॉक्टरांकडे ये – जा तर सुरूच होती पण आईच्या तब्बेती मध्ये म्हणावा तितकासा फरक पडत न्हवता , उलट ती आणखीन बिघडत चालल्या सारखी दिसत होती , बाबू आईसाठी सर्व काही करायला तयार होता , शेजारच्या बायका येऊन आईला बघून जात , त्यातल्याच एका बाई ने बाबुला आईसाठी उपवास पकडायला सांगितले , दर सोमवारी उपवास कर , शंकराच्या पिंडी वर बेल वाहा, गाई ला चारा खाऊ घाल असेच आणि बरेच , बाबू सर्व जे जे सांगतील ते ते सर्व तो आईसाठी करीत होता , आणि तसाही त्याच्या शिवाय कोण करणार होत , आईची अवस्था बघून दादाच दिन वाटायला लागले होते , चंदू तर घरात असून नसल्या सारखा , त्याला परिस्थितीच म्हणाव तितक गांभीर्य न्हवत , न्हवत कि त्याला ते दाखवायचं न्हवत काही माहित नाही , आणि झेंडु तर लहानच होती , तिला फक्त आईला काहीतरी भयंकर झालंय , आणि ती ह्यातून कधी बाहेर येईल माहित नाही आपल्याला आता शहाण्या सारख वागल पाहिजे हे ज्ञान तिला अचानक आल होत आणि ती अगदी तिच्या वयापेक्षा मोठ्या मुली सारखी वागू लागली होती , बाबुला मदत करू लागली होती , घरात काम करू लागली होती, दादांना हव नको ते बघू लागली होती , ह्या लेकरांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग पण त्यांना तो मुळापासून बदलवून गेला होता , त्यांच अख्ख आयुष्याचं इतरांपेक्षा वेगळ झाल होत , शेजारचे पाजारचे त्यांना ह्या मुलाचं वाईट वाटायचं आणि ह्या प्रसंगातून हि मुले लौकरात लौकर बाहेर पडावी अस सर्वाना वाटे.

आणि अखेर त्या दिवशी डॉक्टरांनी बाबुला थांबवून घेतलं , आईची रोजच्या प्रमाणे तपासणी करून तिचे आताचे रीपोर्ट बघून डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची काळजी बाबुला स्पष्ट दिसत होती.

डॉक्टर बाबुच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले “बाबू, आईला इथून पुढे तपासणी साठी आणू नकोस , मला वाटत नाही त्याचा काही फायदा होईल”

“म्हणजे “ बाबूला काही कळल नाही , असे का डॉक्टर बोलतायेत.

“म्हणजे , बाबू आई वर केलेल्या उपचारांचा तिच्यावर म्हणवा तितका फरक दिसत नाही, आपण औषध आणि उपचाराची पद्धत खुपदा बदलली पण तरीही त्याचा काही फायदा होत नाहीये, आणि आताचे आई चे रिपोर्ट पाहता , “ डॉक्टर काही वेळ थांबले , त्यांनी लांब श्वास घेतला ,

बाबू जीव एकवटून त्याच्या ते बोलन ऐकत होता ,

“आई चे आता चे रिपोर्ट पाहता , तुझ्या आई कडे खूप कमी दिवस शिल्लक आहेत”

बाबू अक्षरशः हादरला , त्याला हे सर्व अनपेक्षित होत , त्याला खूप रडावस वाटत होत पण त्याला धड रडताही येत न्हवत , पण त्याच काळीज मात्र जड झाल होत , तो तसाच उठला , केबिन बाहेर पडणार पण त्याने पुन्हा मागे वळून डॉक्टरांना विचारलं .

“किती दिवस आहेत तिच्याकडे” हे विचारताना जणू त्याच्या श्वास जागीच थांबला होता ,

“फार फार तर पंधरा दिवस” डॉक्टरांनी बाबूची नजर चुकवत उत्तर दिल , कारण त्यांना बाबू हा परिचयाचा झाला होता , सुरुवाती पासून आत्ता पर्यंत एक जेमतेम पंधरा – सोळा वर्षाचा मुलगा मोठ्या माणसाप्रमाणे त्याच्या आईची काळजी घेताना डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं होत , डॉक्टरांना देखील हे सत्य बाबुला सांगताना खूप अवघडल्या सारख झाल होत पण शेवटी ते त्याच काम होत आणि ते त्यांनी केल.

डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडल्यावर त्याने सर्व प्रथम आई कडे पाहिलं , आई शांत पणे भिंतीला डोक टेकवून त्याची वाट पाहत डोळे मिटून बसून होती , त्याने तिच्या दंडाला स्पर्श करून तिला जाग केल ,

“काय बोलले डॉक्टर “ आई ने बाबूच्या हातातले रिपोर्ट पाहत त्याला विचारल.

“--------------------------“ बाबू आई कडे फक्त एकटक पाहत राहिला.

“ बोल ना बाळा, काय झाल रे “ आई ने पुन्हा विचारल.

“ आई ...........................” इतकच बोलून बाबू आईच्या मांडीवर डोक ठेऊन हमसून हमसून रडू लागला.

आई ला काही कळेना , पण तिला त्याला उठवायचे , समजवायचे त्राण न्हवते , ती काळजी ने फक्त त्याच्या कडे पाहत होती,

बाबूच्या रडण्याचा भर ओसरल्यावर तो उठला , आई त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहतच होती ,

“आई ते बोलतात , आईला पुन्हा इथे आणू नकोस , तुझी आई आता फार काळ नाही राहणार” अस म्हणून बाबू ने पुन्हा आपल तोंड हाताने झाकून घेतलं व तो पुन्हा रडू लागला.

आई च्या चेहऱ्यावर हलकेच स्मित आल , जणू तिची आणि तिच्या कुटुंबाची देखील ह्या तिच्या आजारातून सुटका होणार होती तिने बाबूच्या चेहऱ्यावरचा हात काढला आणि ती म्हणाली.
“ अस कस मी तुला सोडून जाईल, माझ्या बाबुला सोडून मी कुठेच जाणार नाही ”

अस म्हणून आईने बाबुला उराशी घेतलं व ती त्याला शांत करू लागली.
दोघे हि जड अंतकरणाने उठले आणि चालू लागले.

आई ची बातमी कळल्यावर आई चे सर्व नातलग माहेरची माणस , दादांचे भाऊ बहिण सर्व एक एक करून आईला भेटायला येत होते,

सर्व माहित असूनही बाबू ने त्याच उपवासच व्रत आणि गाई ला चारा देण ह्या गोष्टी चालूच ठेवल्या , त्यात त्याने खंड पडू दिला नाही ,

त्यात त्याला, त्याच समाधान सापडत होत , डॉक्टरांनी जरी त्यांचा निकाल सांगितला तरी तो ईश्वर ज्याच्यावर त्याची श्रद्धा होती , त्याच्यासाठी ते सर्व करत राहिला , त्याने डॉक्टरांचं बोलन ऐकल जरी असल तरी त्याला ते मनापासून पटल न्हवत ,

चार महिन्याच्या आत त्याची धडधाकट आई , अंथरुणाला खिळली , एका छोट्या गाठीच निम्मित झाल, आणि आता डॉक्टर सांगतात कि तुझ्या आई कडे थोडेच दिवस राहिलेत , हे अस इतक पटापट कस घडू शकत , कोणत्या अपराधाची शिक्षा मिळतेय मला , आधी बायडा आणि आता आई , का होतंय अस माझ्यासोबत , मी काय कुणाच वाईट केलंय हे दुख: माझ्याच वाट्याला का?

प्रश्नाच्या गुंत्या मध्ये बाबू हरवून जाई .

एक दिवशी असाच संध्याकाळच्या वेळेस बाबू आईशेजारी बसून काहीतरी वाचत होता , आई ने बाबुला हाक मारली,

आई च बोलन आताश्या तोंडातल्या तोडांत व्हायचं खूप वेळा तिच्या तोंडा शेजारी कान न्हेवून ते ऐकाव लागायचं .

“आई , काही हवंय का “ बाबूने तिची विचारपूस केली.

“ मला माफ कर लेकरा” आईने मोठ्या कष्टाने बाबू समोर हात जोडले.

“अस काय करत्येस आई , तू जास्त बोलू नकोस तुला त्रास होतोय”

“बायडी आली होती , मी नाही सांगितलं , तुझ्या आईला माफ कर”

“सोड आता ते , ती जिकडे असेल खुश असुदे”

“बाबू, खूप शिक , मोठा हो , झेंडु कडे लक्ष दे ,”

“ हो आई , तू झोप बर आता ,”

बाबूला आईच्या त्या निर्वाणीच्या बोलण्याने त्रास होई , मन निराश होई , पण जे होत ते सत्य होत , आणि त्याला सामोर जायलाच हव होत.

त्यानंतर दोन दिवस आई कुणाशीच काही बोलली नाही , तिसर्या दिवशी सोमवार होता , बाबू शंकराच्या मंदिरात गेला होता त्या नंतर तो गाई ला चारा द्यायला जाणार होता ,

झेंडु झाडलोट करीत होती , आणि अचानक आई च्या घशातून घर घर ऐकू लागली अचानक येणाऱ्या त्या तश्या आवाजाने झेंडु घाबरली , घरात कोणीच न्हवते , तिने जवळ जाऊन आईला चमच्याने पाणी पाजायचा प्रयन्त केला पण सर्व पाणी तोंडाच्या बाहेरच येत होत , तिने बाहेर जाऊन शेजारी मदत मागायला सुरुवात केली आणि अचानक तिला त्यांच्या गल्लीच्या टोकाशी उभा असलेला अशोक दिसला तिने पटकन त्याला मंदिरात पिटाळले आणि बाबू तिथे नसेल तर तो गाई ला चारा द्यायला कुठे जातो तिकडून त्याला बोलवायला सांगितले .

अशोक धावत पळत मंदिरात पोहोचला , बाबू तिकडे न्हवता , मग तो गाई च्या गोठ्याकडे पळत सुटला.

तिकडे बाबू गाई ला चारा भरवत होता , तो पळत जाऊन धापा टाकत त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिला.

“बाब्या , बाब्या , आई , तुझी आई “ अशोक ला पळून पळून प्रचंड धाप लागली होती.

“ काय झाल , आई ठीक आहे ना “

“आई कसतरी करतेय , चल लौकर “

दोघे पळत सुटले , घरी पोहोचल्यावर दरवाज्यातूंच त्याने आईकडे पाहिलं, ती जणू त्यालाच पाहत होती , त्याच्या वाटे कडे डोळे लाऊन होती , तिची नजर स्थिर झाली होती , त्याने गेल्या गेल्या प्रथम तिचा श्वास तपासाला , सगळ संपल होत , बाबूने स्वतःच्या हाताने आई चे डोळे बंद केले , काचेचा चक्का चूर व्हावा तसं काहीस त्याच्या हाताला जाणवलं , आईचा जीव जणू डोळ्यातूनच गेला होता , कदाचित तिने बाबूची चंदूची आणि दादांची वाट पहिली असेल , कदाचित तिला जाताना शेवटच सगळ्यांना पहायचं असेल , कदाचित तिला शेवटच काहीतरी बाबुला सांगायचं असेल , कदाचित , कदाचित पण त्या कदाचित ला आता काहीही अर्थ उरला न्हवता ,

एक जीव जन्माला आला , वाढला , दुसर्या घरी लग्न करून गेला , मुल-बाळांमध्ये , संसारा मध्ये हरवून गेला , तो जीव कधी स्वतः साठी जगालाच नाही , आणि आता तो राहिलाच नाही , प्रत्येक स्त्रीची , वास्तविक पाहता सर्व आई नामक व्यक्तीची थोड्या फार फरकाने हीच कथा असेल.

आई चा अंत्यविधी झाला , तो होई पर्यंत बाबू ने आईला नजरे आड केल नाही , जणू आईला डोळ्यात साठवून घेत होता , कारण आता आई न्हवती ,कुठेच न्हवती , ती होती फक्त त्याच्या मनात कायमची शांत , मी तुला सोडून कशी जाईल म्हणणारी आई गेली , तिची इच्छा नसताना तिला जाव लागल , ईश्वर खरच असतो , असतो तर मग माझ्या आईला का ? , का ? आता त्या का ला काही उत्तर न्हवत , कुणाकडेच न्हवत , होत ते फक्त शांत बसण , शांत बसून सर्व शांत पणे पाहत राहण , नशिबाच्या हातच खेळण बनणं, बाबूच्या डोक्यात विचारांचा गुंता काही केल्या सुटत न्हवता , आईला शेवटचा अग्नी दिल्या नंतर सर्व हटकून घरी चल म्हणाले तरीही तो घरी न जाता टेकडीवर गेला , सूर्य मावळती कडे झुकू लागला होता , त्याला पाहत तो रडू लागला , त्याला शांत वाटत होत , शांतपणे डोळ्यातून खार्या पाण्याचे लोंढ वाहू देऊ लागला , त्याला मोकळ वाटू लागल , “खूप शिक , मोठा हो “ आई चे बोलणे त्याला त्या क्षणी आठवले , आणि त्याला आणखीनच शांत वाटू लागल.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users