Submitted by निशिकांत on 14 July, 2022 - 09:56
लोटला प्रचंड काळ ओलसर जखम तरी
गोंदतोय हास्य रोज रोज चेहर्यावरी
राव अल्प, खूप रंक, झाकण्यास ही दरी
नोंद दप्तरात फक्त आयची सरासरी
लेउनी सुखास, रंग पाहिले फिके फिके
शोभते किनार वेदने! तुझीच भरजरी
नांदतात सुरकुत्यात कैक सुप्त हिरवळी
व्यक्त त्या करावयास, मार्ग एक शायरी
वैर संपले, मनास वाटले असे कसे?
अस्तिनीत शांत बैसलेत आज ते जरी
शायरी जशी जमेल मी तशीच गुंफतो
सांग दिग्गजा! तुझी कशी करू बरोबरी?
काढले तिकीट, जायचे कुठे न ठरविता
श्वास थांबता प्रवास थांबतो खरोखरी
काळ, काम, वेग यात ताळमेळ घालुनी
प्रश्न सोडवून प्रश्न राहिले किती तरी
मी महत्व जाणले तुझे कसे न ईश्वरा?
शाश्वतास सोडले नि जोडली बिरादरी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवराज
लगावली--गाल X ७+गा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेउनी सुखास, रंग पाहिले फिके
लेउनी सुखास, रंग पाहिले फिके फिके
शोभते किनार वेदने! तुझीच भरजरी!
व्वा! खूपच छान...
वेदनेची किनार भरजरी? हे काही
वेदनेची किनार भरजरी? हे काही पटले नाही. वेदना ही दुःख देणारीच असते, उगीचच वेदनेचे उदात्तीकरण वाटले.