Submitted by तुषार विष्णू खांबल on 12 July, 2022 - 15:36
प्रेमपाऊस - ३
शब्दांकन : तुषार खांबल
(फोटो साभार - गुगल)
मुसळधार पावसात
समीप तू उभी
घालमेल या मनाची
दिसे मज नभी
हृदयाच्या स्पंदनासवे
स्पर्धा करीती मेघ
हळूच चमके वीज
स्मितहास्याची ती रेघ
भिजलेले तुझे कुंतल
अजून तुझे रूप खुलवी
ओठांवरचे अमृतबिंदू
माझ्या वेड्या मनास भुलवी
मिठीत माझ्या विसावता
फिटे मनाची आस
जशी पावसाची होता भेट
मातीला येई सुवास
शहारते काया तुझी
सतावीतो गार वारा
मिलनास आतुर दोघे
सोबत 'प्रेमपावसाच्या' धारा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा