दीपस्तंभ मनोबल - अखिल भारतीय प्रवेश सूचना -२०२२

Submitted by Deepstambh Foun... on 4 July, 2022 - 16:20

भारतातील सर्व दिव्यांग अनाथ अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम आयुष्य घडवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी.
दीपस्तंभ फाउंडेशन ही सेवाभावी संस्था 2009 पासून जळगाव व पुणे येथे कार्यरत आहे ही संस्था विशेषतः दिव्यांग , अनाथ आई-वडील दोघे नाहीत) आणि वंचित युवकांच्या दर्जेदार शिक्षणासाठी लोकसहभागातून खालील मोफत प्रशिक्षण आणि शिक्षण उपलब्ध करते

१) एक निवासी स्पर्धा प्रशिक्षण
a)UPSC
b) MPSC
c)SSC
d) IBPS (बँकिंग)
e) RRB
f) MSW (प्रवेश परीक्षा)
9) MBA (प्रवेश परीक्षा)

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
१. सर्व अभ्यासक्रम इंग्रजी मराठी आणि हिंदी मध्ये उपलब्ध
२. सर्व अभ्यासक्रम उपयुक्त साहित्य आणि परीक्षा सह
३. दृष्टिहीन किंवा अल्प दृष्ट अल्पदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आणि मोबाईल प्रशिक्षण
४. वैयक्तिक आणि सामूहिक समुपदेशनाची सुविधा
५. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी प्रशिक्षक

नियमित ऑफलाइन प्रशिक्षण जळगाव आणि पुणे येथे उपलब्ध
ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध

२) उच्च शिक्षण दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी निवास व प्रशिक्षण सुविधा
निवडक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत निवास व्यवस्था शिष्यवृत्ती आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाते
अ) पदवी शिक्षण
ब) पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी
क) अकरावी आणि बारावीच्या मुलांसाठी 20 राखीव जागा
ड) काही गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या निवासस्थानी शिष्यवृत्ती दिली जाते

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी पात्रता
उत्तम शैक्षणिक कामगिरी असणे आवश्यक
कमीत कमी दहावी व बारावी उत्तीर्ण
किमान 40 टक्के दिव्यांगता असावी

३) संगणक प्रशिक्षण

फक्त प्रज्ञाचक्षू दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी मूलभूत संगणक प्रशिक्षण
कालावधी सहा महिने

४) कौशल्य विकास विकास आणि उद्योजकता 20 जागा
आम्ही दोन नवीन विभाग सुरू केले आहेत. ह्यात त्यांना प्रशिक्षण काम करण्याची संधी आणि त्यातून अर्थार्जन करता येईल. जे विद्यार्थी आधीपासूनच कुशल असतील त्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला मानधन मोबदला मिळेल

अ) मायक्रम काम
ब) शिवणकाम कापडी पिशव्या
क) हस्तकला
ड) गायन
इ) संगीत
फ) नृत्य आणि कला
(मनोबलचा "दिव्य तेज" या नावाने ऑर्केस्ट्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे)
मनोबल मधून मिळणारे अन्य प्रशिक्षण
व्यवसाय मार्गदर्शन
व्यक्तिमत्व विकास
मुलाखतीसाठी प्रशिक्षण

जळगाव येथे 320 दिव्यांग अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या निवासी प्रशिक्षण प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे
https://www.youtube.com/watch?v=Iwy6Gwlfe1U

प्रवेश परीक्षा प्रवेश प्रक्रिया
१) कृपया अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर दिलेला गुगल फार्म भरा फॉर्म भरा
गुगल लिंक
https://forms.gle/x5hngLfZGXc2zjMd9

ऑनलाईन नोंदणी 10 जुलै 2022 पर्यंत करता येईल

परीक्षेची तारीख दिनांक 15 जुलै 20 ते 22 नंतर
प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी शुल्क पन्नास रुपये आहे
२) प्रवेश परीक्षा शुल्क भरण्यासाठी बाजूला दिलेला किंवा स्कॅन स्कॅन करावा
३) विद्यार्थ्याचा शैक्षणिक गुणवत्ता लेखी प्रवेश परीक्षेतील गुण आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल

अधिक माहितीसाठी तसेच नोंदणी बाबत काही समस्या असल्यास कृपया संपर्क करा
8624846332/ 8149730318

दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव महाराष्ट्र
42 हाउसिंग सोसायटी जिल्हा न्यायालयाच्या मागे शाहूनगर जळगाव
149730318

दीपस्तंभ फाउंडेशन पुणे महाराष्ट्र
8624846332
नोंदणी संदर्भात कोणत्याही प्रश्नासाठी SMS/Whatsapp करा

मनोबल प्रकल्पाविषयी व्हिडिओ क्लिप
https://youtu.be/2Y-r1TNEUpc
https://youtu.be/9Lz2wgmK7LY

विशेष दिव्यांग आणि आर्थिक दृष्ट्या वंचितांना मोठी स्वप्ने पाहण्याचा समान अधिकार आहे आपले ध्येय साध्य करण्यासाठी केवळ चिकाटीने आणि अथक परिश्रम करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभ बनून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाची स्थापना केली आहे
ऑल द बेस्ट
रवींद्र महाजन यजुर्वेंद्र महाजन
संस्थापक अध्यक्ष दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव
कृपया ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना या संधीची गरज आहे

Email: deepmanobal.adm@gmail.com
Website: www.deepstambhfoundation.org
YouTube Channel: https://www.youtube.com/c/DeepstambhFoundation
Facebook: https://www.facebook.com/DeepManobal
Instagram: https://instagram.com/deepstambhmanobal/
Telegram: https://t.me/DeepstambhManobal

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults