मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री पद कसे ठरले असलं ?

Submitted by हस्तर on 1 July, 2022 - 08:09

घटना क्रम लक्षात घ्या

शिवसेने ने स्वतः शिंदे यांना मुख्य मंत्री पदाची ऑफर केली होती ,नाकारली
नवीन सरकार होई प्रयन्त कोणीतही चर्चा नाही पण फडणवीस सोडून दुसरे नाव कोणाला वाटले पण नव्हते
अचानक सूत्रे फिरली ,ह्या मागे बारामतीचे काका असायची शक्यता २०% आहे पण शिंदे मुख्यमंत्री ठरले
फडणवीस गृह वा वित्त मंत्री होऊ शकत होते पण त्यांनी घोषणा केली कि कोणतेच पद नको

आता त्यानाही आणि बारामती करांची कुश्ती सगळयांना माहीत आहे
काकांनी शह द्याचा विचार केला
मोदी साहेब ऐकतात ,२०१४ ला बारामती ला भाजपचा उमेदवार नव्हता
अमित शहा यांनी सरळ ट्विट केले ,फडांन वीस उप मंत्री

एकाच फटक्यात काकानी सिद्ध केले
मिर्झापूर मधला कालीन भैयाचा वाक्य आठ्वले ,जिधर तुम नोकरी करते हो उधर के हम बादशाह हैं

सगळ्यात जास्त चर्चा हीच आहे मी मुख्य मंत्र्याचा उप मुख्य मंत्री झाला
खरे पाहता फडणवीस ह्यांनी भाजपाची धुरा चांगली सांभाळी होती
काही वाद पण नव्हता ,त्यामुळे हा स्ट्रोक पक्का बाहेरून बसला

आणि लगेच पवार साहिबाना IT ची नोटिसा
बघा तर्क शाश्त्र जुळतेय का

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

{महाराष्ट्रातल्या}
राजकारणातल्या सर्व चांगल्या गोष्टींच्या मागे काकाच असतात. फायलीत सगळ्यांच्या ( एक सोडून)कुंडल्या असतात.

काकाच्या करामती बद्दल जास्तच अपेक्षा ठेवताय का ?

पंतप्रधान होणार तितक्यात तेल लावलेल्या पहिलवान नरसिंहराव ने महाराष्ट्रातील काँग्रेसच्याच काही मंत्र्यांना फोडून बंडाळी माजवली !
आणि काका ला सांगितले जा अगोदर महाराष्ट्र सांभाळा !
थोडक्यात पंतप्रधान पद हुकले !
आता राष्ट्रपती व्हायचे चांस होते , भाजप कडून हिरवा कंदील होता .
पण ममता बेगम , इटालियन काकू आणि इतर विरोधी पक्षांना भाजप ने पुरस्कृत काका चालले असते का ?
इतक्या दिवस भाजप च्या विरोधात हात वर करून एकी दाखवली आणि आता काका त्यांच्या बाजूने ?
मग २०२४ च्या निवडणुकीत एकी कशी राहणार?
असे भयंकर प्रश्न आपल्या मित्रमंडळी ना पडू नये म्हणून काका ने खिन्न मनाने नकार दिला !
थोडक्यात राष्ट्रपती पद देखील हुकले .
अख्खी हयातीत यांची साडेतीन जिल्ह्याच्या पुढे कारकीर्द गेली नाही , असे जाणते राजा काका फडणवीस ना खेळवू शकतात ?
नक्कीच नाही !
महाराष्ट्रातील सत्तेत वरचष्मा न मिळवता आल्या मुळे , अख्ख्या हयातीत विधानसभेत एकदाही बहुमत न मिळवता आले नाही , पुतण्या मुळे भविष्यात यांच्याच पक्षाचे होणारे तुकडे थांबवता थांबवता उरलेले आयुष्य जाणार !

आणि हा माणूस बाहेरून स्ट्रोक मारू शकतो ?
बघा विचार करून !

पोंबुरपेकराच्या चाळभैरावापेक्षा ह्या हस्तरचे जास्त विशेषांक निघाताहेत कारे पावश्या? - भाईसाहेब चौबळ.

इतर पक्षाचे तुकडे पडलेच पाहिजेत

नैतर भाजप कुठले तुकडे चघळणार ?

ह्यांचे ओरिजिनल मेम्बर नपुंसक असतात की काय

मुळात संघ हाच 1925 साली पडलेला काँग्रेसचा तुकडा आहे

आणि जनता पक्षातून 1980 साली कमळ उपजले

तुकडे तुकडे गँग

त्यातील नेहरू गटाला पंतप्रधान पदाची स्वप्ने पडायला लागली होती , म्हणून महात्म्याचे ब्रेनवाश् करून इतरांना मार्गावरून काढून नेहरू पंतप्रधान झाले .
तिथं पर्यंतच घेतले समजून .
पण नेहरूच्या घराण्यात तब्बल तीस पस्तीस वर्षे पंतप्रधान पद ? का बाकीचे काँग्रेसी नालायक होते का ?

बाकीचे काँग्रेसी नालायक होते का ?#### लोकशाहीमध्ये लोकांनी त्याना निवडून दिले. मोदींना नाही दिले का? 2024 ला वेगळा पंतप्रधान देणार का भाजप? 15 वर्ष तरी एकालाच कशासाठी??

इतरांना मार्गावरून काढून ## होतं कोण आणखी?? नेहरुएव्हढे काबिल कोणिही नव्हते. बाकी सगळे आपला वाकुब ओळखून संघ / हिंदू महासभा वगैरे काढून मोकळे झाले

एडविना बरोबर खास दोस्ती हिच एक काबिलियत होती .
बाकी सिग्रेटी फुंकून पिंपण्या वाजविणारा आणि परदेशी वाइन चे शौक बाळगणाऱ्यात अगदी सामान्य जीवन जगणाऱ्या महात्म्याने काय पाहिले होते कोणास ठाऊक ?

नेहरू असतील किंवा त्या काळात असलेल्या नेत्यांची तुलना आताच्या कोणत्याच नेत्याशी होणार नाही.
अतिशय बिकट स्थिती मधून भारताला योग्य मार्गावर त्यांनी आणलं.आणि प्रगती पण केली.
स्वतंत्र मिळाल्या नंतर काहीच वर्षात अनेक संस्था,सरकारी कंपन्या,सरकार नी उभ्या केल्या.
नेहरू वर टीका करण्याची मला नाही वाटत आता कोणाची कुवत आहे.
मोदी ना सर्व आयते मिळाले आहे.
जे मिळाले ते पण जपता आले नाही मोदी ना.

एक काम त्यांनी केलेले सांगावे आठ वर्षात.
फक्त jumle बाजी सोडून.

पोंबुरपेकराच्या चाळभैरावापेक्षा ह्या हस्तरचे जास्त विशेषांक निघाताहेत कारे पावश्या? - भाईसाहेब चौबळ

Proud

स्वतःच्या मंत्रीपदापासून ते मुलाच्या मंत्रीपदापर्यंतचे अलबम दाखवत या गृहस्थाने माझ्या आयुष्याची अडीच वर्ष कुरतडली. तो फ्लोअर टेस्टचा फोटो माझ्या सुदैवाने सापडला नाही. पुन्हा कधीतरी पाहीन सांगून मी जो सटकलो तो आजवर त्या घराचा उंबरठा चढलेलो नाही.

नेहरू कसे का असेनात

संघाने सावरकरांना पंत प्रधान आणि गोडसेला गृहमंत्री करायला हवे होते

एडविनाच बरी लक्षात राहिली? इतर नेत्यांसंबंधी असे लिहिणे सहज शक्य आहे पण सभ्यता, सुसंस्कृतता आणि त्यांच्या प्रमुख ( प्रचंड आणि पायाभूत ) कार्याविषयी आदर ह्यांमुळे लिहिणार नाही. अधिकृत अनेक बायका, अनधिकृत मैत्रिणी,जनानखाने,नाटकशाळा..
नाही लिहिणार..राजकीय नेते, राजे महाराजे, सरदार दरकदार, लेखक, गायक, भारतरत्न विजेते.. नाही लिहिणार. प्रत्येक कालावधीचे नियम वेगळे.
आणि सिगारेट, चिरूट, चिलीम, हुक्का, विडी, पाईप, तंबाखू, सुपारी हे ह्या ना त्या स्वरूपात राजे महाराजे, नेते, संत, फकीर, गवई, सामान्य माणसे कितीतरी वर्षे सेवन करीत आली आहेत. हे वर्तन टाबु कधीच नव्हते.
आधुनिक वैद्यकानुसार तंबाखूचे दुष्परिणाम अलीकडे अलीकडेच लक्षात आले आणि त्यावर मर्यादित बंदी घातली गेली.

लहानपणी शाळेत नेहरुवर निबंध लिहायला लावायचे , भाषण द्यायला लावायचे !
त्या बद्दल चा बदला आहे तो , एडवीना लक्षात ठेवण्याचा .

मग आता मोदींवर 2 निबंध लिहा
2 जन्मतारखा

आता पिक्चरपण दुसरा भाग येणार

मज्जा आहे की

नेहरुवर एकपण पिक्चर नाही

त्यातील नेहरू गटाला पंतप्रधान पदाची स्वप्ने पडायला लागली होती

अभिमानास्पद आहे की

ह्यांचे नेते इंग्रजाना बोलले , मला 50 वर्षांची शिक्षा देताय पण 50 वर्षे तुमचे राज्य तरी टिकेल का ? , तर भक्त बोलतात , वा वा काय ती दूरदृष्टी

आणि नेहरू बोलले , मी पंतप्रधान होणार , तर तो स्वार्थ !!

आमच्या दृष्टीने दोघेही पूजनीय आहेत.

दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे , संपूर्ण स्वातंत्र्य संपूर्ण स्वराज्य

Proud

कुणीही स्वातंत्र्य आणले तरी पंतप्रधानपण कुणीतरी होणारच होते ना

स्वप्ने काही पडत नव्हती. नेहरू करिष्माटिक, खूप लोकप्रिय होते. कश्मीरमध्ये घोड्यावरून रपेट करू लागले की दुतर्फा लोकांची गर्दी होई. राजकुमारासारखे वाटत ते लोकांना. (स्वातंत्र्यानंतर शिवाजी पार्कला कधीतरी त्यांचे भाषण झाले तेव्हा हजारो लाखो लोक स्वतचे पैसे खर्च करून आले होते. ) शिवाय चळवळीतला त्यांचा त्याग, ९-१० वर्षे तुरुंगात काढणे, देशप्रेम, भारतीय संस्कृतीच्या सर्वंकष आणि गौरवशाली स्वरूपाची जाण आणि तिचा अभिमान, स्वातंत्र्याच्या नवप्रसव काळात उपयुक्त ठरू शकणारा उदारमतवाद, आधुनिक दृष्टी, वैज्ञानिक विचार हे सर्व नंतर जन्म घेतलेल्या घटनेच्या ५१/अ कलमाशी अगदी सुसंगत होते. आणि त्यांचे मास अपील फक्त इलाहाबाद, उत्तर प्रांतापुरते मर्यादित नव्हते. दक्षिण भारतातही ते तेव्हढेच लोकप्रिय होते. शिवाय त्या मानाने वयाने तरुण होते, शरीराने आणि मनानेही; वक्तृत्वाचीही देणगी होती,.. त्या बेरकी आणि भविष्यवेध घेऊ शकणाऱ्या म्हाताऱ्या महात्म्याला हे कळले नसेल काय?

हो. नेहरू परदेशी जायचे तेव्हा तिथले लोक त्यांना पाहायला, ऐकायला गर्दी करीत. त्यांच्यासाठी एन आर आय किंवा इथून नेलेल्या लोकांची गर्दी जमवावी लागत नसे.

नेहरुना परदेशी नेते व त्यांच्या घरच्या स्त्रियाही आदर देत

नाहीतर एकेक फोटोजीवी असतात , यांच्यापासून बायका दूर पळतात

<< स्वप्ने काही पडत नव्हती. नेहरू करिष्माटिक, खूप लोकप्रिय होते. कश्मीरमध्ये घोड्यावरून रपेट करू लागले की दुतर्फा लोकांची गर्दी होई. राजकुमारासारखे वाटत ते लोकांना. (स्वातंत्र्यानंतर शिवाजी पार्कला कधीतरी त्यांचे भाषण झाले तेव्हा हजारो लाखो लोक स्वतचे पैसे खर्च करून आले होते. ) शिवाय चळवळीतला त्यांचा त्याग, ९-१० वर्षे तुरुंगात काढणे, देशप्रेम, भारतीय संस्कृतीच्या सर्वंकष आणि गौरवशाली स्वरूपाची जाण आणि तिचा अभिमान, स्वातंत्र्याच्या नवप्रसव काळात उपयुक्त ठरू शकणारा उदारमतवाद, आधुनिक दृष्टी, वैज्ञानिक विचार हे सर्व नंतर जन्म घेतलेल्या घटनेच्या ५१/अ कलमाशी अगदी सुसंगत होते. आणि त्यांचे मास अपील फक्त इलाहाबाद, उत्तर प्रांतापुरते मर्यादित नव्हते. दक्षिण भारतातही ते तेव्हढेच लोकप्रिय होते. शिवाय त्या मानाने वयाने तरुण होते, शरीराने आणि मनानेही; वक्तृत्वाचीही देणगी होती,.. त्या बेरकी आणि भविष्यवेध घेऊ शकणाऱ्या म्हाताऱ्या महात्म्याला हे कळले नसेल काय?
नवीन Submitted by हीरा on 2 July, 2022 - 00:20 >>

------- १०० % सहमत.

२०१४ नंतर नेहरु किती थोर होते , त्यांचे कार्य किती महान होते याची जाणिव प्रत्येक दिवशी होते. माझ्या पिढीसाठी त्यांनी खूप काही केले आहे हे आज २०२२ मधे पटते.

त्यांच्यासारख्या विज्ञानवादी आणि नसानसात लोकशाही भिनलेल्या नेत्यामुळेच आज भारताची प्रगती झालेली आहे आणि तो पाक पेक्षा अनेक योजने वेगळा आहे. त्यांना प्रधान बनायचे होते हे देशाच्या स्वातंत्र लढ्यात शुन्य योगदान दिलेल्या संघाचे सडके विचार आहेत.