टैरो गूढ़ विद्या भाग ४

Submitted by Keetaki Bapat on 1 July, 2022 - 05:34

नमस्कार
टैरो भाग -४
माझ्या सारखी बरेच लोक असतील की त्याना या कार्ड्स बद्दल कुतूहल वाटत असेल. आता आपण टैरो या विद्येचा कसा आणि कशा कशासाठी उपयोग करू शकतो ते पाहणार आहोत.
> अजूनही पाश्चात्य देशांमध्ये याचा दैवी मार्गदर्शन म्हणून उपयोग केला जातो. तेथील लोक एखाद्या च्या आयुष्याचा उद्देश्य काय आहे, तो कशा करता जन्माला आला आहे, काय कर्म आहे यासाठी त्याचा उपयोग करतात.
> टैरो कार्ड्स ही वेगवेगळ्या चित्रांनी भरलेली आहेत. त्यामुळे मनाचा विकास करतात, इंटुइशन पॉवर विकसित होते. मानसिक उपचार चालू असतील तर त्याला मदत होते.
> एखादी व्यक्ति अडचणी मधे असेल तर व्यक्तीच्या मानत काय चालू आहे त्याला बोलत करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
> एखाद्या व्यक्ति ची पर्सनालिटी कशी आहे, अगदी साधे सरळ प्रश्न जे आपण ज्योतिष शास्त्रा मध्ये विचारतो, लग्न होईल का नाही? कधी होईल? नौकरी कधी मिळेल? घर कधी होईल? कोर्टाचे प्रश्न? मदत मिळेल का नाही? पास्ट, प्रेझेंट आणि फ्यूचर काढणे.
> अगदी हरवलेली वस्तु सापडेल का? आणि कुठे सापडेल? फ़क्त हे असे प्रश्न लगेच विचारण आवश्यक असते कारण तर आणि तरच त्याचे योग्य उत्तर देता येते.
> समोर दोन किंवा अनेक पर्याय ( विद्यार्थ्यांना अड्मिशन, दोन जॉब ऑफर) असतील तर त्यातला नेमका कोणता पर्याय आपल्या साठी योग्य आहे ती दिशा दाखवतात ही कार्ड्स.
या विदयेला काही नियम सुद्धा आहेत फ़क्त आपण जेव्हा हे प्रश्न विचारतो तेव्हा तोच प्रश्न आपण २१ दिवस झाल्याशिवाय वीचारु शकत नाही किंवा मी पास होइन का ह्या प्रश्न परीक्षा झाल्याशिवाय वीचारु शकत नाही. कारण जी गोष्ट अजुन घडली च नाही त्याचे उत्तर कसे मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक कर्मा वर सुद्धा अवलंबून असतात.
वैयक्तिक अनुभव:-
सुरुवातीला मी जेव्हा टैरो शिकले तेव्हा मी एक कुतूहल म्हणून शिकले आणि मला या ज्योतिष आणि याच्याशी संबधित या सगळ्या विद्येची आवड असल्याने मला खुप मजा आली आणि एक आवडही निर्माण झाली. हे शिकत असताना श्रद्धा / अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी कधीच बाजूला गेल्या होत्या कारण हे एक धड़धड़ीत सत्य कळत होत. आपल्या भविष्या कड़े पाहण्या साठी निर्णय घेण्या साठी एक दिशादर्शक म्हणून शकतो. फ़क्त प्रश्न एकच होता की मी शिकले आहे खर पण मला सुद्धा खरच ही कार्ड्स वाचता येतील का? आणि मला पडलेल्या आणि भविष्यात पडणाऱ्या प्रश्नाची उत्तर मला पाहता येतील का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला "हो" अशीच मिळाली. जसे जसे मी प्रैक्टिस करत गेले आणि माझ्या गुरु कडून सुद्धा मला मदत मिळत गेली आणि माझे प्रेडिक्शन्स अचूक येऊ लागले तसे मला एक प्रकारचा आत्मविश्वास आला सुरुवातीला मी फ़क्त घरचे छोटे मोठे प्रश्न विचारत असे नंतर नंतर मी मैत्रीणि आणि नातेवाईक यांचे रीडिंग करू लागले आणि त्याना सांगितलेले सुद्धा सगळे खरे येऊ लागले. आता तर ही कार्ड्स माझ्याशी बोलतात त्याना समोरच्या व्यक्ति साठी काय अभिप्रेत आहे ते सरळ सरळ सांगतात. हे सगळ सांगण्या मागे एकच उद्देश्य आहे की यामधे अवघड असे कही नाही आहे. आपण एकदा त्या कार्ड्स शी कनेक्ट झालो की ती आपलीशी होतात आणि आपोआप आपल्याशी बोलायला लागतात. आपण जेव्हा ती वाचत असतो तेव्हा एक वैश्विक शक्ति (कॉस्मिक एनर्जी) आपल्याला मदत करत असते आपोआप च आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागतात. ही विद्या अगदी कोणीही शिकू शकत. तुम्हाला प्रश्न असेल की मला अंतर्ज्ञान (इंटुइशनस) होत नाही तर मला कसे येईल पण देवाने आपल्या सगळ्यांना ही देणगी दिलेली असते फ़क्त काही लोक त्याचा विकास करतात वेग वेगळ्या मार्गाने काही नाही करत इतकेच.
वरील बरेचसे प्रश्न मी स्वतःसाठी आणि इतरांसाठी विचारून कार्ड्स ची प्रचिती घेतली आहे.
तर अशी ही गूढ़ पण खुप सुन्दर आणि कुतूहल निर्माण करणारी आणि मार्गदर्शन करणारी विद्या आहे. माझ्या बुद्धिला जशी समजली तशी अगदी थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा शेवटचा भाग होता. आवडला असल्यासास जरूर लाइक करा.
समाप्त.
धन्यवाद!
केतकी अतुल बापट

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरुवातीला मी जेव्हा टैरो शिकले तेव्हा मी एक कुतूहल म्हणून शिकले

ओके. जी काही टेक्निकल माहिती समजली ती लिहा. कोणत्या देशांत अधिक वापरतात, कार्डांची संख्या आणि चित्रे फरक असतो का?

कुतूहल निर्माण करणारी आणि मार्गदर्शन करणारी विद्या आहे.
नवीन विषय शिकायला आवडेलच. तुम्ही शिकलाय तर थोडी अधिक माहिती द्यावी.