टैरो गूढ़ विद्या भाग ३

Submitted by Keetaki Bapat on 1 July, 2022 - 05:30

टैरो भाग -३
आपण मागच्या लेखा मध्ये मेजर अर्काना बद्दल माहिती पाहिली. अत मायनर अर्काना म्हणजे काय? तर ही ५६ कार्ड्स असतात आणि त्यामध्ये ४ संच (सूट) आहेत. या सचांची नावे आहेत - स्वोर्ड्स, वांड्स , पेंटाकल्स , कप्स.
प्रत्येक संचामध्ये १ ते १० कार्ड असतात आणि एक दूत किंवा निरोप्या (पेज) , एक सेनापति (नाईट) , एक राणी ( क्वीन) आणि एक राजा (किंग) आहे. याना पीपल्स कार्ड असेही म्हणतात. ही कार्ड्स तुमचे व्यक्तिमत्व, चरित्र, तसेच तुमच्या जीवनाबद्दल माहिती देतात. ते कदाचित तुमचे स्वतःचे व्यक्तिमत्व असू शकते. अथवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींचे असू शकते.
आता ह्या मधे १ ते १० अंकांची जी कार्ड्स आहेत त्यामध्ये जितक्या नंबर चे ते कार्ड असेल तेवढी सम्बंधित चिन्हे त्यामधे असलीच पाहिजेत. २ वांड्स म्हंटल तर त्यात तुम्हाला २ वांड्स तुम्हाला दिसतील, ४ च्या ठिकाणी ४ असे.
आता चिन्हे म्हणजे काय तर आपण वर पाहिले की ४ संच त्या प्रत्येकाला एकेक चिन्ह दिले गेलेले आहेत. ती काय आहेत ते पाहु तर १) स्वोर्ड्स - तलवार, शस्त्र, २) वांड्स - काठी, झाडाची मजबूत फांदी, बाम्बू ३) पेंटाकल्स - सिक्के ४) कप्स - पेले, चषक.
पहिल्या भागमध्ये सांगितल्या प्रमाणे हे ४ संच ४ तत्त्व आहेत. आता ही तत्त्व हे संच आपल्याला काय मार्गदर्शन करतात किंवा कोणता बोध होतो ते पाहुया.
१) वांड्स ( अग्नितत्व) - व्यवसाय, उद्योग, कर्म, अध्यात्म, प्रकृतीस्वास्थ्य
२) स्वोर्ड्स ( वायुतत्व) - बौद्धिक क्षमता, विचारशक्ति, क्षिक्षण, विद्या, व्यावहारिक ज्ञान.
३) पेंटाकल्स ( पृथ्वीतत्व) - पैसा, जडजवाहिर, सर्व आर्थिक बाबी, स्थावर, जंगम, ऐश्वर्य इत्यादि.
४) कप्स ( जलतत्व) - मन, राग, लोभ, प्रेम, मनःस्थिति, सर्व भावना - प्रणय, काम वासना, द्वेष, निराशा, हृदया सही संबधित असलेल्या सगळ्या गोष्टी.
एका अर्थी ४ विविध अंगांनी एका श्रुंखले मध्ये और बंदिस्त करणाऱ्या ह्या तत्वांचा ह्यामधे सर्वांगीण विचार केला जातो. जसे अर्थ,धर्म, काम,मोक्ष ही चतुर्भुज आहेत त्याप्रमाणेच या चार तत्वांचे इथे अतिशय महत्व आहे.
१ ते १० कार्ड्स असतात ती काय सांगतात तर एखादी परिस्थिति - भावनिक, आर्थिक, व्यावसायिक, आध्यात्मिक किंवा संधी, सम्भाव्य गोष्टी. अणि बाकी जी ४ कार्ड आहेत त्याला कोर्ट कार्ड्स ( दरबारी कार्ड्स )/ पीपल्स कार्ड (व्यक्तिजन्य) असे म्हणतात. राजाचे कार्ड हे शक्ति अणि सामर्थ्य दाखवते, राणी चे कार्ड हे समजूतदारपणा, संरक्षण, पोषण किंवा स्वीकारण्याची वृति यांचे प्रतिक असतात, सेनापति (नाईट) हे अपरिपक्व प्रौढत्वाचे प्रतिक असतात, प्रगतिशील युवक अणि पेज हे सगळ्यात लहन कुमार वयातील मुले किंवा अगदी नाजुक मनाचे, बालिश अणि खिलाडु वृति असलेल्या व्यक्ति चे प्रतिक असतात.
तर अशा प्रकारे आपण मेजर अणि मायनर अशा दोन्ही मिळून ७६ कार्ड्स काय असतात अणि त्यांची अगदी प्राथमिक ओळख करून घेतली. पुढील भाग हा शेवटचा भाग असेल त्यामधे आपण या विद्येचा कसा अणि कशा कशासाठी उपयोग करता येतो ते पाहु.
क्रमश:
केतकी अतुल बापट

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटो टाका. त्यातून भविष्य सांगणे आणि विश्वास ठेवणे हे पुढे. पण आता टेक्नीकल माहिती सांगण्यातच गूढता भरून राहायला नको.