म्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला.
“पोरी ह्याचा ब्रेक आणि अॅक्सिलेटर कुठेय?”
“आई, हे गुगलचे लेटेस्ट मॉडेल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते.”
“म्हणजे एआय ना?”
मुलीला स्वतःची शरम वाटली.
“”चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.” अस म्हटले कि गाडी पळायला लागते. ह्या गाडीला नॅचरल लँग्वेज इंटरफेस आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी पळवावी. बाय आणि टेक केअर. पोहोचल्यावर टिंकल दे.”
वाटेत वाघोबा दिसला. स्कूटरवर बसून म्हातारीची वाट पाहत होता. मुलीकडे जाऊन लठ्ठ मुठ्ठ होऊन येते मग मला खा म्हणाली होती. बघतो काय तर म्हातारी गुगल भोपळ्यातून येत होती.
“म्हातारे, थांब. कुठं पळतेस?”
“आता काय झाल?”
“म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.”
म्हातारीने कावा ओळखला. तिने ऑर्डर दिली, “म्हातारी कोतारी कुछ भी नाही. चल रे भोपळ्या टुणुुक टुणुुक, भोपळ्या फास्ट फॉरवर्ड.”
वाघोबाने स्कूटरला किक मारली. पण काय उपयोग? किका मारता मारता म्हातारी दिसेनासी झाली.
सुसाट धावणाऱ्या भोपळ्यापुढे स्कूटरची काय कथा.
गंमत बघत असलेला कोल्हा म्हणाला, “वाघोबा, तू केव्हापासून भोपळ्याची भाजी खायला लागलास?”
“मूर्खा, ती भोपळागाडी पेट्रोलशिवाय आणि चार्जिंगशिवाय धावते.”
(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com)
सो फनी......... मस्त ,
सो फनी......... मस्त ,