सर्व ज्येना व त्यांचे केअर्गिव्हर ह्यांना एक खुष खबर.
डॉल्फिन मसाजर स्वस्त आणि मस्त घरगुती मसाज स्वतः किंवा मदतनिसा द्वारे आता शक्य.
ज्यांना पुढे वाचायचे नाही त्यांनी अमेझॉनवर सर्च करावे.
https://www.amazon.in/Concepta-Handheld-Massager-Vibration-Magnetic
=================================================================================
थोडी वैयक्तिक पार्श्वभूमी अपरिहार्य आहे. चाळीशीच्या सुरुवातीस गुडघा दुखायला लागला होता. तेव्हा आई म्हातारी, लहान मुलगी नवा बिझनेस असे सर्व धावपळीचे जग होते. त्यात ही २००६ मध्ये एकदा एक्सरे काढला होता. त्यात गुड्घ्याच्या जॉइन्टमधले कार्टिलेज कमी होत आहे हे दिसत होते. पुढील वर्शी नवरा वारल्यावर तब्येतीकडे लक्ष न देता घर व बिझनेस ह्यावर फोकस होता. त्यात २०१२ मध्ये मुंबई शिफ्ट. मुंबईची किलर नोकरी टाइमिन्ग्स्न, ह्या सर्वात गुडघ्याकडे दुर्लक्ष , पेन किलर घेउन काम चालवणे असे झाले. त्यातही २०१६ मध्ये परत एक्स्रे फुलबॉडी चेक अप त्यात कॅल्शिअम कमी डी व्हिटामिन कमी ऑस्टिओपोरोसिसची शक्यता असे निदान आले. गुडघा सिचुएशन हळू हळू चिघळत होती. चालायला त्रास होत होता. पण तसेच पुढे नेले. हे चुकीचे आहे. २०१९ मध्ये क्रायसिस सिचुएशन. ऑफिसातुन निघाले तेव्हा जिना उतरता येइना, कशी बशी आटो मागवुन घरी पोहोचले. नेक्स्ट डे डॉक्टर कडे नेले ( हा चुकीचा डॉक्टर होता) ह्याने निव्वळ घाबरवले व सर्जरी कराच असे सांगितले. ह्याला रिकव्हरी टाइम दीड महिना तरी आहे. इतकी रजा तेव्हा शक्यच नव्हती. व नोकरी सोडणे शक्य नव्हते. आमच्या ऑफिसात एक फ्रेंच डॉक्ट् र आला होता एक सबसिडरीत त्याने एक्सरे पाहिले व काही गरज नाही सर्जरी ची असे सांगितले. मग कोव्हिड, लॉकडाउन , इतर रोग निदान.
कट टु प्रेझेंट. सध्या इतर व्याधींबरोबर गुडघेदुखी सोबतच राहात आहे. व जास्त चालले की त्रास होतो त्यात खुब्याचे जॉइन्टही दुखायला लागले. मागील आठवड्यात फारच त्रास झाला तेव्हा नेक्स्ट डे पहिले चांगल्या आर्थो पेडिक सर्जनची अपॉइन्ट्मेंट घेतली व दुसरे म्हणजे अमॅझॉन सर्च केले कारण रात्री बेरात्री त्रास झाला तर कुठे पळायचे.
तुमचा आर्थो असेल तर त्याच्याकडून प्रिस्क्रिप्शन घेउन पेन किलर नेहमी स्टॉक मध्ये ठेवाच. मी गाबापेंटिन घेतली शेवटी . मला ह्या गोळीची व साइड इफेक्ट्ची भीती वाटते.
जावेद अखतर जाहिरात करतो ते डॉ. आर्थो मसाज ऑइल पण चांगले आहे आराम पण पडतो. पण अजुन काही करायला हवे. फार पूर्वी म्हणजे आई बाबा( असताना- ७०-८० च्या दशकात) ह्यानाही आर्थराइटीस होताच. त्यामुळे तेव्हा त्यांच्या साठी फिलिप्स कंपनीचा इन्फ्राफिल दिवा आणला होता. ह्याने इन्फ्रा रेड दिवा लावल्यावर लाल रंगाचे किरण व हीट फोकस एरिआवर फेकली जाते व दहा मिनिटे ठेवायचे . आराम पडतो हे आठवले. नेक्स्ट डे अमेझॉन वर सर्च केले तर त्या दिव्याचे अनेक प्रकारही आहेत. व शिवाय हा डॉल्फिन मसाजर ही सापडला लगेच घेउन टाकला.
४८% डिस्काउन्ट पडून ८२९ रुपयाला मिळाला प्राइम असल्याने डिलिव्हरी फ्री व दोन दिवसात आला.
फीचर्स:
उत्पादनाचे खोके अजून वरच्या एका अमेझॉन च्या खोक्यात घालून पाठवलेले. काय हे उगीच वाया पॅकेजिन्ग. ग्रहावर ओझे, वगैरे वैतागून झाले पण मूळ हिरवे खोके लगेचच फाटले व अमेझॉनवाले जास्त मजबूत असल्याने डॉल्फिनला त्यातच ठेवले आहे.
हातभर साइजचा मसाजर आहे. लहान मुलांचा प्लास्टिकचा खेळातला डॉल्फिन असतो तसाच आहे. त्याच्या पोटात एक गिरकी मारणारे व्हील सारखे आहे व मसाज करणारे मेकानिझम ते हेच.
ह्यावर घालायला तीन जाड प्लास्टिकच्या टोप्या आहेत. वेगवेगळा पद्धतीचा मसाज ह्यामुळे शक्य होतो. फोटो टाकते म्हणजे लक्षात येइल .
दोन स्पीड लेव्हलस आहेत वीक व स्ट्रॉन्ग. मध्ये पावर ऑन ऑफ बटन आहे. इतकेच काय ते.
बरोबर फक्त एक बारकी चिट्ठी आहे. त्यात कोणत्या मणक्यावर मसाजर फिरवला की कोणती व्याधी असल्यास उप योग होईल हे आहे. हे ही फोटो टाकते. व वाचून लिहिते फार बारीक आहे. आधीच गेम खेळून डोळ्यांची भोके झालेली आहेत. त्यात हे वाचा आणि. पण उपयोगी माहिती आहे.
प्लग अँड प्ले आहे. निव्वळ हेअर ड्रायर सारखेच. दोन सेटिन्ग. मसाज र दुखृया भागावर ठेवायचा व ऑन करायचे पहिले वीक सेटिन्ग वर करा
व मग जरूर पडल्यास स्ट्रोन्ग. जसा मसाज हवा आहे तशी प्लास्टिक टोपी सिलेक्ट करायची. टोपी शिवाय मसाज करूनका. शक्यतो एखादा पातळ कपडा- सुती पायजमा/ लेगिन्ग घालुन त्या वरून मसाज करा. बेअर स्किन वर थोडे करून बघा त्रास होत नसल्यास गो अहेड.
मसाज करताना ओलेत्याने करू नका व मोइस्ट भागावर मसाजर आजिबात फिरवू नका अशी वॉर्निग्न आहे कारण शॉक बसू शकतो.
माहिती बरोबर खालील फायदे दिले आहेत.
१) कामाच स्ट्रेस, आंबलेले अंग व जॉइन्ट्स, दुखर्या मसलसना आराम मिळतो.
२) रक्ताभिसरण मसाजने सुधारते त्यामुळे एंडॉर्फिन्स रिलीज होतात त्यामुळे जास्त काळजी, डिप्रेशन चा त्रास कमी होउ शकतो.
३ ) पाठीच्या वरच्या कण्यातील टेन्शन व खालच्या भागातील स्ट्रेस कमी होतो रेगुलर मसाजने. मी अजून पाठीवर वापरलेला नाही.
पण हात लांब करून पुर्ण पाठ भर मसाजर फिरवता येतो.
४) खांदे दुखीत उपयोग होईल.
५) मला डॉल्फिन आवडतात. त्यामुळे बघुनच मस्त वाट्टे. ह्याचे नाव काय ठेवावे?
तसेच हा फक्त अंगावरुन बाहेरुनच वापरायचा आहे.
सत्तर पंचाहत्तर ऐंशीच्य पुढील व पूर्व व्याधी अस्लेल्या ज्येनांवर वापरण्या आधी कृपया डॉक्टरचा सल्ला घ्या .वयानुसार हाडे फार नाजूक होत जातात. पेशंटला पोटावर झोपवून, वीक सेटिन्गवर ,अंगावर पातळ कपडा घालून त्यावर हळू मसाज केला तर चालेल का विचारा. थोडा आराम तर नक्की मिळेल.
कंट्री ऑफ मेकिन्ग किंवा ओरिजिन मला तरी दिसली नाही. अमेझॉन फुलफिलमेंट रॉक्स. प्राइम रॉक्स
घरी एकट्या राहणार्या हिंडत्या फिरत्या ज्येनांना आपले आपण मसाज करुन घेण्यासाठी उपयुक्त आहे. नवरा-बायको जोडी असल्यास एक मेकांना करून देउ शकतात. व वयस्क व्यक्तीस केअर गिव्हर / मदतनीस करून देउ शकतात, फारसे ट्रेनिन्ग लागत नाही. - मला तरी नाही लागले. पण मी अर्ली अडाप्टर टाइप व्यक्तिमत्व आहे. योग्य ते ट्रेनिग द्या.
कोव्हिड काळात इतर चेकिन्ग व सर्जरी बंद होत्या व फिजिओथेरपी पण जरा अवघ्ड वाटत होती. पण हे घरच्या घरी व स्वतः करणे शक्य आहे.
निदान तात्पुरता आराम तरी नक्की मिळतो. मी दोन दिवस वापरले आहे. पण चालताना गुडघ्यात कळ यायची ते बंद झाले आहे. सात आठ
दिवसांनी अजून नक्की काय ते कळेल.
आमचे डॉक्टर परगावी गेले आहेत ते आले की भेटुन स्टेटस घेउन सर्जरी/ फिजिओथेरपी/ गोळ्या सर्व अपडेट करून घेइन . आता सर्जरी पण शक्य आहे. रिकव्हरीपुरता वेळ माझ्यापाशी आहे. पुढील स्टेप वैद्यकीय सल्ल्यानुसार काय ते. मसाजर हा फक्त तात्पुरता आराम मिळण्यासाठी आहे. पण उपयोगी गॅजेट.
बरेचदा ज्येनांना काय गिफ्ट द्यावे असा प्रश्न पडतो. तेव्हा द्यायला उपयुक्त वस्तु वाटली मला. परदेशातून ऑर्डर देता येइल.
डिस्क्लेमरः मी हे विकत नाही किंवा प्रॉड्क्ट रिव्यू लिहून मला काहीही आर्थिक फायदा नाही. अॅक्टिव्ह ज्येना व दूरदेशी वसलेल्या मुलांसाठी माहिती म्हणून लिहिले आहे.
माझा सध्याचा चौथा आहे. चांगले
माझा सध्याचा चौथा आहे. चांगले रिझल्ट्स आहेत. मुलं लहान असताना मात्र मे मसाजर तुटतात दणादण. मुलांना खेचून मोठे करावे किंवा मुलांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावा.
It's really like a big toy.
It's really like a big toy. That works for you.
चांगला प्रॉडक्ट रिव्यू.
चांगला प्रॉडक्ट रिव्यू.
व्यक्तिशः मी पोहणे जास्त पसंत करतो, ज्याने मला खूप फायदा होतो. सगळ्यांना हे शक्य नसते, त्यांच्यासाठी मसाजर हा चांगला पर्याय आहे पण केवळ तात्पुरता आराम मिळतो त्याने.
छान
छान
लिंक काम करत नाही
लिंक काम करत नाही
असे मेक्यानिझम असलेली पूर्ण
असे मेक्यानिझम असलेली पूर्ण गादीच नसते का ?
>>>लिंक काम करत नाही>>>
>>>लिंक काम करत नाही>>> अमॅझॉन वर जाऊन डॉल्फिन मसाजर म्हणून सर्च करा, सापडते
https://www.amazon.in/s?k=dolphin+massager+body&crid=3MJDJKBM8I1N&sprefi...
>>>मी गाबापेंटिन घेतली शेवटी
>>>मी गाबापेंटिन घेतली शेवटी . मला ह्या गोळीची व साइड इफेक्ट्ची भीती वाटते.>>> मी गेले ३ वर्षे रोज एक घेत आहे झोपताना.... डॉ च्या सल्ल्याने... त्यांना मी विचारले...... काही धोकादायक नाही म्हणाले
एक मसाज mat दिसत आहे , 9,10
एक मसाज mat दिसत आहे , 9,10 मोटर आहेत त्यात
ते घेईन
आमच्या घरी गेले 3-4 वर्षे
आमच्या घरी गेले 3-4 वर्षे वापरात आहे. बाबांनी कोणत्यातरी प्रदर्शनातून आणला होता. आमच्या बोक्याने (माझा भाचा!) बिचार्या डॉल्फिनच्या तोंडाकडचा भाग फोडला आहे तरीही काम करतो आहे. फक्त आदळआपटीमुळे प्लॅस्टिकला अनेक ठिकाणी तडे गेल्याने vibrate होऊन खूप आवाज येतो. बाकी पाठदुखीवर मला खूप उपयोगी वाटतो.
हा आहे का?
हा आहे का?
कॉर्डची लांबी काय आहे? कंट्री ऑफ ओरिजिन चायना आहे. शेवटी प्रॉडक्ट डिटेल्समध्ये दिले आहे.
हा सिरॅमिकचा , मेड इन इंडिया आहे.
सगळ्यांच्य कॉर्ड लहान आहेत
सगळ्यांच्य कॉर्ड लहान आहेत
अवांतर
अवांतर
गुढग्यांना सपोर्टिंग स्नायूंसाठी व्यायाम केल्याने फायदा व्हावा.
१. खुर्चीत बसून एक एक पाय गुढ घ्यात ताठ करून पुन्हा खाली आणणे. हे पाठीवर झोपून करता येईल. १ अ - पाठीवर झोपून एकेक पाय कंबरेपासून वर उचलणे. १ ब कुशीवर झोपून पाय कंबरेपासून वर उचलणे.
२. हात असलेल्या खुर्चीवर बसून ऊठ बस.
३. उभे राहून पाय गुढघ्यात मागे उचलणे. कंबरेपासून मागे उचलणे.
४. एक पाय पायरीवर कायम ठेवून दुसर्या पायाने पायरी चढणे उतरणे.
५. पायांत अंतर ठेवून उभे राहून गुढ्घ्यांत वाकणे व सरळ उभे राहणे.
+ स्ट्रेचिंग
खुर्चीवर बसून समोर दुसरी खुर्ची /स्टूल ठेवून एकेक पाय त्यावर ताठ ठेवणे. - किंवा पश्चिमोत्तानासन
उभे राहून एकेक पाय गुढग्यात मागे दुमडून हाताने धरणे. किंवा शक्य असेल तर वज्रासन.
डॉल्फिन मसाजर चा स्लो स्पीड
डॉल्फिन मसाजर चा स्लो स्पीड पण बराच असतो. ह्याचा उपयोग एका मर्यादेत करावा, अर्थात दुखणे असह्य असल्यावर असे काही उपाय खूप रिलीफ देतात जे डॉक्टर भेटेपर्यंत तरी आयुष्य सुसह्य करतात. एक अजून छोटासा असतो, त्याचा उपयोग अवघडलेले शोल्डर मसल रिलॅक्स करायला वापरता येते. https://www.amazon.in/Lifelong-LLM09-Mini-Massager-Brown/dp/B06ZZ2X5JS/r...
भरत..बाकी ठीक आहे..पण वज्रासन
भरत..बाकी ठीक आहे..पण वज्रासन गुडघे दुखी साठी योग्य नाही. कुठेही गुडघा fold होणे advisable नाही
भरत अगदी हेच लिहायला आलो होतो
भरत अगदी हेच लिहायला आलो होतो,
मसाजर ने मिळणारा आराम तात्पुरता असतो,
Hamstrings, quadricep, glutes, हे स्नायू स्त्रेच करणे याने जास्त आराम पडतो, प्लस इतर हालचाली सोप्या होतात.
स्नायूंचे कनेक्शन कुठून कुठे असेल हे अनट्रेंड माणसाला कळने अवघड आहे. म्हणजे अगदी अखडलेल्या hamstrings मुळे लोअर बॅक पेन होऊ शकते,
आखडलेल्या gluts किंवा piriformis मुळे सायतिका झाल्यासारखा कळा येऊ शकतात.
त्यामुळे क्वालिफाईड डॉक्टर, योगा शिक्षक, पर्सनल ट्रेनर, फिसिओ थेरपिस्ट यांच्या सल्ल्याने स्ट्रेचिंग चे व्यायाम केलेत तर जानवण्या इतपत फरक नक्की पडेल
( गुडघेदुखीच्या कारणासाठी कर्तीलेज झिजणे वगैरे कोंपलिकेशन नाहीत असे गृहीत धरले आहे,)
आंबटगोड,
आंबटगोड,
गुडघा कुठे दुखतो आहे त्यावर व्यायाम अवलंबून असतो,
गुडघ्याच्या वाटीच्या किंचित वर आतल्या बाजूला,
गुडघ्याच्या वर बाहेरच्या बाजूला
थेट गुडघ्याच्या वाटीमध्ये या सगळ्यासाठी वेगवेगळे व्यायाम आहेत.
यात अगदी वज्रासन, किंवा त्याहून जास्त कोनात गुडघा दुमडणारी आसने सुध्धा येतात.
आणि धागा विषयाबद्दल,
आणि धागा विषयाबद्दल,
अशीच एक मसाज गन सुध्धा येते, हॅण्ड हेल्ड drilling मशीन सारखी दिसते. भलतीच powerful असते, स्नायूंबद्दल बेसिक माहिती असल्याशिवाय नौशीक्यानी वापरू नये