गुंढेवारीत बांधलेला फ्लॅट विकत घ्यावा का

Submitted by -अनिकेत्त on 10 June, 2022 - 01:28

गुंढेवारीत बांधलेला फ्लॅट विकत घ्यावा का. त्या साठी कोणती काळजी घ्यावी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे काय असते

म्हणजे बिल्डर फ्लोअर ला ?

की गावठाण ?

गुंठेवारीत म्हणायचे आहे काय?
Plots असतात तीन ते पाच गुंठ्यांचे त्यांची सोसायटी असते. NA plots असतील तर घरे बांधतात.

शेतकी किंवा फलोद्यान प्रकारचेही plots असतात. त्यावर झाडे लावायची आणि शेतघर म्हणजे फार्माहाऊस बांधतात. तुमच्याकडे चालू सातबारा हवा.

गुंठेवारी मधे अनियमीत पणे केलेली बांधकामे नंतर नियमित केली जातात.

बर्‍याच ठिकाणी शेत जमिनीवर एन.ए न करता, बांधकामाची परवानगी न घेता बांधकामे केली होती. अशी (चटई क्षेत्र निर्देशांकानुसार असलेली नियमा मधे बसू शकणारी) बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायदा करण्यात आला.

या ईमारतींना, सदनिकांना टॅक्स जास्त पडतो.

माझ्या मते अशी बांधकामे असलेल्या सदनिका न घेणे ऊत्तम. कर्ज मिळायला येणार्‍या अडचणी, बांधकामाची गुणवत्ता, ईमारतीची ( आग, भुकंप पासून) सुरक्षितता वगैरे अनेक बाबी आहेत.

अगदीच घ्यावयचे झाल्यास कागद पत्रे व गुंठेवारी प्रमाणे नियमित झाल्याची परवानगी नीट तपासून घ्यावी. शिवाय आधी अशा बांधकामांवर बहुतेक शास्ती कर होता ( महाराष्ट्रात भाजप सरकार ने तो हटवला. ) असा कर परत लावल्यास भुर्दंड बसू शकतो.