वेगळा भाग - १३

Submitted by निशा राकेश on 5 June, 2022 - 15:32

भाग – १३

बाबूचा लहान भाऊ चंदू हा आईच्या हातून मार खात होता , आणि जोरजोरात किंचाळत होता ,

बाबू पळतच घरी शिरला , आई च्या हातात लाटण होत , आणि चंदू माराच्या भीतीने खाटेखाली जाऊन दडून बसला होता.

बाबू ने आधी आईच्या हातातल लाटण घेतल , “ आई काय झाल , का मारतेय तू चंदू ला “

“विचार , तूच विचार , शाळा सोडून कुठे जातो रोज , उनाडक्या करत फिरतो , “

“चंदू , आधी बाहेर ये तू , ये आई नाही मारणार तुला , मी आहे ना “

चंदू रागारागातच बाहेर आला , आणि बाबू कडे प्रचंड रागाने बघत तो खाटे च्या कोपर्याशी जाऊन बसला.

“रागाने बघू नकोस त्याच्या कडे “ आई पुन्हा चंदू वर चिडली.

“तू तर मलाच बोल , हा बाब्या बाहेर काही करो, दर महिना पैसे ठेवतो ना तुझ्या हातावर म्हणून तोच तुझ्या जवळचा ,मला तर उचलून आणला आहेस कुठून तरी अशी वागतेस कायम माझ्याशी”

“हे बघ , चांद्या, बाबू कामावर जातो म्हणून नाही तर तो माझ्याशी नेहमी खर बोलतो आणि सचोटीने वागतो म्हणून मी त्याची बाजू घेते , तू किमान खर बोल माझ्याशी , तेवढ केलस तरी पुरे “

बाबुला त्याचं ते संभाषण सहन होईना , “ आई , पण झाल काय तू त्याला का मारत होतीस , “

“ अरे हा शाळा बुडवून कुठे तरी जातो रोज , आज मला ह्याच्याच वर्गातल्या महेश शी आई सांगत होती,म्हणून मी मग ह्याच शाळेच दप्त्तर तपासलं तर त्यातून , मला बिड्या आणि तंबाखूची पाकीट सापडली , हे सर्व आल कुठून , कुठे जातो हा रोज शाळा बुडवून “

“चंदू , आई काय बोलतेय हे खर आहे का ?” बाबू त्याला समजुतीने विचारू लागला .

“ये , चले, तू कोण मोट्टा मला विचारणार, स्वतः च बघ आधी , मग ये माझ्याशी बोलायला “

“ हे बघ चंदू , तुला नसेल बोलायचं माझ्याशी तर काही हरकत नाही तू आईला सांग , मी जातो बाहेर “

अस बोलून बाबू बाहेर पडला आणि दत्त मंदिरात जाऊन बसला , त्या दिवशी मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम असावा सर्व भक्त मंडळी एक सुरात पर्मेंश्वराची करूना भाकीत होते, हरिनामात तल्लीन होऊन स्वतःला आणि स्वतःच्या दुक्खाना विसरू पाहत होते.

बाबू मात्र फक्त दत्ताच्या मूर्ती कडे एकटक पाहत बसला , दत्त महाराजांची शांत प्रतिमा डोळ्यात साठवून घेऊ लागला , त्याने शांतपणे डोळे मिटले , डोळ्यांच्या कडान’ मधून उष्ण पाणी पाहू लागल. काहीवेळाने त्याच्या खांद्यावर हात पडला त्याची तंद्री भंग झाली मागे आई उभी होती पाणी भरल्या डोळ्यांनी.

“ आई , अग काय झाल , काही बोल्ला का चंदू”

“ सिनेमाच्या थेटरा बाहेर ब्लाक ची तिकीट विकतो म्हणाला”

“काय , पण हे सर्व कशासाठी , फक्त बिडी आणि तंबाखू साठी “

आई चे डोळे पुन्हा भरून आले ,

“मला वाटत बाबू तो दारू देखील पितो , कारण एक दोन दा तो शाळेतून घरी आला तेव्हा मला दारू चा देखील वास आला होता , त्यावेळी मी दुर्लक्ष केल मला स्वप्नात देखील कधी वाटल न्हवत कि माझा चंदू ह्या थराला जाईल म्हणून , मी कुठे चुकले त्याला वाढवताना , तू , चंदू , झेंडु तुम्ही सर्व माझीच लेकर आहात , मग हा असा कसा निपजला , आता काय करू मी अवघा बारा वर्षाचा आहे हा , आणि ह्या वयात ह्याला हि असली व्यसन, दादांना कळल तर खूप मारतील त्याला “

“आई , तू नको काळजी करूस , सर्व होईल ठीक , मी आहे ना , मी बोलतो चंदू शी”

“ अरे तो तर तुझ्याशी , “

“हो , माहितीये नाही नीट बोलत , पण तरीही मी बोलेन , काही जरी झाल तरी माझा लहान भाऊ आहे तो “

चंदू च्या काळजी पोटी आणि प्रचंड विचाराच्या तणावात बाबू च कशातच लक्ष लागल न्हवत , त्याच्या डोळ्यासमोर कायम त्याची डोळे भरलेली आई येत होती , आणि त्याच वेळी त्याला दादांचा प्रंचंड राग हि येत होता कारण नाही म्हंटल तरी त्याच्या घरात दादांना च फक्त दारू बिडी तंबाखू च व्यसन होत , आणि दरवेळी ह्या वस्तू आणायला ते चंदुला दुकानात पाठवीत .

ह्याच विचारात बाबू चा बायडा सोबतचा सिनेमाला जायचा ठरलेला बेत बाबू विसरून गेला .

बायडा त्या दिवशी त्यातला तयार होऊन तीन वाजायच्या आत गुंजनला जाऊन उभी राहिली.

आणि बाबू काही त्या दिवशी तिकडे गेला च नाही , तो साफ विसरून गेला काम करीत राहिला आणि सुटल्यावर घरी जाताना त्याला रस्त्यात बायडा उभी दिसली ,

तिला बघून तो हसला ,” काय ग , इथे का थांबलीस , अशी “

बायडा काहीच बोलली नाही नुसती रागारागाने बाबू कडे पाहत होती

बाबुला तरीही काही समजल नाही .

“काय झालय तुला , इतकी का रागाने पाहतेय्स माझ्याकडे “

बायडा त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याच्या दंडावर एक जोराचा चिमटा काढला , अचानक बदलेल्या तिच्या पवित्राने बाबू देखील जोरात किंचाळला.

“अग ये ,बावळट आहेस का , काय झालय तुला , अशी काय वागतेस “

“आज शिनेमाला जायचं होत न , कुठंय तुझा शिनेमा , आणि कुठ व्हतास तू , माझ बुजगावण केल्तस चार तास, न्हवत यायचं तर सांगायचं ना , म्या पण नसती गेली शोभा करून घ्यायला “

बाबू च डोक तेव्हा ताळ्यावर आल , तो डोक धरून तसाच रस्त्यावर खाली बसला, येणारे जाणारे सर्व लोक त्याच्याकडे मान वळवून वळवून पाहत चालत होते.

त्याच्या तश्या कृतीमुळे बायडा अचानक शांत झाली , तिने त्याला उठवून उभ केल, तो काहीतरी बोलेल ह्या आशेने त्याच्याकडे पाहू लागली. तिला बाबू उगीच विसरणार नाही तो कसल्या तरी विचारात आहे हे कळल.

“विसरलो , साफ विसरलो , माफ कर मला “ बाबू त्याचे दोन्ही हात तिच्या समोर जोडून बोलू लागला .

बायडा त्याचे दोन्ही हात हातात घेतले आणि दोघे टेकडी दिशेने जाऊ लागले.

बाबू बायडाला घरात चंदू विषयी जे काही घडल ती सर्व हकीकत सांगितली, बायडा ने सर्व शांतपणे ऐकून घेतल.

बाबू च तिला खूप वाईट वाटल , आपण त्याला उगीच इतक बोललो ह्याच देखील तिला खूप वाईट वाटल, तीने बाबूला जवळ घेतलं अगदी त्याच्या आई सारख , त्याच्या डोक्यातून प्रेमाने हलकेच हात फिरवू लागली , बाबू चे डोळे त्याच्याही नकळत वाहू लागले त्याला हमसून हमसून रडू फुटू लागल , बायडा तिच्या पदराने त्याचे डोळे पुसू लागली , काही वेळ ते तसेच एकमेकांच्या मिठीत काहीही न बोलता नुसते बसून राहीले , अंधार पडायला लागला तशी बायडा त्याच्या पासून वेगळी झाली आणि दोघे घरी जायला निघाले .
त्या रात्री रोजच्या प्रमाणे बाबूचा चांदण्या मोजण्याच्या खेळ सुरु आसनातच त्याच्या कानावर कसली तरी बडबड ऐकू आली , कोणीतरी तावातावान खूप काहीतरी बोलत होत , आवाज ओळखीचा वाटला म्हणून तो उठून त्या आवाजच्या दिशेने जायला लागला तर लांब एका झुडपात चंदू काहीतरी अगम्य अश्या आवाजात काहीतरी मंत्र बोलत होता , त्याच्या समोर कसल्या तरी राखेचा ठीग पडलेला होता , ती राख हाताच्या मुठीत धरून मंत्र उच्चारून हवेत भिरकावीत होता , बाबू ला त्याचा तो अवतार बघून प्रचंड भीती वाटली , बाबुला त्याला थांबवायची देखील हिम्मत झाली नाही , तो तसाच उलट पावली घरी पळत जाऊन आई आणि दादांना उठवून हिकडे घेऊन आला ,
तो चंदू चे राख उडवण थांबलेलं होत तो त्यासच त्याच ठिकाणी समाधिस्त अवस्थेत बसला होता.

“चांद्या काय करतोयस हिकड” दादानी त्याच्या खांद्याला धरून त्याला विचारल .

चंदू ने हु कि चू केल नाही ,

“चंदू , काय विचारतायेत दादा , तू आता हिकडे काय करत होता” आई ने देखील विचारून पाहिलं

तरीही चंदू वर काही परिणाम नाही .

मग बाबूने त्याला हिम्मत करून विचारल , “चंदू, काय आणि कसले मंत्र बोलतोयस, आणि राख कसली “

बाबू चा आवाज कानावर पडतात चंदू भानावर आला आणि रागारागात बाबू कडे पहात तिकडून निघून जाणार तेवढ्यात बाबूने त्याला पुन्हा अडवल ,” मी काय विचारतोय , कसली हि राख आणि काय करत होतास तू हिकडे “

“माझ्या वाटेतून बाजूला हो , नाहीतर हकनाक मरशील” चंदू चे डोळे आग ओकित होते.

“कोण मी , कोण मारणार मला तू, तू मारणार मला ,”

“हो , मी मारेन , माझ्या वाटेत आडव्या येणाऱ्या प्रत्येकाला मारून टाकेन”

“चंदू , भानावर ये , अरे काय बोलतोयस तू , काय झालाय तुला , अरे आपल्या आई दादांची अवस्था बघ , ते किती घाबरले आहेत तुला अस बघून, तुला काहीच कस वाटत नाही “

चंदू तरीही त्याला ढकलून जायला निघाला, बाबूच त्याच्या रागावारच नियंत्रण सुटल आणी त्याने चंदूच्या जोरात कानाखाली मारली , चंदू हेलपडत खाली पडला आणि तिकडेच त्याची शुद्ध हरपली .

आई धावत जाऊन त्याला शुद्धीवर आणायचा प्रयन्त करू लागली दादांना काही सुचत न्हवत ते तसेच गोठल्यासारखे एका जागी उभे होते.

तोवर आसपास चे लोक जमा होऊ लागले , “डॉक्तर कड न्ह्या कोणीतरी पोराला” , अस कोणीतरी म्हणत , तसा बाबू भानावर आला वस्तीतल्या चार पाच लोकांच्या मदतीने त्याने चंदुला एका दवाखान्यात घेऊन गेला.

डॉक्टरनी त्याचे डोळे, नाक, तोंड , सर्व तपासल आणि “ह्या मुलाने प्रचंड प्रमाणात गांजा ओढलेला दिसतोय नशा उतरली कि येईल शुद्धीवर “ अस सांगून त्यांना घरी पाठवलं.

दुसर्या दिवशी बाबू कामावर जायला निघाला , चंदू खाटेवर शांत झोपला होता , बाबूला त्याच्या कडे बघून खूप राग आला.

“बाबू, आज राहशील तू घरी , मला ह्या चांद्या च काही ठीक दिसत नाही , कुठे जातो काय करतो, कुणाची सांगत धरलीये काय माहित ,”

“मी घरी राहून काय करू आई , बघ त्याच्या कडे त्याला काही आहे का आपण इथे इतकी काळजी करतोय आणि हा बघ कसा निवांत झोपलाय, काही नाही होणार , तू नको काळजी करू , “ अस म्हणून बाबू त्याच्या डब्याची पिशाबी उचलून घराबाहेर पडला.

त्याच्या संबंध दिवस कामात रात्रीचे प्रसंग येत होते , त्या दिवशी कामावरून लौकर घरी जायला निघला, वाटेत बायडाला भेटून जाऊ म्हणून तिच्या कामाच्या ठिकाणी गेला .

विचारांच्या नादात गेट उघडून तो आता गेला आणि त्याने तंद्रीतच बंगल्याच्या दाराची बेल वाजवली . .

दर उघडल आणि समोर बायडाची मालकीण त्याच्याकडे कपाळाला अटी पडून बघत उभी होती.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरी उगाचंच ट्विस्ट नाही, भारी सवांद नाहीत पण तरीही छोट्या छोट्या प्रसंगातून कथा पुढे सरकतेय नुस्ती सरकत नाही तर आम्हाला अजून ह्यात गुंतवते, ही पात्र आता जवळची वाटू लागली आहेत, बाबू आणि बायडाच प्रेम सफल व्हावं अस वाटत.
असो तुम्ही कथा छान लिहिली आहे पुढचे भाग ही असेच सुंदर असतील अशी आशा आहे