मराठमोळ्या सई ताम्हणकरचा अबुधाबीत बोलबाला - मिळवला मानाचा IIFA पुरस्कार

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 June, 2022 - 14:11

मराठमोळ्या सई ताम्हणकरचा अबुधाबीत बोलबाला - मिळवला मानाचा IIFA पुरस्कार

सई ताम्हणकर हिने मिमी या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार जिंकला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने IIFA या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळवून मराठी सिनेसृष्टीची मान उंचावली आहे.

सविस्तर बातमी ईथे वाचू शकता -
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...

मिमी हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता. हा चित्रपट सरोगसीवर आहे. क्रिती सेनोन त्यात प्रमुख नायिका आहे. सईने तिच्या मुस्लिम मैत्रीणीची भुमिका निभावली आहे. दोघींनीही या नायिकाप्रधान सिनेमात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट नायिका आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आहे हे विशेष.

चित्रपट मी पाहिला आहे. आवडला होता. कदाचित अजून चांगला बनू शकला असे तेव्हा वाटले होते. पण विषय आवडला होता. या दोघींसोबत पंकज त्रिपाठी सारखा तगडा अभिनेता असल्याने अभिनयाची भट्टीही जमून आली होती. या निमित्ताने कोणी हा चित्रपट पाहिल्यास एका चांगल्या विषयावरचा चित्रपट आणखी काही लोकांपर्यंत पोहोचेल.

सई ताम्हणकर हि नेहमीच मायबोलीवर एक हॉट टॉपिक चर्चेचा विषय राहिली आहे.
कोणाला प्रचंड आवडते, तर कोणाच्या नावडीची.

कोणी तिच्या स्टाईल आणि अदांचे दिवाणे. यात मी सुद्धा एक रांगेत, जो नेहमी तिचे लूक्सबाबत प्रयोगशील असण्याचे कौतुक करतो.
तर काहींना पारंपारीक सौंदर्याचे निकष लावता ती तितकी सुंदर भासत नाही.

काहींना तिच्या अभिनयात एक्स फॅक्टर दिसतो, तर काहींना ईथेही अभिनयाचे पारंपारीक निकष लावता तिच्यात विशेष काही दिसत नाही.

काही असो, चर्चा नेहमी तिची होतेच.

पण आज मात्र तिने तिच्या अभिनयावरील चर्चांना पुर्णविराम दिला असे म्हणू शकतो.

मराठी चित्रपटसृष्टीपासून सुरुवात करून, तिथे स्वतःला सिद्ध करून, मराठीशी नाळ न तोडता हिंदीतही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवणे, असे फार कमी कलाकारांना जमले आहे. त्यामुळे सई आवडीची असो वा नावडीची, खुल्या दिलाने तिचे कौतुक करायचे मोठे मन प्रत्येक मराठी माणसाकडे असेलच.

आम्हाला तुझा अभिमान वाटतो सई, मनापासून अभिनंदन !!! Happy

IMG_20220606_034744.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The International Indian Film Academy Awards, popularly known as the IIFA, is an annual awards event.

the winners of the awards are decided by fans who vote online for actor from the Indian film industry.

the ceremony is held in different countries around the world every year.
 South Africa,  Malaysia,  South Africa,  Singapore,  Netherlands,  United Arab Emirates,  United Kingdom,  Thailand,  Macau,  Sri Lanka,  Canada,  Singapore,  Macau,  United States,  Malaysia,  Spain, United States, Thailand,  India, Abu Dhabi

https://en.wikipedia.org/wiki/International_Indian_Film_Academy_Awards

मी आबाधूबीत वाचलं Proud
तशी चांगली अभिनेत्री आहे.. दोन तीन मुव्हीज बघितले असतील तीचे..
कांदेपोहे गाणं असलेला तीचा मुव्ही फार आवडलेला.. ती छान आणि ग्लॅमरस दिसलीए त्यात .. इतर मराठी हिरोईन्समधे ग्लॅमरची कमी नेहमीच जाणवते.. हि जरा वेगळी आहे

सई ताम्हणकर बोल्ड सीन्सच देते हा गैरसमज आहे.
>>>

+७८६
पुलं विनोदीच लिहीतात यासारखे आहे हे.
ती मराठीतली बोल्ड अभिनेत्री आहे. नुसते बोल्ड सीनबाबत नाही तर अभिनयातील प्रयोगांबाबत आणि आव्हानात्मक भुमिका स्विकारण्याबाबतही तिने हा बोल्डनेस दाखवला आहे.

दोन तीन मुव्हीज बघितले असतील तीचे..
>>>>
यात दुनियादारी असेलच. नसेल तर बघशीलच. मराठी बॉक्स ऑफिसचा विचार करता हा मैलाचा दगड आहे. सई, स्वप्निल, अंकुश..

कांदेपोहे गाणं असलेला तीचा मुव्ही फार आवडलेला.
>>>
येस, सई पहिल्यांदा कुठे आवडली तर तिथेच..

इतर मराठी हिरोईन्समधे ग्लॅमरची कमी नेहमीच जाणवते.. हि जरा वेगळी आहे
>>>>
+७८६
ते वेगळेपणच तिची स्ट्रेंथ आहे. पण ते सर्वच मराठी प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही.

सरोगसी याच विषयावर पूर्वी सई ताम्हणकरची एक मराठी मालिका होती 'अनुबंध' नावाची. चांगली होती ती. तुषार दळवी, भार्गवी चिरमुले वगैरे होते त्यात.

ओके, जुनी असावी फार. ईतक्यात सईची मालिका असती तर कानावर खबर असती कुठूनतरी.. पाहिली नाही ही कधीच
भार्गवी आणि सईमध्ये सईच असावी सरोगेट मदर

पुलं विनोदीच लिहीतात >>> असे गैरसमज पसरवू नका. त्यांचे गंभीर लिखाण वाचले नाही का?

ती मराठीतली बोल्ड अभिनेत्री आहे. नुसते बोल्ड सीनबाबत नाही >> तिला स्वतःची ब्रा स्वतः धुवायला आवडत नाही असे तिने बोल्ड स्टेटमेंट केले आहे. असे प्रयोग चड्डी धुण्याबाबत हेमांगी कवीने केले होते.

खूपच गहण विषयावर धागा काढल्यामुळे मूळ विषय सोडून इतर विषयांवर चर्चा तर जोरदार होणारच

पुलं विनोदीच लिहीतात >>> असे गैरसमज पसरवू नका. त्यांचे गंभीर लिखाण वाचले नाही का?
>>>

तेच लिहिलेय ना मी हा गैरसमज आहे Happy

सईच्या ड्रेसची स्लिट इतकी मागे का आहे....किती वाकडं उभं रहावं लागतंय....डिझाईन फसलंय. असो.
आयफा विजेत्यांचं अभिनंदन.
त्यामुळे खुष झालेल्या चाहत्यांचंही अभिनंदन. Happy

Ajnabi Lol

. तू ही रे बघितलाय, तो आवडलेला
>>>

अच्छा, चेक करायला हवा. मला ट्रेलर बघून पिक्चर बघावासा वाटला नव्हता म्हणून टाळलेले. अन्यथा त्यात सई स्वप्निल दोघे माझ्या आवडीचे आहेत.

सईच्या ड्रेसची स्लिट इतकी मागे का आहे....किती वाकडं उभं रहावं लागतंय....डिझाईन फसलंय.
>>>>

ओह, आणि मी उगाच काय शरीरयष्टी आहे सईची, काय स्टाईल आहे उभे राहायची, म्हणून ईम्प्रेस होत होतो Happy