कृष्ण विवर

Submitted by Pravin Pawade on 19 May, 2022 - 11:52

कृष्ण विवर

न राहिले स्वत:चे काही
उरलीय एक निर्वात पोकळी
गूढरम्य लोभसवाणी
परिघामध्ये अडकून पडलेली...

विस्मयकारी चमत्कारी
तेजोमय दुग्ध प्रवाही
असंख्य तारकांची स्वप्नं वाही
नीलकणांत पसरून देई...

अस्तित्त्वासाठी धडपडणारी
स्वावलंबी, न भीती कुणाची
क्षितिजास तोडून, मुक्तवेगी
त्या काळडोहाने गिळलेली...

वेडे मन असे काही
त्यात गुंतते, गुरफटते
नियम आकर्षणाचे मोडूनी
नित्य विघटीत होत राहते...

या गूढ कृष्ण विवरी....
सर्व काही सामाविलेले..
परतीचे न मार्ग त्यासी...
कृष्णबाधित जे जाहलेले...

-प्रविण पावडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults