जिव्हारी - आगामी मराठी चित्रपट

Submitted by माबोसदस्य on 16 May, 2022 - 01:17

माझे मित्र श्री. गणेश शंकर चव्हाण यांनी नुकतीच 'कॉलनी फिल्म्स' प्रस्तुत 'जिव्हारी' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २० मे २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई आणि इंग्लंड मध्ये प्रदर्शित होत आहे. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.

हा चित्रपटाचा टीझर -
https://youtu.be/VSTcS3EfJVU

चित्रपटाची गाणी आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी गायली आहेत.

१. 'जिव्हारी लागली' - गायक - आदर्श शिंदे
https://youtu.be/vRyvcyJupDk

२. 'दंगा मस्ती' - गायक - आनंद शिंदे
https://youtu.be/PSEyjT-U33w

आज १६ मे आणि १७ मे लगा 'चला हवा येऊ द्या' मध्ये जिव्हारीची टीम दाखल होणार आहे. दोन्ही एपिसोड्स नक्की पहा.

तसेच २० मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला विसरू नका. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहोत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभेच्छा Happy
उजवीकडची मॉडर्न हिरोईन दिसायला छान आहे. नाव काय आहे तिचे?
हिरोला मागे मालिकेत पाहिलेले. चांगला आहे तो सुद्धा

नायिका छान दिसतेय. नायकही छान आहे. विमान दिसतेय म्हणजे बिग बजेट असावा.
मनापासून शुभेच्छा !
चहयेद्या सारख्या प्रतिष्ठीत व मानाच्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल टीमचे अभिनंदन !
आदरणिय नीलेश साबळे सरांकडून चित्रपटाचे प्रमोशन व्हावे यासारखे भाग्य आणखी काय असणार !

शुभेच्छा!

मला आधी ती आर्ची वाटली साडीतली व तो अंकुश चौधरी.