या झाडाचे नाव काय?

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

खालील झाडाचे कंद तीनेक वर्षांपूर्वी लावले होते. आत्तापर्यंत त्याला फक्त पाने येत. आता फुले पण आली आहेत. पण झाडाचे नाव विसरलो.
कुणि निसर्गप्रेमी जाणकार लोकांना माहित असल्यास कळवावे. धन्यवाद.

Picture_142.jpg

विषय: 
प्रकार: 

झक्की चित्र दिसत नाहीये.

झक्कीकाका, चित्र गायब आहे. गुलाबी फुलं का हो?
आमच्याकडे होतं एक रोपटं.
बर्‍याच वर्षांनी फुलं यायला लागली. आता धो धो येतात. Happy

मला तर व्यवस्थित दिसते आहे. एकाच फुलात बर्‍याचश्या, जांभळ्या नि फिक्कट पिवळ्या, चांग्ल्या ५, ६ सें. मी. लांब पाकळ्या.
मृ, लिंकबद्दल धन्यवाद. शोधतो नंतर.

झक्कीकाका, फोटो दिसत नाही आहे.

If every human being is going to have good values and strong emotional foundation then they will have happy families and happy families will have happy children and this will eventually lead to happy societies and a happy world. (By Varsha Happy )

ह्या फुलाचे वैशिष्ट्य असे आहे की ते फक्त झक्कींनाच दिसते. त्याचा फोटो काढता येत नाही. अशी व्य्वच्छेदक लक्षणे असलेल्या माणसांना मनुष्य योनीतील माणसे असे समजले जात नाही. तसेच अशी माणसे/प्राणी दिसत असलेली माणसे देखील नॉर्मल नसतात.

तर्काच्या आधारे इथे येणारे झक्की हे तेच झक्की आहेत का जे पुर्वी यायचे अशी शंका यायला वाव आहे. हा डु आयचा नविन अवतार असेल काय?

Light 1

Hello,

I am a new user and am looking for 2 marathi lullabies
1. Nij Nij Majhya BaaLa, Ravi gelare soduni aakashala
2. Gaai Panyavar Kaay Mhanuni Aalya

Could someone be so kind as to provide me with their wordings since I don't know the full wordings. If someone has a MP3 of either of these, that would be very greatly appreciated as well.

Thank u so much

Madhya

zakkinchyabagatphUl.jpg
मला तर दिस्तय. Happy

झक्की, चित्र दिसतय. Happy

Madhya, I think you will have better luck in Pune. You need to find someone who speaks and understand Marathi (May be difficult to find such a person in Pune, but I hope you can find one) and go to Appa Balawant chauk with that person. There may be books on old Marathi poems. The Marathi speaking person will help you find them.

You can take such inquiries on other bulletin boards. This is a private bb for me. I don't mind, but it is better for you to get answers.

ते चित्र फक्त मला नि मृण्मयी यांनाच दिसते. त्यात काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या कश्या दूर करायच्या हे मला अजिबात माहित नाही. क्षमस्व. तुमची मदत करायची इच्छा पाहून बरे वाटले. धन्यवाद.

Light 1

हे तर बिअर्डेड आयरिस आहे. तुम्हाला नको असेल तर मला पाठवून द्या कंद याचे ( सप्टे/ऑक्टो मधे )

हे मध्या ह्यांचे पोस्ट पाहुन मला वाटलेच होते की झक्की फटकारणार म्हणुन. मुळात इंग्रजीत पोस्ट आणि तेसुद्धा झक्कींच्या रंगीबेरंगीवर.. नशीब किती खराब असावे ह्याला काही मर्यादा Wink Light 1

<<नशीब किती खराब असावे ह्याला काही मर्यादा>> छ्या:, माझे नशीब असे दुसर्‍यांच्यावर अवलंबून नाही आता.

शोनू, <<बिअर्डेड आयरिस >>! अहो आयरिस मुलीचे नाव असते ना? असो. धन्यवाद.

गूगलवर तुम्हाला भरल्या मश्रुम च्या बर्‍याच पाककृती आढळतील. बेटी क्रॉकरच्या कृतीत मी लाल भोपळी मिरची ऐवजी, क्रॅब मीट वापरतो. त्याऐवजी शार्प छेडर चीज हि वापरतात. तसेच इटालियन सीझनींग ऐवजी वुस्टर्शायर सॉस पण वापरतात!

पण हा प्रकार एकूण प्रचंड कॅलरीज, कोलेस्टेरॉल वाला आहे, त्यामुळे मला वर्ज्य! जाउ दे बरेचदा खाल्लय सगळे. आता पुरे.
Happy Light 1

>>>>>>छ्या:, माझे नशीब असे दुसर्‍यांच्यावर अवलंबून नाही आता.
झक्की, टण्या तुमच्या नशीबाबद्दल नाही तर मध्या यांच्या नशीबाबद्दल बोलतोय. Proud

हा सोनटक्का तर नाही?

लीना... सोनटक्का? (आश्चर्यविभोर बाहुली) मला अल्पमतिला माहित असलेला सोनटक्का पांढरा असतो.

>>> मला अल्पमतिला माहित असलेला सोनटक्का पांढरा असतो
अग झक्कीन्च्या बागराज्यातील सोनटक्का रन्गित असेल! Lol

मला झक्कीन्च्या पोस्ट मधे फोटो दिसत नाही, मृण्मयी च्या पोस्ट मधे दिसला! Happy

झाड कोणते ते माहीत नाही, पण फोटो बघुन एक लक्षात आले की क्यामेरा झाडाच्या दिशेने फिरवुन क्लिक केले की फोटो निघतो असे कुणीतरी झक्कीन्ना सान्गितले असावे! Biggrin
असो
टण्या....... खरच रे खरच..... अमर्याद! Lol

पण फोटो बघुन एक लक्षात आले की क्यामेरा झाडाच्या दिशेने फिरवुन क्लिक केले की फोटो निघतो असे कुणीतरी झक्कीन्ना सान्गितले असावे
>>>>
Rofl Rofl Light 1

टण्या >>मुळात इंग्रजीत पोस्ट आणि तेसुद्धा झक्कींच्या रंगीबेरंगीवर.. नशीब किती खराब असावे ह्याला काही मर्यादा >>> Rofl

बाकी झक्की काका मधेच भरल्या मश्रुमची पाककृती का टाकली आहे? म्हणजे मध्य ने चुकुन पोस्ट टाकली आणि तुम्ही पण? Light 1

>>>>
गूगलवर तुम्हाला भरल्या मश्रुम च्या बर्‍याच पाककृती आढळतील. बेटी क्रॉकरच्या कृतीत मी लाल भोपळी मिरची ऐवजी, क्रॅब मीट वापरतो. त्याऐवजी शार्प छेडर चीज हि वापरतात. तसेच इटालियन सीझनींग ऐवजी वुस्टर्शायर सॉस पण वापरतात!

पण हा प्रकार एकूण प्रचंड कॅलरीज, कोलेस्टेरॉल वाला आहे, त्यामुळे मला वर्ज्य! जाउ दे बरेचदा खाल्लय सगळे. आता पुरे. >>>

बाकी मलादेखिल मृणमयींच्या पोस्ट मधले चित्र दिसत आहे, झक्कींच्या नाही.

पाककृति शोनू यांच्यासाठी लिहीली होती. त्यांनी एकदा दुसरीकडे कुठेतरी विचारली होती म्हणून. शिवाय त्यांनी काही पांचटपणा न करता सरळ प्रश्नाचे उत्तर दिले. आता जर तुम्हाला मृण्मयि यांच्या लिखाणात चित्र दिसत असेल तर बास झाले की. मृण्मयींना धन्यवाद. मी त्या बाबतीत काही करू शकत नाही हे लिहीलेच आहे.

बाकी पुण्यातले लोक पाहिलेत?? नुसतीच टिंगल करतील, पण मदतीचे नाव नाही. गावचे पाणीच तसले!

आता हा बा. फ. बंद. यावर लिहीलेले वाचले जाणार नाही. सर्वांना धन्यवाद.

Happy Light 1

<<आता हा बा. फ. बंद. यावर लिहीलेले वाचले जाणार नाही. सर्वांना धन्यवाद.>>

हे लिहीलेले वाचले नाहीत का? तरी लिहीता?
नि लोक म्हणतात डोंबीवली मधे जास्तीत जास्त कॉलेज शिकलेले लोक आहेत!! बहुधा तुम्ही इंग्रजी शाळेत शिकलात नि आता उपरति झाली की थोडे मराठी शिकावे!

हे घ्या:
मंगळागौरीची गाणी http://www.maayboli.com/hitguj/messages/34/49688.html इकडे आहेत

पण मराठी वाचता येत नसेल तुम्हाला! बघा एखाद्या आजीबाई, पणजीबाईंना दिसत असेल तर त्या वाचून दाखवतील. मग त्याचे इंग्रजीत भाषांतर करून यथेच्छ मजा करा. आजकाल हळदीकुंकु, मंगळागौर इ. ना दारू प्यायची पण फॅशन निघाली आहे म्हणे. मग काय, मौज्जा हि मौज्जा हे गाणे पण म्हणा.

Happy Light 1

मलाही चित्र दिसत नाही आहे.त्यामुळे माला फुलझाडांची माहिती असूनही मी काहीच मदत करू शकत नसल्याचा खेद वाटतो.