Submitted by अनन्त्_यात्री on 9 May, 2022 - 02:55
वडापाव खाताना कचकन दाताखाली आलेलं रुपयाचं नाणं तोंडातून चिमटीत काढून घेऊन ते शाळेच्या कँटिनवाल्यापुढं नाचवत, अख्ख्या शाळेवरून ओवाळून टाकलेला दहावीतला साहेबराव त्याच्यावर खेकसत होता, "लाज नै वाटत आमा पोरांच्या जीवाशी खेळायला? तरी बरं ह्यो नाणं पैल्याच घासाला दाताखाली आलं. एखांदा ल्हाना पोरगा असता तर जीवानिशी गेला असता ना? आता हेडसरांनाच तुझा पर्ताप सांगतो."
"सायेबराव मिष्टेक झाली. पन हेडसरांकडं म्याटर नेऊ नका. पाया पडतो"
"पुन्यांदा अस्ली मिष्टेक केलीस तर जल्माची अद्दल घडवीन." आसपासच्या पोरांना नजरेच्या जरबेने हाकलवून देत साहेबराव गुरकावला.
अन् कँटीनवाल्याच्या अंगावर तेच चघळचोथा नाणं भिरकावत दबक्या आवाजात बोल्ला,...
..."हे घे गुमान अन् धा वडापावचं पार्सल दे लाल चटनी मारून"
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारी आहे कथा...!
भारी आहे कथा...!
मस्तच
मस्तच
भारी
भारी
भारी
भारी
त्यानंच टाकलं असणार ते नाणं..
त्यानंच टाकलं असणार ते नाणं..
दबक्या आवाजात का बोलला?
दबक्या आवाजात का बोलला?
मस्त!
मस्त!
दबक्या आवाजात का-
फुकटात धा वडापाव काढतो हे कोणाला कळू नये म्हणून.
मस्त दोघांचा प्लान होता का?
मस्त
दोघांचा प्लान होता का?