लता मंगेशकरांच्या गाण्यांचा ज्युकबॉक्स

Submitted by रानभुली on 28 April, 2022 - 15:58

खामोश है जमाना, चुपचाप है सितारें
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे मे कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे कि चल रहा हो, मन मे कोई हमारे
या दिल धडक रहा है, एक आस के सहारे

गानकोकिळा स्व. लता मंगेशकर आपल्यात नाहीत हे आता आपण स्विकारले आहे.
जस जसे दिवस उलटून जातात तस तशी त्यांची अवीट गोडीची गाणी अधिकच आठवत जातात. काही कानावर पडत राहतात. भारतीय सिने संगीताला लता या नावाने झपाटून टाकलेले आहे. काही काही गाणी तर त्यांनी गायली नसती तर ऐकाविशी वाटली नसती. काही गाणी शब्द, संगीत आणि लताजींची गायकी आणि अद्भुत आवाज या सर्वांचे असे काही मिश्रण आहेत की त्यातल्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊ कळत नाही. त्यांनी आपल्यासाठी मनोरंजनाचा जो ठेवा ठेवलेला आहे त्यावर एकच काय अनेक जन्म आरामात निघतील.

लताजींच्या गाण्याचा ज्युकबॉक्स बनवायचा म्हटलं तर हजारो गाणी आठवतील. काही हरकत नाही. काही काळानंतर गाणी बदलून बदलून ऐकता येतील. अविस्मरणीय, अवीट गोडीची, गाजलेली गाणी तर येऊच द्या. पण जी सुरेख गाणी विस्मरणात गेली आहेत त्यांनाही उजाळा देऊयात.

करूयात का सुरूवात ? माझ्यापासून करूयात.
क्र., गाण्याचे बोल , चित्रपटाचे नाव
१. आप की नजरोंने समझा , प्यार के काबिल मुझे - अनपढ
२. जिया ले गयो जी मोरा सावरिया - अनपढ
३. अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो - आप की परछाईयां
योगायोगाने तिन्ही गाणी मदन मोहन यांचीच आठवली.
४. ये दिल और उनकी निगाहों के साये - प्रेम परबत ( संगीतकार जयदेव)
५. धीरे धीरे मचल, ऐ दिल-ए-बेकरार - अनुपमा (हेमंतकुमार)

येऊ द्या. (संगीतकाराचे नाव दिलेच पाहीजे असे काही नाही. पण दिले तर छानच. लिंक दिल्या तर अजून छान होईल).

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच ऐकलं
मेरी आवाज ही पहचान है.....

काय ठहराव, काय ताना... क्षण दोन क्षण निव्वळ समाधी अवस्था

मेरी आवाज ही पहचान है - खरंच कसला विलक्षण आवाज लागलाय. सकाळी सकाळी ऐकलं तर झपाटून टाकतो आवाज हा.... !!

बेताssssब दिल की तमन्ना यही है।
अर्थात मदन मोहनची चाल. 'हसते जखम' चित्रपटातील गाणं, पडद्यावर बघवत नाही पण प्रचंड झपाटून टाकतं.

चांगली कल्पना आहे रानभुली. ही काही विस्मरणात गेलेली चांगली गाणी.

'राजसा जवळी जरा बसा' ही ना. धों. महानोर लिखित लावणी, ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. श्रुंगार रसाने परीपूर्ण तरीही उच्छृंखल नाही. त्यांनी लावण्या फार कमी गायल्या आहेत. पण अस्सल बैठकीची लावणी वाटते.
https://youtu.be/WdzSPCTkqo4

'जीवन डोर तुम्ही संग बांधी' हे 'सति सावित्री' चित्रपटातील गाणे. लक्ष्मिकांत प्यारेलाल यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे बोल फारसे आवडले नाहीत. पण एक वेगळा सुकून मिळतो हे गाणे ऐकताना.
https://youtu.be/ww6BYhEDlrI

'तेरे मेरे सपने' चित्रपटातील गीत 'जैसे राधा ने माला जपी श्याम की, मैने ओढी चुनरीया तेरे नाम की' एस्. डी. बर्मन यांचे संगीत.
https://youtu.be/R8cGOjenSC4

'झुबैदा' चित्रपटातील जावेद अख्तर यांनी लिहिलेले, ए. आर. रेहमानने संगीत दिेलेले 'प्यारा सा गांव' हे अंगाई गीत. हे गाणे गायले त्यावेळी लताजींनी सत्तरी नक्कीच पार केली असेल, पण आवाजाचा सुदिंग इफेक्ट तसाच आहे.
https://youtu.be/L3O9OfnmEpQ

माया मेमसाब मधील 'खुद से बाते करते रहना' (मूळ मराठी गाणे 'काजळ रातीने ओढून नेला') आणि 'ओ दिल बंजारे' फारशी प्रसिद्ध नाहीत. पण जरुर ऐका. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. दोन्ही गाणी गुलज़ार यांनी लिहिली आहेत.
https://youtu.be/f_NnZ2TCzng
https://youtu.be/4oCmZCyKIbo

'धनवान' चित्रपटातील 'ये आंखे देख कर' गाणे, ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे.
https://youtu.be/8Z8oqPsHMGk

खानदान चित्रपटातील नक्श लायलपुरी लिखित 'ये मुलाकात एक बहाना है', खय्याम यांचे संगीत आहे.
https://youtu.be/2xsWwkf8WN0

दस्तक चित्रपटातील मदनमोहन यांनी संगीत दिलेले 'माई री मैं कासे कहुं' राहिलंच की. अर्थात हे खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की लताजींनाही हे गाणे आवडायचे.
https://youtu.be/yX0otJFfBlo

लता मंगेशकर गेल्या तेव्हा इथे श्रद्धांजली / आठवणींचे धागे निघाले होते त्यात lataonline.com ही वेबसाईट मिळाली होती. तिथे बरेच ज्युकबॉक्स तयार आहेत. पाचेकहजार गाणी आहेत.

सुरेख गाणी विस्मरणात गेली आहेत त्यांनाही उजाळा देऊयात >>>>
वरची गाणी विस्मरणात गेलेली नव्हेत. विविध भारती वर पूर्ण दिवस सुरूच असतात.
खास ऐकायची तर रात्री बेला के फूल. किंवा सरकारी एफ एम (fmgold) वर नित्य लागतात.

लता + १९४०, १९५०... // लता + अभिनेत्री // लता + संगीतकार // लता + गायक -- असे सर्च दिल्यास यूट्यूबवरही असंख्य तयार ज्यूकबॉक्स मिळतील.

वैयक्तिक मत -- लता ही ज्यूकबॉक्स बनवून ऐकायची चीज नाही.
कधीही, काहीही, कुठेही सुरू करून ऐकावे व ऐकत रहावे. मृद्गंधाचा अनुभव.
कितीही थकलेला, कावलेला, गांजलेला जीव नकळत निवून जातो. आणि मन मात्र भरत नाही.

माझे मन >>> खूपच सुंदर गाणी आहेत. वेचून वेचून दिलीयेत गाणी. Happy
हृदयनाथ आणि लता , खय्याम आणि लता हे ही एक अजब कॉबीनेशन आहे. धन्यवाद या गीतांसाठी. मराठी गाण्यांबद्दल आभार.

@ कारवी - खूपच सुंदर पोस्ट. छानच लिहीले आहे.
पण ज्युकबॉक्स बनवण्यात वाईट काय ते नाही समजले. इंटरनेट काही सर्वत्र उपलब्ध असतेच असे नाही. माझ्यासारखी भटकण्याची आवड असलेल्यांना जिथे नेट नाही, रेडीओ स्टेशन्स नाहीत अशा ठिकाणी फोन मधे कार्ड टाकून ऐकायला अशी गाणी सोबत असणे स्वर्गीय सुखापेक्षा कमी नाही. शिवाय एखाद्या चांगल्या छंदासाठी , समान आवडीसाठी एकापेक्षा जास्त लोक एकत्र आले तर तो आनंद वेगळाच असतो ना ? Happy

मस्त धागा
नेहमीच्या काही परिचित गाण्यापेक्षा वेगळी गाणी ऐकायला मिळाली या धाग्यावर

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या पिक्चर मधली त्यांची गाणी शाखा सरांच्या करीष्म्याने सुपरहिट झाली. ती गाणी करीअर बेस्ट आहेत.

काजळ रातीने ओढून नेला हे गाणे खूपदा ऐकले आहे. पण त्यावर माया मेमसाब मधे बनवलेले खुद से बाते करना हे कधीच नव्हते ऐकले. माझे मन यांच्यामुळे ऐकले.
अर्थाच्या दृष्टीने, शब्दांच्या निवडीच्या दृष्टीने काजळ रातीने हे नेहमीच गुंगवून टाकणारे गाणे आहे. सुधीर मोघेंनी लिहीले आहे. हृदयनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे एरव्ही गीतकार नसलेल्या पण उत्तम कवी असलेल्या आरती प्रभू, ग्रेस यांच्या कवितांनाही त्यांनी चाली लावल्या. सुरेश भटांच्या गझला त्यांनीच पहिल्यांदा चित्रपटात आणल्या. त्यामुळे हे गाणे आशयघन आहेच. त्याला हॉण्टिंग इफेक्ट आहे. लताचा आवाज (माफ करा एकेरीबद्दल, पण रफी, लता, किशोर हीच सवय आहे) झपाटणारा आहेच की.

अशा गाण्याला रोमॅण्टिक गाण्यात परिवर्तित करणे अवघड होते. गुलजार यांचे शब्द परफेक्ट बसले आहेत. उधार उअसणवार नाही, भरीचे शब्द नाहीत. लताने हे गाणे किंचित वेगळे गायल्याने त्याचे रूपच बदलले आहे.

‘अनपढ’ चित्रपटातील मदनमोहन यांनी संगितबद्ध केलेले ‘वो देखो जला घर किसी का’. राजा मेंहदी अली खान यांनी लिहीले आहे.
https://youtu.be/N0mjWnNWYMs

‘दर्द’ चित्रपटातील खय्याम यांनी संगितबद्ध केलेले ‘अहले दिल यूं ही निभा लेते है’

https://youtu.be/3DXeR51OvYg

शंकर- हुसैन चित्रपटातील खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले ‘आप यूं फासलों से’

https://youtu.be/WOpOmaQ_yLo

बहुबेगम चित्रपटातील साहिर लुधियानवी लिखीत, रोशन यांनी संगीतबद्ध केलेले ‘दुनिया करे सवाल’

https://youtu.be/YHqdKJMoEoE

लता-खय्याम-साहिर त्रिकुटाचे ‘त्रिशुल’ चित्रपटातील ‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने’ हे गाणे. वेगळीच थीम आहे.

https://youtu.be/TpXJ2iKKOGE

मला , "आता विसाव्याचे क्षण" हे खुप आवडतं. अगदी कडा ओलावतात एकले की. गाण्याचे शब्द खुपच भिडतात आणि अर्थात आवाज.

@झंपी >>> आता विसाव्याचे क्षण…खूप सुंदर आहे.

बा. भ. बोरकरांची कविता, त्यातला जीवनाविषयीचा कृतकृत्य भाव लताबाईंनी जिवंत केला आहे. हे गाणे म्हणायला त्यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती नसेल. हे स्वान सॉंगच होते त्यांचे एका अर्थी.

लताचा आवाज सी रामचंद्र यांच्याकडे जसा गोड , कोमल लागलाय, तसा आणखी कोणाकडेही नाही.
फक्त सोलो रोमँटिक /सॅ ड साँग्ज

मोहब्बत ऐसी धडकन है जो समझायी नहीं जाती (अनारकली मधलं एकच गाणं लिहिलं. सगळीच हवी)

तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए

आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना

कटते हैं दुख में ये दिन पहलू बदल बदल के

असंच अनिल बिस्वास यांचं
बेइमान तोरे नैनवा निंदिया ना आए

भ्रमर , ते बेताब दिल की तमन्ना कसलं सुंदर आहे. अशा गाण्यात तिचा आवाज क्लास लागतो नेहमी. हे विस्मरणात नाही गेलेलं पण असं मुद्दामून कुणी लक्षात आणून दिलं तरच आठवतं. इतकं सुंदर गाणं असूनही.

माझे मन हॅट्स ऑफ ... कित्ती सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे !!!
भरतजी - सहीच आहेत ही पण गाणी.
सी रामचंद्र यांच्याबद्दल सहमत.

शंकर जयकिशन यांची पण येऊद्यात.

अनुपमा मधली लताची गाणी फार सुंदर आहेत...

धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार, कोई आता है
यूँ तड़प के ना तड़पा मुझे बार बार, कोई आता है

उसके दामन की खुशबू हवाओं में है
उसके क़दमों की आहट फ़ज़ाओं में है
मुझको करने दे, करने दे सोलह सिंगार

मुझको छूने लगी उसकी परछाईयाँ
दिल के नज़दीक बजती हैं शहनाईयाँ
मेरे सपनों के आँगन में गाता है प्यार

किंवा

कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं
कुछ दिल ने सुना, कुछ भी नहीं
ऐसी भी बातें होती हैं
ऐसी भी बातें होती हैं
कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं

हा धागा नक्की फोल्लो करणार- लता मंगेशकर, श्रेया घोषाल आणि नेहा कक्कर माझ्या तीन फेव्हरेट गायिका आहेत...

>>>>>>>धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार, कोई आता है
यूँ तड़प के ना तड़पा मुझे बार बार, कोई आता है

उसके दामन की खुशबू हवाओं में है
उसके क़दमों की आहट फ़ज़ाओं में है
मुझको करने दे, करने दे सोलह सिंगार

मुझको छूने लगी उसकी परछाईयाँ
दिल के नज़दीक बजती हैं शहनाईयाँ
मेरे सपनों के आँगन में गाता है प्यार

आहाहा!!! क्या बात है!

@माझे मन वाह!!! हेही मस्त आहे

ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं
इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाए हैं

तुम अपनी महकी-महकी ज़ुल्फ़ के पेचों को कम कर दो
मुसाफ़िर इनमें घिरकर अपना रस्ता भूल जाते, भूल जाते हैं

ये बाँहें जब हमें अपनी पनाहों में बुलाती हैं
हमें अपनी क़सम, हम हर सहारा भूल जाते हैं

तुम्हारे नर्म-ओ-नाज़ुक होंठ जिस दम मुस्कुराते हैं
बहारें झेंपती हैं, फूल खिलना भूल जाते हैं

बहुत कुछ तुम से कहने की तमन्ना दिल में रखते हैं
मगर जब सामने आते हैं, कहना भूल जाते हैं

मोहब्बत में ज़ुबाँ चुप हो तो आँखें बात करती है
वो कह देती हैं वो बातें, जो कहना भूल जाते हैं

माझ्याकडे रेअर जेम्स - लता मंगेशकर हा दोन कॅसेट्सचा संच होता.
त्यातली गाणी
१. अभी तो मैं जवाँ हूं - हुसनलाल भगतराम
२. सपना बन साजन आए -जमाल सेन
मैं अलबेली -एस डी बर्मन
छुन छुन बाजे पायल मोरी -रोशन
ये कहे चाँदनी रात -मदन मोहन
कारी कारी अंधियारी रात में -पंडित गोविंदराम
साजन तुमसे प्यार करूं -बसंत प्रकाश
जाओगे ठेस लगाके बहुत पछताओगे बालम -अनिल बिस्वास
क्रमशः

मला मौसम मधले हे गाणे पण फार आवडते-

या गर्मियों की रात जो पूर्वाइयाँ चले
ठंडी सफेद चादरों पे जागें देर तक
ठंडी सफेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए
दिल ढूंढता है फिर वही
फ़ुर्सत के रात दिन

मेघा छाये आधी रात , बैरन बन गयी निंदीया - शर्मिली ( एस डी बर्मन)
https://www.youtube.com/watch?v=Eraw8nkEGPg

खूप आवडतं गाणं आहे. नुकताच शर्मिली टीव्हीवर पाहिला होता. त्यातली राखी, शशीकपूर जोडी आणि एसडीचं संगीत आवडलं होतं. गाईड, शर्मिली, ज्वेल थीफ असे जुने सिनेमे एका पाठोपाठ एक टीव्हीवर आणि व्हीसीआर वर पाहिले होते. त्यानंतर लगेचच शिमल्याला जावे लागले. वॉकमनमधे शर्मिलीची कॅसेट टाकून हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकत होतो. स्नो फॉल होत होता. कधीही विसरू शकत नाही.

मेरा साया मधल्या मदन मोहनच्या
तू जहां जहां चलेगा आणि
नैनों मे बदरा छाये
या दोन गाण्यातलं नैनों मे बदरा छाये ची रचना भुलवून टाकणारी आहे.
पण लताचा आवाज तू जहां जहां मधे जास्त चांगला लागला आहे.

वोह कौन थी मधले मदन मोहनचं अजरामर गाणं

लग जा गले हे चित्रपटात नसणार होतं. मदन मोहनने जोर देऊन हे गाणं चित्रपटाचा युएसपी ठरेल, खोटं ठरलं तर संगीत सोडून देईन असे म्हटले होते. पुढचा इतिहास माहीतच आहे.

याच सिनेमातली इतर सदाबहार गाणी
नैना बरसे
आप क्युं रोये
+
हेमंतकुमार यांच्या कोहरा मधली गाणी.

तेरा जाना दिल के अरमानों का (नूतन) - अनाडी, शंकर जयकिशन

तेरा मेरा प्यार अयर (साधना , देवानंद ) .. असली नकली - शंकर जयकिशन

Pages