(स्वयंपाकाशी संबंधीत नसलेले) छोटे प्रश्न विचारण्यासाठी धागा

Submitted by सुनिधी on 21 April, 2022 - 12:12

कधीकधी आपल्याला एखादा छोटासा प्रश्न असतो पण त्यासाठी नवा धागाच काढायची गरज नसते. तर अशा प्रश्नांसाठी हा धागा वापरता येईल.
वेबमास्तर, असा धागा पाहिल्याचे आठवत नाही. असल्यास हा काढून तरी चालेल. तसेच असा धागा असलेला चालेल का? चालत नसल्यास, खिचडी होण्याची शक्यता वाटल्यास देखील काढून टाकला तरी चालेल.

(काल एक प्रश्न होता पण काय होता ते आता विसरले आहे) Uhoh

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षय्यतृतीया आमच्याकडे खान्देशात देवांचा तसेच पितरांचा सण मानतात. या दिवशीपासून पितरांना आमरस पुपोचा नैवेद्य दाखवून आंबे खायला सुरुवात करतात. पितरांचा घास ही टाकतात.
सकाळी स्नान आटोपून दरवाजाचे औक्षण म्हणजे उंबरठ्यावर आपल्या एकेक पितरांचे नाव घेऊन कुंकवाची बोटे लावायची. एक मोठा लाल मातीची घागर घेऊन त्याला कच्चे सूत गुंडाळतात, वरून गंधाचे ठिपके लावतात, त्यावरच दुसरी मातीची छोटी घागर किंवा लोटा अश्याच पद्धतीने ठेवायचा! त्यावर पुरणपोळी, सांजोरी, आमरस, कुरडई पापड वै नैवेद्य ठेवून हे सगळं देवाजवळ ठेवायचं! घड्याची पूजा करायची! देवाला नैवेद्य दाखवायचा. गावाकडे पितर जेवू घालतात! इकडे शहरात मिळत नाही म्हणून, छोट्या पुपोवर नैवेद्य ठेवून अग्नि पेटवून त्यावर पितरांच्या नावाने स्वाहा करायचं!
काही ठिकाणी, या दिवसापासून नवीन माठातले पाणी पिण्यास सुरुवात करतात.

कोकणात अक्षय तृतियेला काय करतात? मी तरी काही करताना पाहिले नाही.

माझ्या लहानपणी जवळपास प्रत्येक सणाच्या दिवशी पितरांना वाडी म्हणजे जेवण वाढले जाई. म्हणजे केलेल्या जेवणाचे केळीच्या लहानश्या फाळक्यावर मिनी जेवण वाढुन घेतले जाई व ते पान गच्चिवर जाऊन कावळ्यांसाठी ठेवले जाई. हे घरातील पुरुषाचे काम असे व ते करेपर्यन्त घरात इतर कोणी जेवत नसत. म्हणजे बाबा जर बाहेर गेले असतील तर ते येउन हे करेपर्यन्त मुले भुकेने ताटकळत. आमच्याकडे बाबांच्या कामामुळे असे ताटकळण्याचे प्रसंग नेहमीच येत. मग आम्ही भावंडे ह्या पितरान्वर गुपचुप आपापसात भडकुन घेत असु, ह्याना जेवायला वाढायचे म्हणुन आम्ही उपाशी. Happy उघड भडकलो तर आई भडकायची, एक दिवस धीर धरता येत नाही का म्हणुन. Happy

पुढे बाबा गेल्रे, घरातील स्त्रिया म्हणजे सुनांना प्रत्येक सणाला सुट्टि मिळणे बन्द झाले, पुरुष म्हणजे मुलाना ऑफिसातुन दुपारी या कामासाठी येणे अशक्य झाले व हळुहळु ही प्रथा बन्द झाली. आई गुपचुप एक वाडी ठेवायची कधीतरी, मोठा सण असला कि.
इथे गावात ही प्रथा आजही पाळतात.

( rituals म्हणजे कर्मकांड, मग वर जे आर्याने लिहिलेय त्याला कर्मकांड मम्हणावे काय)

हा धागा बंद करतो आहोत.

मायबोलीकर एकमेकांना नेहमीच माहिती देत असतात , मदत करत असतात. पण त्याच बरोबर एकाच प्रश्नाचं उत्तर परत परत द्यावं लागलं तर तो त्या मदतीचा आणि माहिती देणार्‍याच्या वेळेचा अपव्यय आहे.
ही सोय प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीसाठी खूप सोयीची असली तरी तोच प्रश्न असणार्‍या इतर १० जणांसाठी गैरसोयीची आहे. तसंच या धाग्यामुळे "मी काही शोधत बसत नाही, मलाच इथेच उत्तर आणून द्या आणि तोंडात घास भरवा" अशा सारख्या अपेक्षा वाढतात. प्रश्नकर्त्याचा वेळ तेवढा महत्वाचा पण उत्तर देणार्‍यांकडे भरपूर वेळ आहे असेही सूचीत होते. ज्याला प्रश्नाचे उत्तर हवे आहे त्याने किमान त्यासाठी आधीच त्याचे उत्तर कुणी दिले आहे का, किंवा कुठे प्रश्न विचारावे इतके तरी कष्ट घ्यावेत अशी अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही.

Pages