ह्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात

Submitted by फलक से जुदा on 21 April, 2022 - 11:04

1. लेप लावणे

उदा. हाताला मुक्का मार लागल्याने औषधी लेप लावला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अडले आहे म्हणून नाही, तर मनोरंजन म्हणून -
ह्याचे इंग्रजी भाषांतर काय होईल?

जांभुळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजं जी
ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी

येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
झिम्मा झालं जी, फुगडी फुगडी झालं जी, झिम्मा फुगडी झालं जी

Under the shady tree of Jaambhul,
Whose drum is playing, oh?
The drum is playing, oh!
The drum is playing, oh!
Whose drum is playing, oh?

The footprints of the storm have arrived,
The thunderstorm has happened, oh!
It has happened, oh!
The storm has happened, oh!
The thunderstorm has happened, oh!

इति GPT.

GPT बदलून -

Beneath the Jaambhul tree,
Whose drum is playing, hey?
The drum is playing, hey!
The drum is playing, hey!
Whose drum is playing, hey?

The storm has arrived with lightning,
It has become a whirlwind, hey!
It has become, hey!
A whirlwind, hey!
It has become a whirlwind, hey!

Beneath the Jaambhul tree,
<<
beneath आणि under मधे काहीतरी बेसिक फरक असावासे वाटते.

वेठबिगार - गुलामी
वेठीला धरणे - गुलामासारखे कामाला लावणे / राबवणे

coerce ?

ट्युलिप पुलंच्या फॅन आहात वाटतं? ते 'आमच्या हिच्या हातचं थालिपीठ' राहिलं. Happy

dirty dishes, spilled food. खरकट्या हाताला uncleanच म्हणतात.

Greasy plate, greasy hand, table scraps/crumbs.
Procrastination ला इंग्रजीत procrastination म्हणतात.

धन्यवाद.
स्वाती, lol..तुम्ही सांगितल्यानंतर लक्षात आलं.

Bonded Labor

वेठीस धरणे....hostage म्हणजे ओलीस थोडं जवळचं वाटतय....

दबाव आणून एखादी गोष्ट करायला लावणं...मी तसं केलं नसतं पण त्यानं मला वेठीसच धरलं.
Coercion...I was coerced to do so.
or
forcefully get the things done.

वेठबिगार म्हणजे bonded labourers. अकरावीला आमच्या
इकनॉमिक्सच्या पुस्तकात होतं, म्हणजे खरंच असणार..

बेंगलोरला असताना आमच्या हपिसात पाणी पिऊन वापरलेले (उष्टे) पेले ठेवायची जी जागा होती, तिथे इंग्रजीत 'सॉईल्ड ग्लासेस' असं लिहिलेलं होतं. त्याचा उगम काय आहे माहीत नाही.

वेठबिगार म्हणजे ज्यांनी मालकाकडून कधी काळी अल्प कर्ज घेतलं, ते फेडण्यासाठी ते मालकाकडे बिनपगारी काम करतात.आणि कर्ज फिटून अनेक वर्षं झाली पण मालकाने त्यांना कामातून फ्री केलं नाही(अजून पगार देत नाही) आणि शिक्षण, गणित न झाल्याने त्यांना हे माहीत नाही.
वेठबिगारी म्हणजे एक्सप्लोयटेड बॉंडेड लेबर म्हणता येईल का?

बिगारी म्हणजे अंगमेहनतीची कामे करणारा मिस्त्रीच्या हाताखालचा कामगार .
वेठ म्हणजे बंधक / बंधुआ आहे का?
वेठबिगार शब्द एकत्रच खूपदा वापरला आहे. वेठ म्हणजे काय असा प्रश्न काल परवा पहिल्यांदा पडला.

दुसऱ्या एका शब्दकोशात " मोलाशिवाय सक्तीने करावे लागणारे अंगमेहनतीचे काम, (काही सरकारी कामे वगैरे,) असा अर्थ आहे आणि वेठ = बिगार ( हिं) असे लिहून पुढे वरीलप्रमाणे अर्थ स्पष्ट केला आहे.

मराठी विश्वकोश... शब्दकोश
वेठबिगार वेगवेगळ्या संदर्भात....
1. न्याय व्यवहार कोश
वेठबिगारी (स्त्री.) वेठबिगार (सा.)
Forced labour
2. राज्यशास्त्र परिभाषा कोश
वेठबिगार (पु.)
Forced Labour
3.भूगोलशास्त्र परिभाषा कोश
वेठ-बिगार (पु.)
Slave labour

वेठबिगार चर्चा ठीकच आहे.
मूळ प्रश्न वेठीस धरणे (म्हणजे त्या वाक्प्रचाराला) याला इंग्रजीत काय म्हणतात असा होता. तर त्याला काय म्हणणार?

पूर्वी वेठीस धरणे ऐकले कि शोले मधे ठाकूर घोड्यावरून गब्बरच्या मानेला हाताने फास टाकून गच्च पकडतो (धरतो) ते चित्र डोळ्यांसमोर यायचे.
मराठी शब्दांचे शब्दचित्र स्वच्छ झाले तर मग इंग्रजीत काय म्हणतात हे शोधायला अर्थ आहे ना ?
नाहीतर म्हणतात ना शेंगदाण्यात नाही तर टरफलात कुठून येणार ?

>>>
(एखाद्याला) वेठीस धरणें-आपलें काम करण्यासाठीं एखाद्याला॰ भाग पाडणें; फुकट काम करण्यासाठीं धरणें; ताबडणें
<<<
त्यासाठी coercion शब्द आला आहे वरती.
To coerce someone into doing something.

Pages