चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केजीफ नावाचा अत्यंत अताक्रिक सिनेमा पाहिला
लॉजिकची अक्षरशः माती करून टाकलीय. नक्की कोण कोणाच्या विरोधात आहे हेच समजत नाही. हिरो तर सुपर लार्जर दन दाखवलाय. काय ती हाणामारी आणि काय ते डायलॉग!! प्लस पूर्ण पिक्चर अंधारात शूट केलाय की काय असं वाटल. मध्येच गाणी सुरू होतात ती संपतात कधी ते ही समजत नाही. कोणाकडे कितीही रिकामा वेळ असला तरीही हा सिनेमा बघू नये.

हे असले Bad आणि Dad वाले संवाद पोरांनी ऐकले तर ते चुकीचे वागल्यावर त्यांना बॅड बॉय, बॅड गर्ल बोलायची सोय राहणार नाही. नाहीतर उलटून म्हणतील, ईफ आय ॲम बॅड, यू आर माय डॅड..
मागे एका रिक्षावर स्टिकर होता - MY DAD My GOD.. आम्ही रिक्षाच्या आत बसलो असल्याने मुलीने तो आतून उलटा वाचला.. MY DAD MY DOG .. झाले, महिनाभर तेच आठवून हसत होती..

त्यामुळे अश्या डायलॉगना सेंसॉर कात्री लावेल तर बरे होईल. आधीच आपल्याकडे आयांच्या तुलनेत बापांना मानसन्मान आदर तसा कमीच मिळतो.. आयुष्य जाते कमावण्यात आणि हे असे फटक्यात काढून घेतात.
जमल्यास कोणीतरी वेगळा धागा काढा यावर. ईथे अवांतर नको Happy

च्रप्स - डेथ ऑन नाईल पाहिला. थोडा स्लो आहे पण मस्त आहे. अ‍ॅगाथा क्रिस्तीची स्टोरी आहे त्यामुळे मूळ स्टोरी भारीच आहे.

>>>"if you are bad, I am your dad"
एकदम राजेंद्रनाथ स्टाईल "माय फादर ही इज अ‍ॅट दादर .... हुई उई" Lol

केजीएफ आधी पाहिला होता तेव्हां ऐकू आला नव्हता. त्यामुळे डब पाहिला कि नाही हे पण कळले नाही. एकूणच गोंधळ होता सगळा. हाणामार्‍या एकदम अतार्किक, अचाट वाटल्या. आता कंटाळा नाही तर बोअर होऊ लागलंय असे फाईट सीन्स पहायला.
जॅकी चॅनच्या फाइट सीन्स मधे किमान त्याला ब्लॅक बेल्ट आहे हे लॉजिक क्लिअर असतं. त्याचे स्टंटस पण पहायला विश्वसनीय वाटतात. शिवाय तो मारही खातो. शेवटी ते किती धोकादायक आहे हे पण दाखवलं जातं.
अर्जुन मध ले रस्त्यावर पाठलाग करत केलेले फाईट सिक्वेन्सेस अस्सल वाटतात. घायल मधला बाजारातला गोळी मारायचा प्लॅन फसतो तो सीन. हे पर्फेक्ट लिहीलेले आणि एक्झेक्युट केलेले सीन्स आजही बघावेसे वाटतात.

केजीएफ नावाचा अर्थच माहिती नव्हता म्हणून मग गुगल केलं. त्याच्यानंतर लक्षात आला प्रकार. रॉकीची गोष्ट केजीएफ मधे सोन्याचं स्मगलिंग करणा-या एका बाहुबलीवर आहे. त्याच्या आईने केजीफ १ च्या वेळी केस केली होती बदनामी केल्याची. Lol

त्याच्या आईने केजीफ १ च्या वेळी केस केली होती बदनामी केल्याची. >>> Lol हे सुपर लोल आहे.

हो जॅकी चॅन एकदातरी जबरी मार खातो त्याच्या पिक्चर्स मधे. आणि तो स्वतःला इतका सिरीयसली घेत नाही. एका पिक्चर मधे तो व कोणीतरी व्हिलन एकमेकांच्या नडग्या एकमेकांवर आपटतील अशा लाथा घालत असताना दाखवले आहेत. सुमारे १५-२० वेळा शेक हॅण्ड केल्यासारखे एकमेकांच्या पायावर पाय आपटतात. पण नंतर दोघेही पाय धरून विव्हळताना दाखवले आहेत Happy

एक फन्टास्टिक बीस्ट नावाचा सिनेमा लागलाय. मी आता असले सिनेमे टाळायला हवेत. आधीचे पाहिले नव्हते तरी जाते तशी यालाही गेले. त्यामुळे मग पहिल्या १० मिनिटानंतर अर्धातास झोपेत घालवला. त्यानंतर जादूच्या घटना पाहून आले. त्यामुळे आधीचे माहित नसेल तर पाहु नये. माहित असेल तरी किती आवडेल माहिती नाही.

आणि तो वरचा बॅड - डॅड संवाद भयंकर आहे. Lol

त्याच्या आईने केजीफ १ च्या वेळी केस केली होती बदनामी केल्याची. >>>  Lol
पुत्राचे सहस्र अपराध माता काय माने तयाचा खेद !

तो व कोणीतरी व्हिलन एकमेकांच्या नडग्या एकमेकांवर आपटतील अशा लाथा घालत असताना दाखवले आहेत. सुमारे १५-२० वेळा शेक हॅण्ड केल्यासारखे एकमेकांच्या पायावर पाय आपटतात. पण नंतर दोघेही पाय धरून विव्हळताना दाखवले आहेत >> हो तो जबरदस्त प्रकार आहे. बहुधा त्याच सिनेमावर जुडवा उचलला होता.

"सुमारे १५-२० वेळा शेक हॅण्ड केल्यासारखे एकमेकांच्या पायावर पाय आपटतात. पण नंतर दोघेही पाय धरून विव्हळताना दाखवले आहेत" - Lol

लहानपणी ईंग्लिशमध्ये जॅकीच बघितला जायचा. कारण त्याचा पिक्चर बघायला कधी भाषेची अडचण यायची नाही. सुट्टी पडली की केबलवाला दर दुपारी त्याचेच पिक्चर लावायचा हे ठरलेलेच. आता नावेही आठवत नाही. पण "आर्मर ऑफ गॉड" हा आमचा सर्वात फेव्हरेट. पुन्हा पुन्हा बघायचो.

. सुमारे १५-२० वेळा शेक हॅण्ड केल्यासारखे एकमेकांच्या पायावर पाय आपटतात. पण नंतर दोघेही पाय धरून विव्हळताना दाखवले आहेत>> एवढ्यावेळा "शेक पाय "केल्यावर दुखरे पाय शेकुनच घ्यावे लागणारsmiley16.gif

नेटफलिक्स वर एक इन्स्टंट फॅमिली नावाचा मुव्ही पहिला
ठीक ठाक आहे
एक नवरा बायको तीन अनाथ मुलांना दत्तक घेतात आणि मग त्यांच्यात शेवटी कसे bonding होते वैगेरे
हॉलिवूड वाले पण आपल्या लव्ह ट्रँगल सारखे तेच तेच विषय दळत असतात

हे डॅड बॅड मारी नावाच्या चित्रपटात ऐकले होते. पण मूळ इंग्रजी वेस्टर्न सिनेमात कुठं तरी असेल. सुट्समध्ये हार्वी आणि माईक जे movie quotes एकमेकांना फेकून मारतात त्यात ऐकल्यासारखं वाटतंय.

'मी वसंतराव' बघितला. बरा आहे. वाईट नाही, पण अजून चांगला असायला हवा होता! अनिता दातेचं काम मस्त. राहुल देशपांडेकडून अभिनयाच्या अपेक्षा नव्हत्याच, त्यामुळे जो अभिनय त्याने केला आहे, तो चालून जातो. मुळात तो वसंतरावांचा नातू असल्याने आपण त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघतो.
आलोक राजवाडे सगळीकडे एकाच सुरात बोलतो आणि एकाच प्रकारचा अभिनय करतो का?

पुलंचं पात्र आवश्यकतेपेक्षा जास्त 'लाईट' केलंय असं माझं मत.
भीमसेन जोशींचं पात्र असायला हवं होतं असंही वाटलं.

थँक्स च्रप्स.
फी - मेरकू नै समझती ये भाषा. Lol
हमकू पूरा पूरा उलगडके बोलो.

Pages