उशीरा पोहोचलेल्या कविता

Submitted by स्वप्नाली on 9 April, 2022 - 16:31

उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता
ज़ून्या डायरीतल्या एखाद्या
निखळलेल्या पानावरच्या कविता

सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,
काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,
काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,
धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या

कधी खोलात शिरणार्या,
कधी अलगद तरंगनर्या
कधी सैलावलेल्या मिठीत धून्द
अलवार ओल्या हळदीत भिजणार्या...

एकतर्फी प्रेमसारख्या काही निनावी
कधी लाल, हिरव्याकन्च, काही गुलाबी
ऱक्ताने लिहीलेलया, रक्तबंबाळ करणार्या
गारूड़ करनर्या काही, नशील्या अन शराबी

काहीही म्हणा, कशाही असू दया
भावनांचया सागर मन्थनानन्तर
निवांत जन्मनार्या, हळूवार फूलणार्या,
उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता

-स्वप्नाली
०८-०४-२०२२

Group content visibility: 
Use group defaults

मस्त. पाठ असलेल्या कवितेचा उशिराने वा नव्याने पुन्हा अर्थ लागावा असं काही असेल असं वाटलं होतं.

छान.
या कवितेत एक भाषिक कलाकृती दडली आहे, कुणाला लक्षात आली असेल तर. शेवटच्या कडव्यात 'म्हणा' आणि 'द्या' (इथे चुकून दया टंकित झालं आहे) ही दोन क्रियापदं सोडली, तर संपूर्ण कवितेत एकही क्रियापद नाही.

कवितेचं वर्णन करणारे जे बरेचसे शब्द आले आहेत - पोहोचलेल्या, झालेल्या, निखळलेल्या, खोचलेल्या, शिरणाऱ्या वगैरे, ती सर्व धातुसाधित विशेषणं आहेत. त्यातली काही विशेषणं (शिरणाऱ्या, भिजणाऱ्या, करणाऱ्या, फुलणाऱ्या) ही वर्तमानकालवाचक आहेत. म्हणजे विषय जरी जुन्या, शिळ्या झालेल्या कवितांचा असला, तरी कवयित्री हे म्हणते आहे की त्या कविता वर्तमानात अजूनही काही क्रिया करत आहेत. त्यामुळे त्या उशीरा पोहोचल्या असल्या, तरी त्या केवळ भूतकाळात पडून राहिलेल्या नाहीत; शिळ्या असूनही आजही तितक्याच ताज्या आहेत.