लेडीज स्पेशल टूर कंपनीचे अनुभव आणी माहिती हवी आहे

Submitted by मीफुलराणी on 5 April, 2022 - 23:46

लेडीज स्पेशल टूर कंपनीचे अनुभव आणी माहिती हवी आहे, नवरा कामात व्यस्त आणी त्याच्याबरोबर कुठेही फिरायला जाणे म्हणजे सतरा कटकटी, म्हणून एकटीने किंवा मुलाबरोबर भटकंती करायची आहे, सध्याचे वातावरण पाहता एकटीने बॅकपॅकिंग थोडे रिस्की वाटते आणी तशीही परमिशन नाही मिळणार.

कुणी एकटीने टूर कंपनी सोबत प्रवास केला आहे का? कुठे आणी कंपनीचा अनुभव सांगाल का?

जर मुलं सोबत असतील तर ग्रुप टूर चा अनुभव कसा आहे? एकटीने मुलांना घेऊन जाणे सेफ राहील का? कोणती कंपनी चांगली आहे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकटीने मुलांना घेऊन जाणे सेफ राहील का?

का नाही ?

२) मुलांना (वय पंधराचे आत धरले ) न्यायचे तर activity हवी.धार्मिक ठिकाणं बाद होतात. हिल स्टेशन्स बुक झाली असतील. समुद्रकिनाऱ्याजवळची ठिकाणं पाहा. मुंबईजवळची - पालघर,केळवा,डहाणू,बोर्डी.

३) टुअर कंपनी - जागा भरतील अशाच वेळी आणि ठिकाणी ट्रिपा काढतात. आपल्याला हवे तेव्हा आणि थोडक्यात नाही काढत. आपणच आपला मार्ग काढायचा.

कुणी एकटीने टूर कंपनी सोबत प्रवास केला आहे का? >>>>> हो मी केला आहे.२०१८ साली काही कारणांमुळे मी एकटीच, केसरी ट्रॅव्हल्समधून नैनितालला गेले होते.फार सुखद अनुभव होता.पण मला लेडीज स्पेशल टूर नकोच असल्याने मी ग्रूप/ फॅमिली टूर निवडली होती.एक ठरवले होते की कोणाची प्रायव्हसी डिस्टर्ब करायची नाही.पहिल्या दिवशी दुपारी लंचच्या दिवशी एकटीच बसले होते.पण लगेच चौघींचा एक ग्रूपने विचारले की आम्ही इथे बसू का?.रात्री जेवताना माझ्यासारखाच एकटा येणारा एक तिशीतला तरूण सोबत होता.
दुसर्‍या दिवसापासून एक जोडपे, मी आणि तो मुलगा यांच ग्रूपच झाला.मला बोटीत बसताना त्याचा फार फायदा झाला.विशेष बोलघेवडी नसूनही त्या ६-७ दिवसांत कधीही एकटे वाटले नाही.बाकीचेही बरेच जण चांगले होते.

फक्त रुममधे मी एकटीच असल्याने मला नेहमीपेक्षा जास्त पैसे (९०००)भरावे लागले होते,हाच काय तो तोटा होता.

तुमच्यासोबत जर मुले असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही.फक्त जरूर ती औषधे सोबत बाळगा.केसरी,वीणा झकास आहेत.तुम्ही एकट्या गेलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही.

मी पण गेले होते नुकतेच. कर्नाटक टूर. ancient trails बरोबर. बरेच होते माझ्यासारखे एकटे आलेले. मज्जा आली. सेफ असेल का वगैरे तर प्रश्नच पडले नाहीत मला.

Thanks, Srd, देवकी, Anagha_Gokhale

Does anyone have experience with Youth Hostels (YHA)? if yes, how's your experience?

फेसबुकवर एक सोलो वुमन ट्रॅव्हलर म्हणून संगीता लोबोचा पेज आहे. चांगला फीडबॅक आहे त्यांना. ते बघा.

मी केला आहे एकटीने लेडीज टूर बरोबर प्रवास. खुप वेळा. निदान दहा बारा वेळा तरी. छान असतो अनुभव. तुम्ही रहाता कूठे? मुंबईत राहत असलात तर जास्त सोप्पा होइल प्रवास . मुम्बई च्या बाहेर रहात असलात तर टूर वरून परत आल्यावर तुमच्या घरी जाण्यासाठी मिस्टरांना एअरपोर्ट वर बोलवावे लागेल किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही एकटीने पण टॅक्सी ने घरी जाउ शकता. मी नेहमी एकटीने टॅक्सी ने घरी जाते. अगदीं रात्री बारा वाजता सुध्दा. आज काल स्त्रिया ड्रायव्हर असलेल्या टॅक्सी सुध्दा मिळतातं त्यामुळे जास्ती सेफ झाल आहे प्रवास करण

वयानुसार का काय माझा एकटीने फिरण्याचा आत्मविश्वास खूप कमी झाला आहे. असे वाटते आपल्याला चक्कर आली तर? कोणीतरी बरोबर पाहीजे. आपला गुडघा (आर्थ्रायटिक) दुखावला आणि अचानक चालता येइनासे झाले तर? वगैरे.
------------
आपला प्रवास सुखरुप होवो. बेस्ट विशेस.
------------
@सुजा - मस्त प्रतिसाद!! कौतुक आहे.

२०१८ ला मी युथ होस्टेल केरळचा एक व गोव्याचा एक असे दोन ट्रेक एकटीने केले होते. दोन्ही नॅशनल लेव्हलचे ट्रेक नव्हते तर गोवा व केरळ चॅप्टरने आयोजीत केलेले ट्रेक होते, ज्यात त्यानी स्वतःचे थोडे स्वातन्त्र्य घेतले होते. दोन्ही चार चार दिवसाचे ट्रेक होते. काही तरुण, काही पन्नाशी - साठीचे, एक दोन जोडपी, दोन तिन कुटुम्बे, काही फक्त मित्र किन्वा मैत्रिणी ग्रुप करुन असे लोक होते. पहिल्याच दिवशी समविचारी लोकाशी मस्त बॉन्डिन्ग झाले. मी त्यान्च्यासोबत होते तरी मी स्वतन्त्रही होते.

युथ होस्टेलचे ट्रेक्स आवडत असतील तर त्यासारखे सुरक्षीत दुसरे कुठलेही ट्रेक्स नसतील. पण पुर्ण माहिती काढुन जावे. युथ होस्टेलचा भर ‘स्वतःची कामे स्वतःच‘ वर असतो. पण तरीही वेगळे ट्रेक मिळतात. मी केलेले हे दोन्ही ट्रेक नेहमीपेक्षा वेगळे होते, स्वत,ची कामे स्वतः वगैरे काही नव्हते, पावसाळी ट्रेक असल्यामुळे राहायला पक्की व्यवस्था होती. एकाच जागी मुक्कामाला राहुन दर दिवशी वेगवेगळ्या जागी फिरायला जायचे असे होते त्यामुळे मस्त पिकनिकचा फिल आला.

युथ होस्टेलच्या वेब्साइटला भेट देउन ट्रेकची माहिती काढा, फोनवर बोलुन सगळी माहीती घ्या आणि बरे वाटले तर जा. मुले घेउनही आरामात जाता येईल. खुप जण मुले घेऊन येतात, मुलाना कम्पनी मिळते.

नाही. कोचीनपासून जवळ कोटापूरमला राहायची सोय होती आणि बाहुबली पेशल आथरपल्ली धबधबा, मुझिरीज स्टडी आणि आजूबाजूची ठिकाणे अशी सहल होती. मी फोर्ट कोचिनला एक दिवस राहिले. खूप मस्त जागा.

https://www.yhaindia.org/adventure-programme.php?id=783&ty=s

हा बघा, हा ट्रेक मी केला होता. यात आता थोडा बदल झालाय. जंगल सफारी नाव घातले गेलेय पण जंगलात सफारी करणार नाही, बसने आथ्रपल्लीला जाताना जेवढे जंगल दिसेल तीच जंगल सफारी. आणि कोचीन सफर नवी घातली. मी गेले तेव्हा तीन दिवसात ट्रेक संपला. स्थळे सगळी हीच होती. आता किंमत वाढली.

तिथे जवळ गुरुवायूर मंदिर आहे हे नंतर कळल्यावर तिथेही भेट दिली. खूपच सुंदर परिसर आहे.

आलं लक्षात. कोणता भाग तो. बाकी केरळ फिरणे फारच सोपं आहे. भाषा,प्रवास ( स्थानिक बसेस) खाणे,राहाणे काहीच अडचण येत नाही.

धन्यवाद देवकी, मंजूताई, रेवा२, सुजा, सामो, साधना

फेसबुकवर एक सोलो वुमन ट्रॅव्हलर म्हणून संगीता लोबोचा पेज आहे. चांगला फीडबॅक आहे त्यांना. ते बघा. >> बघते थँक्स

मी केला आहे एकटीने लेडीज टूर बरोबर प्रवास. खुप वेळा. >> कोणत्या टूर कम्पनी बरोबर? अनुभव कसा होता? सगळ्याच कंपनी चे चान्गले आणी वाईट दोघी review आहेत नेट वर, कोणते खरे आणी कोणते पेड फाल्स तेच कळत नाही म्हणून विचारते आहे.

साधनाताई खूप थँक्स माहिती बद्दल, देवकीयांनी सांगितल्या वर तुमचे "फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स" पूर्ण वाचून संपवले काल, खूप छान लिहिले आहे आणी खरंच खूपच उपयोगी आहे नवीन ट्रॅव्हलर्स ला. सॉरी पण एक खूप सिली question विचारते आहे, मी कधीच ट्रेकिंग नाही केले म्हणून नेहमी एक प्रश्न पडतो ट्रेकिंग करताना जर कुणाला बाथरूम जायचे असेल, मोस्टली unexpected पिरियड आला date नसताना तर कसे करतात मुली? कॅम्पसाईट शिवाय पर्याय नसतो मगमधेच त्रास झाला तर?

केसरी वाले टूर फीस मध्ये airfare नाही ऍड करत मग आपल्याला स्वतः रिपोर्टींग लोकेशन पर्यंत जावे लागते का? मला मुंबई एअरपोर्ट पासून ट्रिप संपल्यावर परत मुंबई एअरपोर्ट ला सॊडणारी टूर हवी आहे, म्हणजे प्रवासात सोबत राहील, माझा एकटीने मुलांसोबत पहिलाच प्रवास असेल म्हणून. एकटी असले तर प्रश्न नसतो पण मुलं सोबत असली की काळजी वाटते लांबच्या प्रवासात. मी नाशिक, पुणे, मुंबई to अँड fro सोडले तर जास्त प्रवास नाही केलेला कधी.

सॉरी खूप सिली questions आहेत पण जितकी माहिती असेल तितके चांगले.

जन्गलात जर ट्रेकिन्ग असेल तर वाटेत टोइलेटची सोय नसते. झाडामागे जाउन आपली आपण करावी लागते. कॅम्प साईट जन्गलात असेल तर आता कामचलाऊ टोइलेट असतात. आधी नसायचे.

डेट नसताना पिरियेड आला तर मात्र अडचण होणार. त्या दरम्यान त्रास होत असेल तर अजुनच अडचण. खरे तर ही अडचण आपली तशी कन्डिशनिन्ग झालेली असते म्हणुन होते. अमुक इतकी सॅनिटरी सोय हवी ह्याची सवय असते आपल्याला. त्यामुळे तशी सोय नसणार हा विचार करुन निघाले तर त्रास होणार नाही.

केसरीचे माहित नाही, तसे आधी सान्गितले तर ते कदाचित तिकिटेही काढुन देत असावेत. पण ट्रेकवर गेल्यास मात्र आपल्याला रिपोर्तिन्ग लोकेशन पर्यन्त जायची सोय स्वतःच करावी लागते.

आता तुम्हाला बाहेरच पडायचे आहे तर हा अनुभवही घेउन बघा. बहुतेक वेळेस चान्गलेच अनुभव येतात. थोडा प्रेझेन्स ऑफ माइन्ड ठेवायचा. हल्ली नेटवर सगळे उपलब्ध असते, ओला, उबेर, होटेल... करुन बघा जवळचाच एखादा प्रवास. आत्मविश्वास नक्किच येइल.

केसरी वाले टूर फीस मध्ये airfare नाही ऍड करत...... आताचे माहीत नाही.पण अगोदर करत होते.माझ्या ट्रिपमध्ये airfare समाविष्ट होते.मात्र मध्यप्रदेश tripchya बाबत तुम्ही अमुक वाजता अमुक ठिकाणी या असे सांगितले होते.पण रात्रीची ट्रेन आणि सकाळी विचित्रवेली पोहोचेन म्हणून रद्द केली.

बाकी तुम्ही विचारलेली शंका,मलाही " फुलोंकी घाटी" वाचताना आली होती.पण साधनांनी सांगितल्यानुसार करत असावेत वाटले होते.मला दुसरीच एक शंका जास्त सतावत होती/आहे.आपले सामान आपल्यालाच उचलावे लागते का? सामान घेऊन चालणे होणार नाही.

अगदीच तुम्हीव मुले इतकेच जायच्या ऐवजी मुलांचे लाडके मित्र मैत्रीणी/ कझिन्स व त्यांच्या आया ह्यांचा असा एक गृप करा. कोणत्याही ट्रिप वर मुले कधी कधी कंटाळू शकतात आपल्या बरोबर राहून . त्यांच्या सोबत कोणीतरी समवय स्क असलेत तर काही काही बारके उद्योग करता येतात त्यांना. छोटी छोटी अ‍ॅडवेंच र. गोवा आवड त असेल तर सिदादे दे गोवा ही एक मस्त जागा आहे. एअर्पोर्ट पासून कार किंवा बस ने पिक अप असतो. एकदा पोहोचले की आत छोटेसे गावच आहे. बारक्यांसाठी खूप डेली अ‍ॅक्टिव्हिटीज असतत प्लस पोहोणे, आर्ट क्राफ्ट, केक पेस्ट्री खायला अशी मजा असते. इथले लारांजा म्हणून बफे ब्रेफा लंच डिनर रेस्तॉ आहे तिथे अगदी तुडुंब खाणे व्हरायटी असतात व्हेज व नोनव्हेज.
डोसे आमलेट पोहे उपमा पण असते. सकाळी पोहून मुले ब्रेफा करून इथे तिथे बागडू शकतात. मग लंच परेन्त आपल्याला आराम दोघी तिघी आया स्पा मध्ये जाउ शकता. गाय्डेड गोवा टूर असतात. गोवा प्रेक्षणीय स्थळे बघून होतील. आय रिअली मिस धिस प्लेस.
मुंबईते पणजी फ्लाइट व पुढे कार ने असे जाता येइल.

बंगलोर च्या जवळ एक मस्त जागा आहे. नाव विसरले --वंडरला!!! पन फार मोठे उंचावरील फेरिस व्हील तिथे आहे. तिथे ही लेकीला नेले होते. वॉटर स्लाइड वरुन खाली येताना आपल्याला हार्ट अ‍ॅटेक आला तर लेकीला कोण बघेल अशी फार मना पासून भीती वा टली होती. पण जमले
इतर ही डे लाँग करता येतील अश्या एक्टिव्हिटीज आहेत.

इथे पण एअर्पोर्ट ते हॉटेल टॅक्सी तुम्हाला करावी लागेल . हॉटेल चे ट्रावल डेस्क एअर्पोर्ट वर असते किंवा प्रिपेड टॅक्सी घेता येइल.

हैद्राबादला गेल्यास इतर साइट सीइन्ग पण आहे बिर्ला सायन्स म्युजीअम मध्ये मोठा डायनासोर आहे. हा बघून माझी बारकी तर घाबरून रडायलाच लाग ली होती. प्लॅ नेटेरिअम मस्त आहे. वर्थ व्हिजि टिंग. व नंतर एक दिवस रामोजी फिल्म सिटी मधे खास मुलांसाठी फंडु स्थान आहे. हे नक्की बघा. पन सोब त मुलांना समवयस्क कंपनी असली तर बरे. तुमची एखादी खास मैत्रीन असली तर तिला न्या सोबत.

हैद्राबादेस एक ओशन पार्क पण आहे. लेकी ला हे सर्व अनेकदा करवले आहे.

हैद्राबादेस तारामती बारादरी पण आहे तिथे राहायची सोय आहे. मुंबईस आलात तर एसेल वर्ल्ड इमॅजिका

इथे अनया म्हणून एका आहेत त्यांए ट्रेकिन्ग चे लेखन वाचून घ्या. मैत्रीणी व मुलांबरोबर केले आहे.

मेन म्हणजे परवानगी मी कधी घेत नाही व विचारत नाही मूड आला तर निघायचे. त्यामुळे माइंडसेट बदला. सर्व जग फिरायला सोपे आहे. पॅट्रारकीला थोडे दिवस भांडी घासुद्या.

मुलांना न्यायचे असेल तर गणपतीच्या दिवसांत न्या. कोकण आणि पुणे सोडून इतर ठिकाणी सहज बुकिंग मिळते. शाळेतही विशेष अभ्यास बुडत नाही.

आता मी केसरी ने जाते.पूर्वी मी टूर कस्टामैज च करुन घ्यायची या विचारांची होतें. म्हणजे तुम्हाला जी ठिकाण बघायची असतील ती टूर आखून देणाऱ्या टूर कंपनीला तुम्ही सांगू शकता आणि स्वतः स्वतंत्र जाता येत. त्या मी केसरी कडून नाही केल्या. पण नंतर लक्षात आलं त्यात काही वेळा माणूस वेळच्या वेळी पोचत नाही त्यामुळे खुप टेन्शन येतं. स्पेशली हाँगकाग टूर मध्ये एअर पोर्ट वर येणारा माणूस दोन ते तिन तास उशिरा आल्याने जे काही टेन्शन आल तेव्हापासून तशा टूर करण मी सोडुन दील . मग लेडीज टूर बरोबर जायला सुरवात केली. त्यातून मी कोणाला येणार का म्हणून विचारायच्या भानगडीत पडत नाही. टूर करावीशी वाटली की टूर सिलेक्ट करते अणि जाते. पण लेडीज टूर बरोबरच जाते कारण रूम पार्टनर मिळते. एकटीने रूममध्ये कंटाळा येतो

जास्तीत जास्त टूर मी केसरी बरोबर केल्या आहेत. मी म्हटल तस कोणाला विचारत बसत नाही. त्यांच्या ऑफीस मधे जाते टूर बूक करते आणि टूर ला जाते आतापर्यंत मला सगळया रूम पार्टनर चांगल्या मिळाल्या आहेत. आपण चांगले तर समोरचे चांगला त्यातुन तुम्हाला आयुष्यभर थोडेच राहायचे असते? जे काही चार आठ दिवस एकत्र असता ते माझे तरी मजेत गेले आहेत. २०१६ मध्ये युरोप च्या लेडीज टूर ला मला जी रूम पार्टनर मिळाली होती तीच आणि माझ मेतकुट छान जमल्याने तिच्याबरोबर माझ्या बरयाच टूर झाल्या. या या टूर ला जाऊया का? अस कधी तिने विचारल कधी मी आणि दोघींच्या डेट स जुळल्या तर गेलो. तसही तीने माझ्या शिवाय काही टुर्स केल्या मी तिच्याशिवाय काही टुर्स केल्या पण सगळ्यांचे अनुभव छान. टूर मध्ये मिळणारी सर्व्हिस असा विचार केला केसरी आणि वीणा दोन्ही चांगल्या आहेत. थोड उन्निस बीस इकडे तिकडे व्ह्यायचच त्याला ईलाज नाही पण दोन्हीं वेळच जेवण/ ब्रेकफास्ट/ चहा कॉफी अधून मधून आइस्क्रीम/ नारळपाणी . सर्व्हिस उत्कृष्ट. बसेस चांगल्यात/ हॉटेल्स चांगलीं कशालाच नाव ठेवायला जागा नाही

लेडीज टूर या ९०% मुम्बई ते मुम्बई आणि एअर टू एअर च असतात. काही ट्रेन्स ने असतात. पण मी त्या घेत नाही. टूर कोस्ट मध्ये एअर च तिकीट इंकलुड च असतं. जस्ट आता च मी अणि माझ्या त्या मैत्रिणीने 27फेब्रुवारी ला अंदमानात टूर केली आणि 27 मार्च ला statue of unity ला जाऊन आलो. दोन्हीं टुर्स भन्नाट झाल्या पण आम्ही जनरल टूर बुक केली होती . लेडीज नाही

ट्रॅ. कंपनीबरोबर प्रवास करताना सोयी असतात पण किंमतही खूप असते. लेडीज स्पेशलचे तर आणिकच जास्त. लहान लहान प्रवास आपले आपण प्लॅन करून एकटे किंवा दुकटे करून पहावेत. खर्चात खूपच फरक पडतो. आपण जाताना येताना विमान, कॅब, तारांकीत हाॅटेल असं केलं तरी खूपच स्वस्तात पडतं.

मला तर इतर कोणतरी बाई बरोबर स्पेस शेअर करणे, उगीच पीळ गप्पा मारणे जमणार च नाही. उगीच ऑम च्यॉ ह्योना ना बटाट्याच्या काच र्‍याच लॉगतॉत टाइप काहीतरी काय बोलायचे.

माझी एक मैत्रीण केसरीतून गेली होती था.बॅ.मलेशिया ट्रीपला. ती म्हणाली की माय फेअर लेडीमधे पण गृप जमायला अडचण यायची तिला. शाॅपिंग शाॅपिंग शाॅपिंग शाॅपिंग शाॅपिंग शाॅपिंग ...दिवसभर तेच करणा-या काही बायका असतात. त्या दिवसरात्र डोकं फिरल्यासारख्-या फक्त शाॅपिंगच करत होत्या. तसंच ऐकायला विचित्र वाटेल पण आदेश बांदेकरांच्या पुढेपुढे करणा-या, लाळघोटेपणा करणा-या पण होत्या काही. एकूणातच मैत्रीण ले. स्पे. ट्रीपला वैतागली होती. पुढल्या वेळेस फॅमिली ट्रीपला जाईन म्हणते.

मी सर्व प्लांनिंग इंटरनेट वरून flight, हॉटेल्स, पाहण्याची ठिकाणे इंस्टाग्राम वर चेक करून मग डायरेक्ट बुकिंग करूनच जाते.. १९९८ मध्ये जेव्हा नेटवरून ट्रॅव्हल बुकिंग अगदी प्रायमरी अवस्थेत होते तेव्हा मी पूर्ण नेपाळ हॉटेल्स, ट्रॅव्हलिंग, कॅबझ,गाडी इंटरनेटवरून ई-मेल करून केले होते. आणि मस्त स्वस्तात ट्रिप झालेली.
पण मग एकदा काय वाटले. केसरीने सिंगापूर, थायलंड ट्रिप केली. २००८ का ९ कधी तरी. तेव्हा बरोबरचे सहप्रवासी बघून नंतर कधीच जायचे नाही असे ठरवले. एक बाई तर प्राथमिक शिक्षिका होत्या त्या आम्हाला सांगायच्या की मी कविता म्हणते. तुम्ही माझ्या मागून म्हणा. बहुतेक आम्हाला त्यांचे विद्यार्थी समजत होत्या. शेवटी त्यांना स्पष्ट सांगितले कि आम्हाला साईट सिईंग करायचे आहे. डिस्टर्ब करू नका.

तसेच केसरीचा तो टूर ऑपरेटर ही मधेच काहीतरी आता गाणी म्हणा , काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला लावायचा. आमची फॅमिली ट्रीप होती. मुलांनी पण नंतर अशा ट्रॅव्हल ट्रीपला साफ नकार दिला. खूप लांब जाऊन इंडियन रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचे व जेवण तर तेच तेच असते. प्रत्येक ठिकाणी तांदळाची खीर !
बरेच जण छान ट्रॅव्हल ब्लॉग लिहितात. तेही स्टडी करून ठरवा. त्यात तिथले धोके, फसवणारे लोक ह्याबद्दल माहिती मिळते.
आता प्रवास करणे खूप सोपे झाले आहे.

देवा !! वाचून अक्षरशः वैताग आला. कविता म्हणायला लावणे वगैरे प्रचंड इरिटेटींग आहे. प्रवासात सतत गाणार्‍या लोकांचा वैताग यायचा. साईट सीईंग राहीले बाजुला. नुस्ते गाणी म्हणत बसतात. सतत नुस्ती कर्कश्य बडबड.

वीणा केसरी चे वर्णन ऐकून मी त्यांच्याबरोबर गेले नाही हे बरच झालं
. दर वर्षी एक ठिकाण ठरवायच शाळेच्या + आमच्या सुट्ट्या बघायच्या आणी रेल्वे / विमान या साठी रिमाईंडर लाऊन तिकीट काढायची.
Airbnb / Agoda यावरून हाॅटेल्स / होमस्टे ई. बुक करून ठेवले की प्रवास सुखाचा होतो.
नेट वर प्रवास सोपा करून देणाऱ्या असंख्य वेबसाईट आहेत. वेळ काढून एकेक चेक केली की आपली आयटीनरी 95% फिक्स होते.
मी तरी एक छोटी वही आहे त्यात हाताने साधारण प्रवासाची रूपरेषा लिहून ठेवते .मला ते जास्त सोप पडतं.

अनुभव वाचून हसायला येतं.

आपण **शिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि पिकनिकला / वेकेशनला स्वतंत्रच जावे. काय जो स्वर्ग दिसणार किंवा नाही त्याचे श्रेय आणि खापर आपल्यालाच. पण उगाच पैसे खर्चून दुसऱ्यांमुळे मला त्रासतरी नको.

तेव्हा एकदा सुरुवात कराच. आणि फार सावध राहायचे तर त्या राज्यांची पर्यटनं कार्यालयं मुंबई/ पुण्यात आहेत तिथून बुकिंग करा. तिथे तुम्हाला ग्रुपमध्ये मराठी एके मराठीच लोक भेटणार नाहीत आणि बराच त्रास वाचेल.

मुंबईत
उप्र, मप्र, केरळ, काश्मिर -- वल्ड ट्रेड सेंटर.
तमिळनाडू - दादर पूर्व स्वामिनारायण मंदिरामागे

मला तर इतर कोणतरी बाई बरोबर स्पेस शेअर करणे, उगीच पीळ गप्पा मारणे जमणार च नाही. उगीच ऑम च्यॉ ह्योना ना बटाट्याच्या काच र्‍याच लॉगतॉत टाइप काहीतरी काय बोलायचे.>> सगळ्याच बायका तशा नसतात

लेडीज स्पेशल चे काही फायदे काही तोटे. अगदी सुरवातीला तुमच्या एकट्याने जायचे असल्यास लेडीज स्पेशल चा फायदा होतो . रूम पार्टनर मिळते . गप्पा मारायला . मी एकटी असेंन तर लेडीज स्पेशल ने जाते आणि माझी ठरलेली मैत्रीण बरोबर असेल तर जनरल टूर मधून जातो . एकदा तर लेडीज स्पेशल मध्ये ऑड बायका आल्याने मला एकटीला रूम दिली गेली . मी खूप कंटाळले होते . वैतागले होते. शेवटी प्रत्येकाचा स्वभाव असतो काही जणींना एकटीलाच राहायच असते . त्या करता जास्त पैसे खर्च करण्याची पण तयारी असते . मला स्वतःला गप्पा मारायला रूम पार्टनर लागतेच लागते . हा प्रत्येकाचा स्वभाव आहे . असो
तिने लेडीज टूर चा अनुभव विचारला म्हणून सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले .

लेडीज स्पेशल टूर किती बोर असते यासाठी झिम्मा चित्रपट पाहा... प्लॅन कॅन्सल कराल..>> बोअर आहे का सिनेमा ? .