जर्मन शिकूया मराठीतून (आज ४ एप्रिल पासून मोफत ऑनलाईन )

Submitted by केदार जाधव on 4 April, 2022 - 03:28

नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .

आज , ४ एप्रिलपासून, मी YouTube वर मराठीतून विनामूल्य जर्मन शिकवण्यास सुरुवात करत आहे.

आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे A1 Level पासून शिकायला सुरुवात करून कमीतकमी तिसऱ्या (B1) Level पर्यंत शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Details :

सोमवार आणि बुधवार : भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ९ वाजता (जर्मनी प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता)

पहिल्या दिवसाची लिंक: https://youtu.be/sjYmrB9LZ74

तुम्ही वरच्या लिंकमधील 'set reminder' सुविधेचा वापर करू शकता .

तुम्ही माझ्या चॅनेलचे सदस्यत्व देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नियमित अपडेट मिळतील.
चॅनलची लिंक पुढील प्रमाणे:-
https://www.youtube.com/channel/UCdL9VHNN43PeoJoW2u0Y3cA

माझ्याबद्दल थोडेसे :
मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/ आवड आहे .

ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे . हे साध्य करण्यासाठी, मी जवळजवळ ६ वर्षांपासून जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे आणि आजपर्यंत मी माझ्या चॅनेलद्वारे हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शिकवले आहे.

मी याआधी ४६ बॅचेसमध्ये १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवले आहे आणि गेल्या वर्षी मी हिंदी आणि मराठीमध्ये जर्मन भाषा शिकवण्यासाठी माझे चॅनेल ‘Learn German with Kedar Jadhav’ सुरू केले.

त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या मदतीने हजारो लोक जर्मन भाषा शिकत आहेत आणि त्याला ९ लाखांहून अधिक Views मिळाले आहेत.

परंतु मला ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याबद्दल अनेक लोकांनी विनंती केली होती म्हणून मी हे सुरू करत आहे.
तसेच विदयार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकण्याचा आनंद घेता यावा यासाठी, मी Zoom वरून YouTube वर थेट Live येणार आहे.
प्रत्येक वेळी आपण १०० नवीन लोकांना मुख्य Zoom कॉलमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. याविषयीचे अपडेट्स पहिल्या कॉलमध्ये शेअर केले जातील.

याचा आणखी एक फायदा म्हणजे, कोणत्याही कारणास्तव एखाद्या लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला सहभागी होता आले नाही, तरी तेथे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल ज्याद्वारे तुम्ही अभ्यास करू शकता.

P.S. : फक्त शाळा आणि महाविद्यालयीन प्रतिनिधींसाठी : जर तुम्हाला ग्रुप म्हणून शिकायचे असेल तर कृपया मला +49176739151915 वर WhatsApp करा, मी तुमच्यासाठी स्वयंसेवक देण्याचा प्रयत्न करेन.
कृपया लक्षात घ्या हा क्रमांक फक्त शाळा प्रतिनिधींसाठीच आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग.
आज वाचले हे. मला आवडेल शिकायला.
लिंक बघते.

छान उपक्रम आहे. मीही जर्मन भाषा पुणे विद्यापीठात Advanced Diploma पर्यंत (= B-2 level) पर्यंत शिकलेलो आहे. या उपक्रमाला शुभेच्छा!

छान उपक्रम आहे. 
मी माझ्या मुलीला सांगितले आहे. सुट्टीत करेलही, शाळेत एक वर्षापासून जर्मन शिकतेय.