मराठी शब्दकोडे वेबसाइट ची माहिती कुठे देणे बरोबर असेल ?

Submitted by अमोल_११२३ on 3 April, 2022 - 03:31

आमच्या नवीन मराठी शब्दकोडे खेळायच्या वेबसाइटबद्दल मायबोली सदस्यांना मला माहिती द्यायची आहे.
https://www.crosswordfactory.com/

ही साइट सुरू करण्यामागील प्रेरणा ही इंटरनेटवर मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे आहे.
शब्दकोडे सोडवणे हा मराठी माणसाचा एक आवडता विरंगुळा आहे पण, इंटरनेटवर मराठी शब्दकोडी खेळण्यास फारसे पर्याय उपलब्ध नाहीत.
ह्या उपक्रमाद्वारे आम्ही ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.

ह्या वेबसाइटवर मराठी शब्दकोड्या व्यतिरिक्त मराठी शब्दशोध(Search words related to given picture) व चित्रकोडे (Picture puzzle) हे खेळ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे सर्व खेळ खेळण्यास पूर्णपणे मोफत आहेत .

मी प्रथमच मायबोली मध्ये सदस्य झालो आहे.
हि माहिती देण्यास कुठला ग्रुप योग्य आहे ?

- अमोल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वेबसाईट. चित्रकोडे आणि शब्दशोध वापरून बघितले आणि आवडले.

शक्य झाल्यास Responsive Design वापरून मोबाइलला सुयोग्य web डिझाईन करावे.
तसेच भविष्यात, कृपया जाहिराती दाखवून साईटचा विचका करू नये ही विनंती.

अमोल,
चांगलं जमलंय.
तुम्ही android apps ही बनवता का?

छान साईट. चित्रकोडे खेळले - ८ वेळा पैकी १ का २ वेळा तेच चित्र परत आले. ९ तुकड्याचे कोडे सोपे असते कारण कड दिसते आणि त्यावरून चटचट सोडवता येते. १६ तुकडे अशी सेकंड लेव्हल जमेल तेव्हा द्या.

छान आहे. तीन्ही खेळ खेळून पाहिले. मजा आली.

शब्दकोड्यात काही ठिकाणी वरचा आडवा शब्द आणि खालचा आडवा शब्द शेजारी आल्यास त्यातले काही चौकोन एकावर एक येऊन तिथे अर्थपूर्ण शब्द व्हायला पाहिजे. आजच्या कोड्यात एका ठिकाणी असा एक (उभा) अर्थपूर्ण शब्द होत असून तुम्ही त्या शब्दाला आकडा न टाकल्याने त्याचं वर्णन कोड्यात नाही. आणखी एका ठिकाणी उभी अक्षरे शेजारी येतात, पण शब्दाला काही अर्थ नाही, त्यामुळे तुम्ही तिथे आकडा टाकला नसावा. परंतु शब्दकोड्यात असे अर्थ नसलेले शब्द बनणे बरोबर नाही. म्हणून ही छोटीशी सुधारणा पुढच्या वेळेकरिता सुचवतो.
(शाळेत असताना एका उपक्रमाकरिता एक मोठ्ठं शब्दकोडं बनवताना त्यातले नियम वगैरे पाहिले होते. हे कोडं रोज बनवणं खूपच अवघड गोष्ट आहे ह्याची कल्पना आहे. त्यामुळे तुमच्या कल्पकतेला सलाम!)

आपल्या प्रतिक्रिया व वेळाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
ज्यांनी अजून पहिले नाही , जरूर पहा व प्रतिक्रिया कळवा .

दीड-दोन वर्षांपासून ह्या कल्पनेवर मी व माझा मित्र काम करीत आहे, चांगला प्रतिसाद मिळालेला पाहून बरे वाटते.
नोकरी चा वेळ /कोरोना चे प्रॉब्लेम / इत्यादीतुन वेळ काढून हे बनवू शकलो म्हणून विशेष आनंद आहे !

आपल्या प्रश्न/प्रतिक्रियांची उत्तरे --

कुमार१ - विरंगुळा विभाग, अवल, गजानन, जाई , तेजो , आईची_लेक , वावे , उपाशी बोका , भरत , Srd, सीमंतिनी, हरचंद पालव--
Encouraging प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

-उपाशी बोका
हि वेबसाईट Responsive बनवली आहे. कुठल्या screen size/browser वर काही bug दिसल्यास
amol.crosswordfactory ह्या जी मेल id ला कळवावे

-भरत
आम्ही font color configurable बनवायचा प्रयत्न करू , म्हणजे तो आपल्या गरजेनुसार बदलता येईल

-जाई
सुधारित आणि अजून अनेक शब्दकोडी बनवणे चालू आहे , झाल्यावर इथे जरूर कळवू .

-Srd-
Android app 'TO DO list' मध्ये आहे . करायची इच्छा व कौशल्य आहे , वेळ कमी पडतोय !

-सीमंतिनी
List मधील Random चित्रकोडी येतील आणि काही पुन्हा येतील असे बनवले आहे .
Second level ची कल्पना उत्कृष्ट ! TO DO list मध्ये add केलंय .

-हरचंद पालव
सविस्तर विश्लेषणाबद्दल धन्यवाद !
सुचवलेल्या मुद्यांवर जरूर सुधारणा करू.

ही साइट सुरू करण्यामागील प्रेरणा ही इंटरनेटवर मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे आहे. - हार्दिक आभार आणि अभिमान. उत्तम सोय केल्याबद्दल धन्यवाद.