प्रवास

Submitted by वेब on 30 March, 2022 - 02:15

एप्रिल महिन्यात वयोवृद्ध आई बरोबर बंगलोर ला जाण्याचा विचार आहे. तीला झेपेल त्याप्रमाणे बंगलोर आणि आजूबाजूचे बघायचे असा विचार आहे. कुठे उतरावे? मार्गदर्शन अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे ! बंगळुरु वा तिथे राहुन आलेल्या किंवा भटकलेल्या एकाही जणाने याचे उत्तर दिले नाही? Uhoh

सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे उटी सारखे ठिकाण किंवा कुर्ग चांगले आहे की. उन्हाचाही त्रास होणार नाही. आईला प्रवास कितपत झेपतोय ते बघुन नियोजन करा.

https://www.maayboli.com/node/56498 हा बाफ बघा. आशिकाने लिहीले आहे. हॉटेल्स विषयी आशिका सांगु शकते का ते बघा.

बंगलोरलाच का? कारण ते फार गजबजलेलं शहर आहे. पाहण्यासाठी काही नाही.
बंगलोर,मैसुर,हासन,चिकमगळुरू हा सर्व एक हजार मिटर उंचीवरचा भाग आहे मान्य. पण हे शहर झालं आहे.
इतर हिल स्टेशनस एप्रिल मेमध्ये महागच असतात.
दुसरं म्हणजे कुठून येणार माहिती झाल्यास वाचक दुसरी चांगली ठिकाणं सुचवतील.

नवीन धाग्याऐवजी हाच धागा वापरते प्रवासाबद्दल छोटा प्रश्न विचारायला. भारतातल्या भारतात विमानप्रवास करायला कुठली वेबसाईट वापरता? धन्यवाद.